Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 33:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 देश विलाप करतो; तो म्लान झाला आहे; लबानोन निस्तेज व शुष्क झाला आहे; शारोन अरण्यप्राय झाला आहे; बाशान व कर्मेल आपली पाने गाळत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 भूमी शोक करते आणि ती शुष्क झाली आहे; लबानोन निस्तेज झाला आहे आणि शुष्क झाला आहे; शारोन सपाट रानाप्रमाणे झाला आहे; आणि बाशान व कर्मेल आपली पाने गाळीत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 भूमी शुष्क होत आहे आणि ओसाड झाली आहे, लबानोन शरमिंदा झाला आहे आणि कोमेजला आहे; शारोनची कुरणे अरबी वाळवंटसारखी झाली आहेत, आणि बाशान व कर्मेल त्यांची पाने गळून पडत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 33:9
23 Iomraidhean Croise  

द्राक्षांप्रमाणे त्याची अपक्‍व फळे झडतील; जैतून झाडाच्या फुलांप्रमाणे त्याची फुले गळतील.


मी शारोनाचे कुंकुमपुष्प आहे; मी खोर्‍यातले भुईकमळ आहे.


तो लोखंडाने वनातली झाडे तोडत आहे, लबानोन प्रताप्याच्या हातून पतन पावत आहे.


सुरूची झाडे व लबानोनावरील गंधसरू तुझ्यामुळे हर्षित होऊन म्हणतात, ‘तू पडलास तेव्हापासून आमच्यावर कुर्‍हाड चालवणारा कोणी येत नाही.’


लबानोनाचे मोठे व उंच गेलेले सर्व गंधसरू, बाशानातील सर्व अल्लोनाची झाडे;


पाहा, परमेश्वर पृथ्वी रिक्त करीत आहे, तिला ओसाड करीत आहे, तिला विरूप करीत आहे व तिच्या रहिवाशांची दाणादाण करीत आहे.


मग मी अरीएलांवर संकट आणीन; शोक व कण्हणे चालू होईल. तरीपण ते नगर मला अरीएलच असे होईल.


तेव्हा तिच्या वेशी आकांत करतील, शोकाकुल होतील व ती एकटी1 होऊन भुईवर बसेल.


ते अत्यंत प्रफुल्लित होईल, आनंदाने गाऊन उत्सव करील; लबानोनाची शोभा त्याला मिळेल; कर्मेल व शारोन ह्यांचे ऐश्वर्य त्याला प्राप्त होईल; ती परमेश्वराचे वैभव आमच्या देवाचे ऐश्वर्य पाहतील.


तू आपल्या सेवकांच्या द्वारे प्रभूची निंदा करून म्हणालास मी आपल्या बहुत रथांनिशी पर्वतांच्या माथ्यावर, लबानोनाच्या अगदी मध्यापर्यंत चढून आलो आहे; मी त्याचे उंच गंधसरू व निवडक देवदारू तोडून टाकीन; त्याच्या अत्यंत दूरच्या उच्च स्थानी त्याच्या फळझाडांच्या राईत प्रवेश करीन.


माझा धावा करणार्‍या लोकांसाठी शारोन कळप चारण्याचे कुरण होईल, अखोराचे खोरे गुरांचा गोठा होईल.


मी इस्राएलास त्याच्या कुरणात परत आणीन, तो कर्मेल व बाशान ह्यांवर चरेल, एफ्राइमाच्या डोंगरावर व गिलादात त्याचा जीव तृप्त होईल.


ह्यामुळे देश शोक करीत आहे व त्यातील सर्व रहिवासी व त्यांच्याबरोबर वनपशू व आकाशातील पक्षी म्लान झाले आहेत; समुद्रातले मासेही नाहीतसे झाले आहेत.


तो म्हणाला, “परमेश्वर सीयोनेतून गर्जना करतो, यरुशलेमेतून आपला शब्द ऐकवतो, मेंढपाळांची कुरणे शोक करतात व कर्मेलाचा माथा सुकून गेला आहे.”


तू आकडी घेऊन आपल्या लोकांना चार; तुझ्या वतनातील मेंढरे कर्मेलाच्या झाडीत एकान्ती राहतात त्यांना चार; प्राचीन काळच्या दिवसांप्रमाणे बाशानात व गिलादात त्यांना चरू दे.


तो समुद्रास दटावून आटवतो, सर्व नद्या कोरड्या करतो; बाशान व कर्मेल त्याच्यापुढे म्लान होतात, लबानोनाचा फुलवरा कोमेजून जातो.


त्याला पाहून लोद व शारोन येथील सर्व रहिवासी प्रभूकडे वळले.


त्या वेळी आम्ही त्याची सर्व नगरे घेतली; आम्ही घेतले नाही असे त्यांचे एकही नगर राहिले नाही, आम्ही साठ नगरे घेतली, म्हणजे अर्गोबाचा सारा प्रदेश घेतला; बाशानातले ओगाचे राज्य ते हेच.


Lean sinn:

Sanasan


Sanasan