Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 32:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 अहो सुखात राहणार्‍या स्त्रियांनो, उठा, माझी वाणी ऐका; अहो निश्‍चिंत कन्यांनो, माझ्या बोलण्याकडे कान द्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तुम्ही ज्या निर्धास्तपणे राहणाऱ्या स्त्रियांनो उठा, आणि माझी वाणी ऐका; अहो निश्चिंत कन्यांनो, माझे ऐका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 आळसात लोळत पडणार्‍या स्त्रियांनो, उठा व माझे ऐका; हे निश्चिंत असणाऱ्या कन्यांनो, मी काय सांगतो याकडे लक्ष द्या!

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 32:9
15 Iomraidhean Croise  

सुखवस्तू लोकांनी केलेला उपहास आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे.


कान देऊन माझी वाणी ऐका, लक्ष लावून माझे वचन ऐका.


परमेश्वर असेही म्हणतो : सीयोनेच्या कन्या गर्विष्ठ आहेत, त्या मान ताठ करून व डोळे मारत चालतात, आपल्या पायांतील नूपुरांचा छमछम आवाज करीत ठुमकत चालतात;


कारण सीयोनेतून आक्रंदनाचा शब्द ऐकू येत आहे; ‘आम्हांला कसे नागवले आहे! आमची कशी फजिती उडाली आहे! आम्ही देश त्यागला आहे, कारण त्यांनी आमची घरे पाडली आहेत.”’


स्त्रियांनो, परमेश्वराचे वचन ऐका, त्याच्या तोंडचे शब्द तुमचे कान स्वीकारोत; तुम्ही आपल्या कन्यांना विलापगीत शिकवा. एकमेकींना शोकगीत शिकवा.


जे पूर्वी पक्‍वान्ने खात ते रस्त्यात दुर्बल होऊन पडले आहेत; किरमिजी पोशाखात जे वाढले ते उकिरड्यांना आलिंगन देत आहेत.


हीच ती उल्लासी, निर्धास्त असलेली नगरी! ती आपल्या मनात म्हणत असे की मीच काय ती आहे, दुसरे कोणी नाही; ती कशी ओसाड, पशू बसण्याची जागा झाली आहे! तिच्याजवळून जाणारा प्रत्येक जण तिची छीथू करील व तिच्याकडे हातवारे करील.


ज्याला कान आहेत तो ऐको.”


तसेच तुझ्यातील एखादी स्त्री इतकी कोमल व नाजूक असेल, की ती आपल्या कोमलपणामुळे व नाजुकपणामुळे जमिनीला आपले तळपाय लावण्याचे धैर्य करणार नाही; तीदेखील आपला प्राणप्रिय पती, पुत्र व कन्या;


हे वर्तमान ऐकून योथाम हा गरिज्जीम डोंगराच्या शिखरावर गेला व उभा राहून मोठ्याने म्हणाला, “शखेमकरांनो, माझे ऐका म्हणजे देव तुमचे ऐकेल,


Lean sinn:

Sanasan


Sanasan