Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 33:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 जो धर्माने चालतो, सरळ भाषण करतो, जुलूम करून होणारा लाभ अव्हेरतो, लाच घेण्यापासून आपला हात आवरतो, घातपाताच्या मनसुब्याला आपले कान बंद करतो, दुष्कर्माला आपले डोळे मिटतो,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तो, नीतीने वागतो व सत्य बोलतो, जुलूमजबरी करून मिळणारा लाभ तुच्छ लेखतो; जो लाच नाकारतो, घातपातांचा कट करीत नाही व दुष्कृत्याकडे पाहत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 जे नीतीने चालतात आणि जे योग्य तेच बोलतात, जे पिळवणूक करून मिळविलेला लाभ नाकारतात आणि लाच घेण्यापासून त्यांचे हात लांब ठेवतात, खुनाच्या कारस्थानाबाबत जे त्यांचे कान बंद ठेवतात दुष्टतेचा बेत करण्याबाबत त्यांचे डोळे बंद करतात—

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 33:15
43 Iomraidhean Croise  

माझे पाऊल आडमार्गावर पडले असले, माझ्या मनाने माझ्या डोळ्यांमागून धाव घेतली असली, माझ्या हातांना काही डाग लागला असला,


जे त्याच्या न्यायानुसार वागतात, आणि सर्वदा नीती आचरतात, ते धन्य!


निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळव. तुझ्या मार्गांत मला नवजीवन दे.


आपला पैसा वाढीदिढीला लावत नाही, निरपराध्यांची हानी करण्याकरता लाच घेत नाही, तो; जो असा वागतो तो कधी ढळणार नाही.


माझ्या मुला, पापी जन तुला भुलथाप देतील तर तिला वश होऊ नकोस.


तर माझ्या मुला, त्यांच्या मार्गाने तू जाऊ नकोस; त्यांच्या वाटेत आपले पाऊल पडू देऊ नकोस.


सात्त्विकपणे चालणारा निर्भयपणे चालतो; कुटिल मार्गांनी चालणारा कळून येईल.


धनलोभी आपल्या कुटुंबाला त्रास देतो, पण ज्याला लाचेचा तिटकारा असतो तो वाचतो.


दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, जुवाच्या दोर्‍या सोडाव्यात, जाचलेल्यांना मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय?


असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातेप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी नीतिमत्ता तुझ्यापुढे चालेल व परमेश्वराचा गौरव तुझा पाठीराखा होईल.


ह्यास्तव पाहा, तू अन्यायाने केलेल्या कमाईमुळे, आणि तुझ्यातल्या रक्तपातामुळे मी आपला हात आपटत आहे.


त्याच्या मुखात सत्याचे नियमशास्त्र होते, त्याच्या वाणीत कुटिलता आढळली नाही; तो माझ्याबरोबर शांतीने व सरळतेने वागला, व त्याने अनेकांना अधर्मापासून वळवले.


तेव्हा मोशेचा कोप भडकला. तो परमेश्वराला म्हणाला, “त्यांच्या अर्पणाची दखल घेऊ नकोस; मी त्यांचे एक गाढवही घेतलेले नाही.”


“मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल?” ‘त्यांनी’ त्याला ‘तीस रुपये तोलून दिले.’


ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती.


तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यांस देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो.”


म्हणजे जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच;


विपरीत न्याय करू नये, पक्षपात करू नये आणि लाच घेऊ नये, कारण लाच शहाण्यांचे डोळे आंधळे करते आणि नीतिमानाच्या दाव्यांचा विपर्यास करते.


पाहा, ज्या कामकर्‍यांनी तुमची शेते कापली त्यांची ‘तुम्ही’ अडकवून ठेवलेली ‘मजुरी ओरडत आहे;’ आणि कापणी करणार्‍यांचा आक्रोश ‘सेनाधीश प्रभूच्या कानी’ गेला आहे.


मुलांनो, कोणी तुम्हांला बहकवू नये; जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणाराही नीतिमान आहे.


हा मी तुमच्यापुढे आहे, परमेश्वरासमक्ष व त्याच्या अभिषिक्तासमक्ष माझ्याविरुद्ध काही असेल तर सांगा; मी कोणाचा बैल घेतला आहे काय? कोणाचे गाढव घेतले आहे काय? कोणाला फसवले आहे काय? कोणावर बलात्कार केला आहे काय? डोळेझाक करण्यासाठी कोणाच्या हातून लाच घेतली आहे काय? असे काही असल्यास सांगा म्हणजे मी त्याची भरपाई करीन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan