Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 32:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 भ्रष्टाचार करावा, परमेश्वराविरुद्ध पाखंड सांगावे, भुकेला जीव भुकेला ठेवावा, तान्हेल्यास प्यायला काही मिळू देऊ नये म्हणून मूर्ख मूर्खतेचे भाषण करतो, त्याचे मन अधर्म करते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 कारण मूर्ख मनुष्य आपल्या मनात मूर्खपणाच्या गोष्टी बोलतो आणि वाईट गोष्टींचे बेत आखतो आणि तो दुष्कृत्ये आणि देवविरहीत चुकीच्याच गोष्टी परमेश्वराविरूद्ध बोलतो. तो भुकेलेल्यांना अन्न खाऊ देत नाही आणि तहानेलेल्यांना पाणी पिऊ देत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 मूर्ख लोक मूर्खपणाच्या गोष्टी करतात, त्यांचे अंतःकरण वाईट कृत्य करण्यावरच केंद्रित असते: ते देवहीनतेची कृत्ये करतात आणि याहवेहविरुद्ध चुकीच्या गोष्टी पसरवितात; भुकेल्यांना ते उपाशी सोडतात आणि व तान्हेल्या जिवांना पाण्यापासून वंचित ठेवतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 32:6
33 Iomraidhean Croise  

अनीती करणार्‍या मनुष्यांबरोबर मी दुराचरण करू नये म्हणून माझे मन कोणत्याही वाईट गोष्टीकडे वळू देऊ नकोस; आणि मला त्यांची मिष्टान्ने खाऊ देऊ नकोस.


मनुष्याची मूर्खता त्याला मार्गभ्रष्ट करते, आणि त्याचे मन परमेश्वरावर रुष्ट होते.


ज्ञान मूर्खाच्या आटोक्याबाहेर असते; वेशीवर तो आपले तोंड उघडीत नाही.


ते दाद मागणार्‍या दुबळ्यांना धुडकावून लावतात व माझ्या प्रजेतल्या गरिबांचे हक्क बुडवतात; ते विधवांना लुटतात व पोरक्यांना नागवतात.


मी त्याला अधर्मी राष्ट्रावर पाठवीन. माझ्या क्रोधास पात्र झालेल्या लोकांची लूट हरण करावी, त्यांनी लुबाडलेल्या मत्तेचा अपहार करावा व त्यांना रस्त्यांवरील चिखलाप्रमाणे तुडवावे, अशी त्यांच्यासंबंधाने त्यास आज्ञा करीन.


दुर्जनांवर कृपा केली तरी तो नीती शिकायचा नाही; सरळांच्या राज्यातदेखील तो अधर्म करील; परमेश्वराचे ऐश्वर्य त्याला दिसायचे नाही.


तुम्ही माझ्या लोकांना चिरडता, दीनांचे तोंड ठेचता, हे काय?” असे प्रभू सेनाधीश परमेश्वर ह्याचे म्हणणे आहे.


तरी तोही सुज्ञ आहे, तो अरिष्ट आणील, आपली वचने मागे घेणार नाही; तर दुष्कर्म्यांच्या घराण्यावर व अधर्म करणारे ह्यांच्या कुमकेवर उठेल.


नीतिनियमांचे उल्लंघन, परमेश्वराचा अव्हेर, आमच्या देवास अनुसरण्यास माघार घेणे, छलसूचक व असत्य भाषण करणे, लबाडी मनात योजून ती बोलून दाखवणे, ही ती आहेत.


त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात; निर्दोष रक्तपात करण्यास त्वरा करतात; त्यांच्या कल्पना अधर्माच्या असतात; त्यांच्या मार्गात नाश व विध्वंस असतात.


ह्यामुळे प्रभू त्यांच्या तरुणांवर प्रसन्न होत नाही; त्यांचे अनाथ व विधवा ह्यांचा त्याला कळवळा येत नाही; कारण ते सर्व अधर्मी व कुकर्मी आहेत; प्रत्येक मुख मूर्खपणाच्या गोष्टी बोलते. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


कूशी माणसाला आपली कातडी, चित्त्याला आपले ठिपके पालटता येतील काय? असे घडेल तरच दुष्टतेला सवकलेल्या तुम्हांला चांगले आचरण करता येईल.


तुम्ही चांगला चारा खाऊन शेष राहिलेला पायांनी तुडवता; तुम्ही स्वच्छ पाणी पिऊन राहिलेले पायांनी गढूळ करता, हे काहीच नाही असे तुम्हांला वाटते काय?


पुष्कळ लोक आपणांस शुद्ध व शुभ्र करतील; ते स्वच्छ होतील; पण दुर्जन दुर्वर्तन करतील; दुर्जनांपैकी कोणाला समज मिळणार नाही; पण जे सुज्ञ आहेत त्यांना तो प्राप्त होईल.


म्हणजे आम्ही रुपे देऊन दीनांना विकत घेऊ, एक जोडा देऊन गरिबांना विकत घेऊ व गव्हाचे भूस विकून टाकू.”


कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोर्‍या, खोट्या साक्षी, शिवीगाळी ही निघतात.


अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता; तुम्ही स्वतःही आत जात नाही व आत जाणार्‍यांनाही आत जाऊ देत नाही.


देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटांत समाचार घेणे, व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.


प्राचीन काळच्या लोकांची म्हण आहे की दुष्टांपासून दुष्टता उद्भवते, पण माझा हात आपल्यावर पडणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan