Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 33:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तुझे नेत्र राजाला वैभवसंपन्न असा पाहतील. ते दूरवर विस्तृत झालेली भूमी पाहतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 तुझे नेत्र राजाला त्याच्या शोभेत पाहतील; ते विस्तीर्ण भूमी पाहतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 तुमची दृष्टी राजाला त्यांच्या सौंदर्यात पाहतील आणि फार दूरवर पसरत असलेला देश पाहतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 33:17
20 Iomraidhean Croise  

पुष्कळ लोकांनी परमेश्वराप्रीत्यर्थ यरुशलेमेस भेटी आणल्या आणि यहूदाचा राजा हिज्कीया ह्याला मौल्यवान वस्तू नजर केल्या; ह्यामुळे तो सर्व राष्ट्रांच्या दृष्टीने थोर झाला.


त्याला मी स्वतः पाहीन, इतरांचे नव्हे तर माझेच नेत्र त्याला पाहतील. माझा अंतरात्मा झुरत आहे!


तू मला वैर्‍याच्या कोंडीत सापडू दिले नाहीस; माझे पाय तू प्रशस्त स्थळी स्थिर केलेस.


मानवजातीत तू अति सुंदर आहेस; तुझ्या मुखात प्रसाद भरला आहे; ह्यामुळे देवाने तुला सर्वकाळ धन्यवादित केले आहे.


माझा वल्लभ गोरापान व लालबुंद आहे; तो लाखात मोहरा आहे.


चंद्र तांबूस होईल, सूर्य फिक्का पडेल; कारण सेनाधीश परमेश्वर सीयोन डोंगरावर व यरुशलेमेत आपल्या प्रजेतील वडिलांसमोर वैभवाने राज्य करील.


तू राष्ट्रांची वाढ केली आहेस, हे परमेश्वरा, तू राष्ट्रांची वाढ केली आहेस; तू आपला महिमा दाखवला आहेस; तू देशाच्या चतुःसीमा वाढवल्या आहेत.


आणखी तेथे आमच्यासाठी प्रतापी परमेश्वराचा निवास होईल; ते रुंद नदीनाल्याचे ठिकाण होईल; त्यात वल्ह्याच्या तारवाचा, मोठ्या जहाजाचा प्रवेश होणार नाही.


कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे, परमेश्वर आमचा नियंता आहे, परमेश्वर आमचा राजा आहे; तो आम्हांला तारील.


हे ऐकून हिज्कीया राजा आपली वस्त्रे फाडून व गोणपाट नेसून परमेश्वराच्या मंदिरात गेला.


तेव्हा मी म्हणालो, “हायहाय! माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो; आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज ह्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले!”


त्यांची आबादानी केवढी! त्यांचे सौंदर्य केवढे! धान्य तरुणांना आणि नवा द्राक्षारस तरुणींना धष्टपुष्ट करील.


तेव्हा त्याचे रूप त्यांच्यादेखत पालटले; त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली.


शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता.


ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील; मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वत: त्याला प्रकट होईन.”


हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे; ह्यासाठी की, जो माझा गौरव तू मला दिला आहेस तो त्यांनी पाहावा; कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केलीस.


आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो; कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत.


प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत; आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही; तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan