Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 33:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 त्या भयप्रसंगाचे तू आपल्या मनात चिंतन करशील; कोठे गेला तो गणना करणारा? कोठे गेला तो तोलणारा? कोठे आहे तो बुरुजांची गणना करणारा?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 भयप्रद गोष्टींचे स्मरण तुझ्या मनाला होईल; लिखाण करणारा कोठे आहे, पैसे तोलणारा कोठे आहे? मनोऱ्यांची गणती करणारा कोठे आहे?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 तुम्ही यापूर्वीच्या दहशत बसविणाऱ्या गोष्टीचा नीट विचार कराल: “तो मुख्याधिकारी कुठे आहे? ज्याने महसूल कर घेतला, तो कुठे आहे? उंच बुरुजावरील प्रमुख अधिकारी कुठे आहे?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 33:18
16 Iomraidhean Croise  

अब्राहामाने एफ्रोनाचे म्हणणे कबूल करून हेथींच्या देखत सांगितला होता तेवढा पैसा म्हणजे चलनी चारशे शेकेल रुपे त्याला तोलून दिले.


अश्शूरचा राजा पूल ह्याने देशावर स्वारी केली तेव्हा आपणास त्याने मदत करून गादीवर आपली स्थापना स्थिर करावी म्हणून मनहेमाने त्याला एक हजार किक्कार2 चांदी दिली.


यहूदाचा राजा हिज्कीया ह्याने अश्शूराच्या राजाला लाखीश येथे सांगून पाठवले की, “माझ्या हातून अपराध झाला आहे, आता माझ्याकडून परत जा; आपण माझ्यावर जो बोजा लादाल तो मी सहन करीन.” यहूदाचा राजा हिज्कीया ह्याने तीनशे किक्कार1 चांदी व तीस किक्कार सोने खंडणी द्यावी असे अश्शूराच्या राजाने ठरवले.


हिज्कीयाचे ऐकू नका, कारण अश्शूरचा राजा म्हणतो, माझ्याशी सल्ला करा व माझ्याकडे निघून या; आणि तूर्त तुम्ही प्रत्येक जण आपापल्या द्राक्षवेलाचे फळ खा, तुम्ही प्रत्येक जण आपापल्या अंजिराचे फळ खा, तुम्ही प्रत्येक जण आपापल्या हौदांचे पाणी प्या;


मी तर अधीर होऊन म्हणालो, “मी तुझ्या दृष्टीपुढून दूर झालो आहे;” तरी मी तुझा धावा केला तेव्हा तू माझ्या विनवणीचा शब्द ऐकलास.


तू मला अनेक भारी संकटे भोगायला लावलीस, तरी तू माझे पुनरुज्जीवन करशील, आणि मला पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वर आणशील.


संध्याकाळी पाहाल तर थरकाप; पहाट झाली नाही तर तिचा फडशा. जे आम्हांला लुटतात त्यांच्या वाट्याला हे आहे; जे आमचा अपहार करतात त्यांच्या हिश्शाला हे आहे.


नीतिमत्तेने तू खंबीर होशील, जाचापासून दूर राहशील, कारण तुला भीतीच उरणार नाही; तू धाकापासून दूर राहशील, तो तुझ्याजवळ येणार नाही;


‘ज्ञानी कोठे राहिला? शास्त्री कोठे राहिला?’ ह्या युगाचा वाद घालणारा ‘कोठे राहिला?’ देवाने जगाचे ‘ज्ञान मूर्खपणाचे ठरवले’ की नाही?


मला अंत्युखियात, इकुन्यात व लुस्त्रात जे काही झाले ते व मी जो छळ सहन केला तो तू ओळखून आहेस; त्या सर्वांतून प्रभूने मला सोडवले.


तेव्हा दावीद मोठ्या पेचात पडला; कारण लोक आपले पुत्र व कन्या ह्यांच्यासाठी शोकाकुल होऊन दाविदाला दगडमार करावा असे म्हणू लागले; पण दावीद आपला देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवून खंबीर राहिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan