Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 33:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 दूरच्या लोकांनो, मी काय केले ते ऐका; जवळच्या लोकांनो, माझे सामर्थ्य ओळखा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 जे तुम्ही फार दूर आहात, मी काय केले आहे ते ऐका; आणि जे तुम्ही जवळ आहात, ते तुम्ही माझे सामर्थ्य जाणून घ्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तुम्ही जे फार दूर आहात, मी काय केले आहे ते ऐका. तुम्ही जे जवळ आहात ते, माझे सामर्थ्य मान्य करा!

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 33:13
21 Iomraidhean Croise  

आणि त्याने आपल्या लोकांचा पुन्हा उत्कर्ष केला आहे;2 तो आपल्या सर्व भक्तांना, त्याच्याजवळ असलेल्या लोकांना म्हणजे इस्राएलाच्या संततीला स्तुतिपात्र आहे. परमेशाचे स्तवन करा!1


हे देवा, जसे तुझे नाव, तशी तुझी कीर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत जात आहे; तुझा उजवा हात न्यायपूर्ण आहे;


हे ऐकून सीयोन हर्षित झाली; हे परमेश्वरा, तुझ्या न्यायकृत्यांमुळे यहूदाच्या कन्यांनी उल्लास केला.


हे ऐकून राष्ट्रे कंपायमान झाली आहेत; पलेशेथवासी भयभीत झाले आहेत.


अहो भूतलवासी अखिल जनहो, पृथ्वीवरील रहिवाशांनो, पर्वतांवर ध्वज उभारण्यात येईल तेव्हा तुम्ही पाहा; तुतारी वाजवण्यात येईल तेव्हा ऐका.


आता परमेश्वरा, आमच्या देवा, त्याच्या हातांतून आम्हांला सोडव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राज्ये जाणतील की तूच काय तो परमेश्वर आहेस.”


द्वीपांनो, माझे ऐका; दूरदूरच्या राष्ट्रांनो, कान द्या; मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलावले; मी मातेच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझे नाव घेतले.


परमेश्वराने सर्व राष्ट्रांपुढे आपल्या पवित्र हाताची अस्तनी मागे सारली आहे;1 सगळ्या दिगंतांना आमच्या देवाने केलेले तारण दिसून येत आहे.


मी त्याच्या तोंडून आभारवचन उच्चारवीन, जे दूर आहेत व जे जवळ आहेत, त्यांना शांती असो, शांती असो; मी त्यांना सुधारीन असे परमेश्वर म्हणतो.


आणि राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार व राजमंत्री जे तेथे जमले होते त्यांनी ह्या पुरुषांना पाहिले तेव्हा त्यांच्या शरीरावर अग्नीचा परिणाम झाला नव्हता, त्यांच्या डोक्याचा एक केसही होरपळला नव्हता, त्यांच्या पायमोजांना काही झाले नव्हते आणि अग्नीचा गंधही त्यांना लागला नव्हता.


आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल; मी तुझा वध करीन, व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज पलिष्टी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना देईन; तेव्हा इस्राएलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीला कळून येईल;


Lean sinn:

Sanasan


Sanasan