Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 33:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तुझ्या काळी स्थिरता वसेल; तारण, सुज्ञता व ज्ञान ह्यांचे वैपुल्य होईल; परमेश्वराचे भय त्याचा निधी होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तुझ्याकाळी तो स्थिरता देईल, तारण, सुज्ञता व ज्ञान, यांची विपुलता देईल, परमेश्वराचे भय त्याचा धनसंग्रह होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तुमच्या वेळेसाठी ते निश्चित पाया असे असतील, तारण, शहाणपण आणि सुज्ञान यांचे ते विपुल भांडार असतील; याहवेहचे भय हेच या खजिन्याची चावी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 33:6
39 Iomraidhean Croise  

ह्यास्तव परमेश्वर त्याच्याबरोबर होता; जिकडेजिकडे तो जाई तिकडेतिकडे त्याला यशःप्राप्ती होई; त्याने अश्शूराच्या राजाविरुद्ध बंड केले; त्याचा तो अंकित राहिला नाही.


तुझ्या देवभक्तीचा तुला आश्रय आहे ना? तुझ्या सात्त्विक आचरणावर तुझी आशा आहे ना?


हे परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या तारणसामर्थ्या, तू लढाईच्या प्रसंगी माझे शिरस्त्राण आहेस.


परमेश्वर आपल्या लोकांचे सामर्थ्य आहे, तोच आपल्या अभिषिक्ताचा तारणदुर्ग आहे.


सत्य, नम्रता व न्यायपरायणता ह्यांच्याप्रीत्यर्थ प्रतापाने स्वारी करून विजयशाली हो, म्हणजे तुझा उजवा हात तुला भयानक कृत्ये करण्यास शिकवील.


सुज्ञांचे धन त्यांचा मुकुट आहे; मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच राहते.


परमेश्वराचे भय धरल्याने श्रद्धा दृढ होते; आणि ज्याच्या ठायी श्रद्धा असते त्याच्या मुलांना ती आश्रयस्थान होते.


परमेश्वराचे भय जीवनाचा झरा होय, ते मृत्युपाश चुकवते.


बहुत धन असून त्याच्याबद्दल दगदग सोसावी लागणे ह्यापेक्षा ते थोडके असून परमेश्वराचे भय बाळगणे हे बरे;


परमेश्वराचे भय जीवनप्राप्तीचा मार्ग होय; जो ते धरतो तो सुखाने नांदतो. त्याचे वाईट होणार नाही.


तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.


देशाच्या पातकामुळे त्याचे बहुत अधिपती होतात, पण समंजस व जाणत्या माणसांच्या हातून त्याची सुस्थिती दीर्घकाळ राहते.


राजा न्यायाने देश सुस्थितीत ठेवतो, पण नजराणे घेणारा त्याचे वाटोळे करतो.


ज्ञान आश्रय देणारे आहे व पैसाही आश्रय देणारा आहे; तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्याजवळ शहाणपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करते.


नगरातल्या दहा अधिपतींपेक्षा शहाणपण शहाण्याचे अधिक चांगले रक्षण करते.


माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.


त्या दिवशी यहूदा देशात हे गीत गातील : आमचे नगर तटबंदी केलेले आहे; तारण हेच त्याचे कोट व तट नेमले आहेत.


नीतिमत्तेचा परिणाम शांती व तिचे फल सर्वकाळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल.


आणि माझे लोक शांत स्थळी, निर्भय वसतिस्थानात व सुखाश्रमात राहतील.


आमचे मेळे भरवण्याची सीयोन नगरी पाहा; यरुशलेम सुखधाम आहे असे तुझ्या दृष्टीस पडेल; जो कधी हलवत नाहीत, ज्याच्या मेखा कधी उपटत नाहीत, ज्याची एकही दोरी तोडत नाहीत, अशा तंबूसारखी ती तुझ्या दृष्टीस पडेल.


इस्राएलास परमेश्वराकडून सर्वकाळचा उद्धार प्राप्त झाला आहे; तुम्ही अनंतकाळ लज्जित व फजीत होणार नाही.


दबलेला मुक्त होण्याची त्वरा करतो, तो मरणार नाही, गर्तेत पडणार नाही. त्याला अन्नाची वाण पडणार नाही.


वर आकाशाकडे आपले डोळे लावा, खाली पृथ्वीकडे लक्ष द्या; कारण आकाश धुराप्रमाणे विरून जाईल, पृथ्वी वस्त्राप्रमाणे जीर्ण होईल, तिचे रहिवासी चिलटांप्रमाणे मरतील; तरी माझे तारण सर्वकाळ टिकेल, माझा न्याय भंग पावणार नाही.


परमेश्वर म्हणतो, ह्यापुढे कोणी आपल्या शेजार्‍यास, कोणी आपल्या बंधूस, परमेश्वराला ओळखा, असा बोध करणार नाहीत; कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील; मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी ह्यापुढे स्मरणार नाही.”


कारण जल समुद्राला व्यापून टाकते तशी पृथ्वी परमेश्वराच्या प्रतापाच्या ज्ञानाने भरेल.


तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील.


दु:खी मानलेले तरी सर्वदा आनंद करणारे; दरिद्री मानलेले तरी पुष्कळांना सधन करणारे; कफल्लक असे मानलेले तरी सर्ववस्तुसंपन्न, अशी आम्ही आपली लायकी पटवून देतो.


कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतींत उपयोगी आहे; सुभक्ती तर सर्व बाबतींत उपयोगी आहे; तिला आताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे.


चित्तसमाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan