Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 32:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 कारण राजभुवन ओस होईल, गजबजलेले शहर सुने पडेल; टेकडी व टेहळणीचा बुरूज ही सदासर्वदा गुहा बनतील, तेथे रानगाढवांचे क्रीडास्थान व कळपांची चरण होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 कारण महाल सोडून दिले जातील, गर्दीची शहरे ओस पडतील; टेकडी व टेहळणीचा बुरूज सर्वकाळपर्यंत गुहा होईल, रान गाढवांचा आनंद, कळपांची कुरणे होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 गडाचा त्याग करण्यात येईल, गजबजलेली शहरे रिकामी होतील; किल्ले व टेहळणी बुरूज कायमची पडीक स्थाने होतील, जिथे रानगाढवांचे व शेरडेमेंढरांचे कळप आनंदात चरतील,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 32:14
27 Iomraidhean Croise  

त्याने परमेश्वराचे मंदिर व राजवाडा जाळून टाकला, तशीच यरुशलेमेतली सगळी मोठमोठी घरे जाळून टाकली.


ह्यानंतर त्याने दावीदपुराच्या बाहेर गीहोनाच्या पश्‍चिमेस खोर्‍यात मत्सवेशीपर्यंत एक कोट बांधला, ओफेलाभोवती कोट बांधून तो उंच केला आणि यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांत त्याने सेनानायक ठेवले.


(नथीनीम हे ओफेलात, पूर्वेकडल्या पाणीवेशीसमोर व पुढे आलेल्या बुरुजापर्यंत राहत होते.)


ते सर्व वनपशूंना प्यायला पाणी पुरवतात; त्यांवर रानगाढवे आपली तहान भागवतात.


हे गोंगाटाने भरलेल्या, गजबजलेल्या शहरा, उत्सवशब्द करणार्‍या नगरा, तुझ्यातील वध पावलेले तलवारीने वधले नाहीत, युद्धात मारले नाहीत.


व्यवस्थाभ्रष्ट नगर भंग पावले आहे; प्रत्येक घर बंद पडले आहे, कोणाचाही आत रिघाव होत नाही.


नगरात नुसती ओसाडी झालेली आहे; वेशीचा भुगाभुगा झाला आहे.


तू शहराला मोडतोडीचा ढीग बनवले आहेस; तटबंदीचा गाव धुळीस मिळवला आहेस; विदेशीयांच्या महालांनी भरलेले शहर नष्ट केले आहेस; त्याचा कधी जीर्णोद्धार होणार नाही.


तटबंदीचे शहर उजाड आहे; ते रानासारखे सोडून दिलेले व टाकलेले वसतिस्थान झाले आहे; तेथे वासरे चरतात, बसतात व तेथल्या फांद्या खाऊन टाकतात.


तेव्हा तिच्या वेशी आकांत करतील, शोकाकुल होतील व ती एकटी1 होऊन भुईवर बसेल.


सेनाधीश परमेश्वराने माझ्या कानात सांगितले : “बहुत मोठी व सुंदर घरे खरोखर ओसाड व लोकरहित होतील.


मी म्हणालो, “हे प्रभू, असे कोठवर?” तो म्हणाला, “नगरे निर्जन होतील, घरे निर्मनुष्य होतील, जमीन ओसाड व वैराण होईल,


त्या दिवशी असे होईल की जेथे जेथे हजार रुपये किमतीचे हजार द्राक्षींचे वेल असत तेथे तेथे काटेकुटे होतील.


रानगाढवे उजाड टेकड्यांवर उभी राहून कोल्ह्यांप्रमाणे धापा टाकीत आहेत, झाडपाला काहीएक नसल्यामुळे त्यांचे डोळे खोल गेले आहेत.


ह्या शहराची घरे व यहूदाच्या राजांची घरे मोर्चे व तलवार ह्यांच्या निवारणार्थ मोडून टाकली आहेत, त्यांविषयी परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो,


बाबेलच्या राजाने त्यांना हमाथ देशातील रिब्ला येथे मार देऊन ठार केले. ह्या प्रकारे यहूदी लोकांना त्यांच्या देशातून कैद करून नेले.


“उठा, आपण रात्री चढाई करून तिच्या वाड्यांचा नाश करू.”


नाहीतर मी तिला वस्त्ररहित करून ती जन्माच्या दिवशी होती तशी तिला नग्न ठेवीन, तिला वैराणासारखी करीन, तिला निर्जल भूमीसारखी ठेवीन, तिला तहानेने ठार मारीन.


म्हणून तुमच्यामुळे सीयोन शेताप्रमाणे नांगरतील, यरुशलेम नासधुशीचा ढीग होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल.


हीच ती उल्लासी, निर्धास्त असलेली नगरी! ती आपल्या मनात म्हणत असे की मीच काय ती आहे, दुसरे कोणी नाही; ती कशी ओसाड, पशू बसण्याची जागा झाली आहे! तिच्याजवळून जाणारा प्रत्येक जण तिची छीथू करील व तिच्याकडे हातवारे करील.


तो प्रदेश यहूदी घराण्याच्या अवशेषासाठी होईल; तेथे ते आपली मेंढरे चारतील; अष्कलोनाच्या घरातून ते संध्याकाळी बिर्‍हाडास राहतील. कारण परमेश्वर त्यांचा देव त्यांना भेट देईल व त्यांचा बंदिवास उलटवील.


परंतु यरुशलेमेस सैन्याचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा.


ते तलवारीच्या धारेने पडतील, त्यांना बंदिवान करून सर्व राष्ट्रांमध्ये नेतील, आणि परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत ‘परराष्ट्रीय यरुशलेमेस पायांखाली तुडवतील.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan