Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 33:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तुझे दोर ढिले पडले आहेत; ते डोलकाठीचा आधार स्थिर राखत नाहीत; ते शीड पसरत नाहीत; ते विपुल लूट वाटतात; लंगडेही लूट करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 तुझे दोर ढिले झाले आहेत; त्यांना आपल्या डोलकाठीस घट्ट धरून ठेवत आधार नाहीत; ते शीड पसरीत नाहीत; जेव्हा मोठ्या लुटीची लूट वाटण्यात आली, जे पांगळे त्यांनी लूट वाटून घेतली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 तुमच्या जहाजांना आधार देण्याऱ्या दोऱ्या सैल सोडलेल्या आहेत: जहाजाची शीडकाठी सुरक्षित धरलेली नाही, जहाजाचे शीड पसरलेले नाही. तेव्हा लूट केलेल्या विपुल मालाची वाटणी केली जाईल आणि लंगडेसुद्धा लूट घेऊन जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 33:23
17 Iomraidhean Croise  

तेव्हा लोकांनी बाहेर पडून अरामी लोकांचे डेरे लुटले. ह्याप्रमाणे परमेश्वराच्या वचनानुसार एका शेकेलाला मापभर सपीठ व एका शेकेलाला दोन मापे सातू विकू लागले.


छावणीच्या बाहेरल्या हद्दीशी आल्यावर त्या कोड्यांनी एका तंबूत जाऊन तेथे खाणेपिणे केले आणि त्यातून रुपे, सोने व वस्त्रे नेऊन लपवून ठेवली; मग परत येऊन ते दुसर्‍या डेर्‍यात गेले आणि त्यातूनही माल नेऊन त्यांनी लपवून ठेवला.


यहोशाफाट व त्याचे लोक लूट करायला आले तेव्हा त्या प्रेतांमध्ये बहुत धन, वस्त्रे1 व मोलवान अलंकार त्यांना मिळाले; ते त्यांनी इतके काढून घेतले की त्यांना ते वाहून नेता येईनात; लूट एवढी होती की ते ती तीन दिवसपर्यंत करीत होते.


“सैन्यांचे राजे पळ काढतात, पळ काढतात;” आणि घरी राहिलेली गृहिणी लूट वाटून देते.


तुम्ही मेंढवाड्यामध्ये1 पडून राहता काय? ज्याचे पंख रुप्याने व पिसे पिवळ्या सोन्याने मंडित आहेत, अशा कबुतरासारखे तुम्ही आहात ना?


अरे लुटार्‍या, तुला लुटले नाही; अरे ठका, तुला ठकवले नाही; तुला धिक्कार असो! तुझे लुटणे आटपले म्हणजे तुला लुटतील; तुझे ठकवणे आटपले म्हणजे तुला ठकवतील.


आणखी तेथे आमच्यासाठी प्रतापी परमेश्वराचा निवास होईल; ते रुंद नदीनाल्याचे ठिकाण होईल; त्यात वल्ह्याच्या तारवाचा, मोठ्या जहाजाचा प्रवेश होणार नाही.


टोळ जसे सारे फस्त करतात तशी तुमची लूट हरण करतील, नाकतोडे धाड घालतात तसे तिच्यावर धाड घालतील.


तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील; कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील.


शबा, ददान आणि तार्शीश येथले व्यापारी व त्यांचे सर्व तरुण सिंह तुला म्हणतील, ‘तू लुटालूट करण्यास आलास काय? तू मालमत्ता हरण करण्यासाठी आपला सेनासमूह जमवला आहेस काय? सोनेरुपे न्यावे, गुरेढोरे व माल न्यावा आणि मोठी लूट करावी म्हणून तू आला आहेस काय?’


आणि तिसर्‍या दिवशी त्यांनी आपल्या हातांनी तारवाचे अवजार टाकून दिले.


तरी ज्ञान्यांस लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले;


दावीद व चारशे लोक ह्यांनी पाठलाग चालवला; बाकीचे दोनशे लोक एवढे थकून गेले होते की त्यांना बसोर नाल्यापलीकडे जाता येईना.


Lean sinn:

Sanasan


Sanasan