Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 33:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 राजमार्ग ओस पडले आहेत, कोणी प्रवासी आढळत नाहीत; त्याने करार मोडला, नगराचा उपमर्द केला, मनुष्यांचा धिक्कार केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 राजमार्ग ओसाड पडले आहेत; तेथे कोणीही प्रवासी नाही. त्याने निर्बंध मोडला आहे, साक्षीदारांसह तुच्छ लेखले, आणि नगरांचा अनादर केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 नगरातील महामार्ग निर्जन झाले आहेत, रस्त्यावर कोणी प्रवासी नाहीत. करार मोडला आहे, त्याचे साक्षीदार तुच्छ झाले आहेत, कोणाचाही आदर केल्या जात नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 33:8
16 Iomraidhean Croise  

त्याच्या युक्त्या सर्वदा सिद्धीस जातात; तुझे निर्णय त्याच्या अगदी दृष्टीपलीकडे उच्च असे असतात; तो आपल्या सर्व शत्रूंवर फूत्कार टाकतो.


पृथ्वी आपल्या रहिवाशांकडून भ्रष्ट झाली आहे, कारण त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, विधींचे अतिक्रमण केले आहे आणि सनातन करार मोडला आहे.


तेथील मार्ग राजमार्ग होईल; त्याला पवित्र मार्ग म्हणतील; त्याने अपवित्र जन जाणार नाहीत; पण तो त्यांच्यासाठीच, परमेश्वराच्या लोकांसाठी होईल; त्या मार्गाने जाणारे मूढ असले तरी मार्ग चुकणार नाहीत.


हिज्कीया राजाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी असे झाले की अश्शूरचा राजा सन्हेरीब ह्याने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांवर चढाई करून ती घेतली.


पर्वणीस जाणारे कोणी नाहीत म्हणून सीयोनेचे मार्ग शोक करीत आहेत; तिच्या सर्व वेशी उजाड झाल्या आहेत; तिचे याजक उसासे टाकत आहेत; तिच्या कुमारी खिन्न झाल्या आहेत; ती स्वतः कष्टी आहे.


मी तुमच्यावर वनपशू सोडीन आणि ते तुमची मुले उचलून नेतील, तुमच्या गुराढोरांचा नाश करतील, तुमची संख्या अगदी कमी करतील आणि त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील.


त्या म्हातार्‍याने गावातल्या रस्त्यावर नजर टाकली तेव्हा कोणी प्रवासी तेथे बसला आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. म्हातार्‍याने त्याला विचारले, “तू कोठे निघालास? तू कोठून आलास?”


अनाथाचा मुलगा शमगार ह्याच्या दिवसांत, याएलेच्या दिवसांत राजमार्ग सुने पडले; वाटसरू आडमार्गांनी प्रवास करत.


तो पलिष्टी म्हणाला, “इस्राएलाच्या सर्व सैन्याला मी कस्पटासमान लेखत आहे. कोणाही पुरुषाला माझ्यापुढे येऊ द्या, म्हणजे आम्ही दोघे युद्ध करू.”


आसपास उभे असणार्‍या लोकांना दाविदाने विचारले, “ह्या पलिष्ट्याला मारून इस्राएलाची अप्रतिष्ठा दूर करणार्‍या मनुष्याला काय मिळेल? ह्या असुंती पलिष्ट्याने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्यात काय?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan