Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 32:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तेव्हा पाहणार्‍यांचे डोळे मंद होणार नाहीत; ऐकणार्‍यांचे कान ऐकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तेव्हा जे हे पाहतील त्यांचे डोळे मंदावणार नाही आणि ऐकणाऱ्यांचे कान हे लक्षपूर्वक ऐकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तेव्हा पाहणाऱ्यांचे डोळे बंद राहणार नाहीत, आणि ज्यांच्या कानांना ऐकू येते ते ऐकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 32:3
14 Iomraidhean Croise  

त्या दिवशी लेखातील शब्द बहिरे ऐकतील व अंधळ्यांचे डोळे काळोख व अंधार ह्यांपासून मुक्त होऊन पाहतील.


भ्रांत मनाचे लोक सुज्ञान पावतील व कुरकुर करणारे नीतिशिक्षण घेतील.”


ज्या दिवशी परमेश्वर आपल्या लोकांचे घाव बांधील, त्यांच्या प्रहाराच्या जखमा बर्‍या करील, त्या दिवशी चंद्रप्रकाश सूर्यप्रकाशासारखा आणि सूर्यप्रकाश सात दिवसांच्या प्रकाशाएवढा सातपट होईल.


माहीत नाही अशा रस्त्याने मी आंधळ्यांना नेईन; अज्ञात अशा मार्गांनी मी त्यांना चालवीन; त्यांच्यापुढे अंधकार प्रकाश होईल व उंचसखल जागा सपाट मैदान होईल असे करीन. ह्या गोष्टी मी करणार, सोडणार नाही.


तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील; तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल.


परमेश्वर म्हणतो, ह्यापुढे कोणी आपल्या शेजार्‍यास, कोणी आपल्या बंधूस, परमेश्वराला ओळखा, असा बोध करणार नाहीत; कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील; मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी ह्यापुढे स्मरणार नाही.”


त्याने त्यांना उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हांला दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही.


आणि ते अतिशय थक्क होऊन म्हणाले, “त्याने सर्वकाही चांगले केले आहे; हा बहिर्‍यांना ऐकण्याची व मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो.”


मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावेस, आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.’


कारण “अंधारातून उजेड प्रकाशित होईल” असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan