Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 33:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 टोळ जसे सारे फस्त करतात तशी तुमची लूट हरण करतील, नाकतोडे धाड घालतात तसे तिच्यावर धाड घालतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 टोळ नाश करतात त्याप्रमाणे तुमची लूट गोळा करतील, जसे टोळ धाड टाकतात तसे मनुष्ये तिजवर धाड टाकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 अहो राष्ट्रांनो, तरुण टोळांनी तुम्ही केलेल्या लुटीची कापणी केली आहे. टोळांच्या थव्याप्रमाणे लोक त्यावर झडप घालतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 33:4
11 Iomraidhean Croise  

आसा व त्याच्याबरोबरचे लोक ह्यांनी त्यांचा पाठलाग गरारापर्यंत केला; त्या प्रसंगी इतके कूशी पडले की त्यांनी पुन्हा आपले डोके वर केले नाही; त्याच्या सेनेपुढे त्यांची गाळण उडाली व यहूदी लोकांनी पुष्कळ लूट नेली.


यहोशाफाट व त्याचे लोक लूट करायला आले तेव्हा त्या प्रेतांमध्ये बहुत धन, वस्त्रे1 व मोलवान अलंकार त्यांना मिळाले; ते त्यांनी इतके काढून घेतले की त्यांना ते वाहून नेता येईनात; लूट एवढी होती की ते ती तीन दिवसपर्यंत करीत होते.


तुझे दोर ढिले पडले आहेत; ते डोलकाठीचा आधार स्थिर राखत नाहीत; ते शीड पसरत नाहीत; ते विपुल लूट वाटतात; लंगडेही लूट करतात.


कलहाचा ध्वनी ऐकताच लोक पळून गेले; तू उभा राहताच राष्ट्रे पांगून गेली.


परमेश्वर उन्नत झाला आहे, उच्च स्थानी राहून त्याने सीयोन न्यायशीलतेने व नीतिमत्तेने भरले आहे.


म्हणून पाहा, मी आपला हात तुझ्यावर उगारीन, मी तुला राष्ट्रांच्या हाती लूट म्हणून देईन, तुझा राष्ट्रांतून उच्छेद करीन, देशांमधून तुला नाहीसे करीन, तुला मी नष्ट करीन; तेव्हा तुला समजेल की मी परमेश्वर आहे.


कुरतडणार्‍या टोळांपासून जे राहिले ते झुंडींनी येणार्‍या टोळांनी खाल्ले; झुंडींनी येणार्‍या टोळांपासून जे राहिले ते चाटून खाणार्‍या टोळांनी खाल्ले; चाटून खाणार्‍या टोळांपासून जे राहिले ते अधाशी टोळांनी खाल्ले.


मी तुमच्यावर पाठवलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडींनी येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, अधाशी टोळ व कुरतडणारे टोळ ह्यांनी ज्या वर्षांचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हांला भरपाई करून देईन.


त्यांच्यापुढे अग्नी भस्म करत चालला आहे, त्यांच्यामागे ज्वाला जाळत चालली आहे, त्यांच्यापुढील प्रदेश एदेन बागेसारखा आहे, त्यांच्यामागील प्रदेश ओसाड रान आहे; त्यातून काहीच वाचून राहत नाही.


ते शहरातून इकडेतिकडे फिरतात, ते भिंतीवरून चालतात, ते चढून घरात शिरतात, चोरासारखे खिडक्यांतून प्रवेश करतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan