Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 32:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 सुखात राहणार्‍या स्त्रियांनो, थरथर कापा, निश्‍चिंत असणार्‍यांनो, घाबर्‍या व्हा, वस्त्रे फेडा, उघड्या होऊन, कंबरेस गोणपाट गुंडाळा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तुम्ही आरामात राहणाऱ्या स्त्रियांनो, थरथर कापा; तुम्ही आत्मविश्वास असणाऱ्यांनो, अस्वस्थ व्हा; आपली तलम चांगली वस्त्रे काढा आणि आपल्याला उघडे करा; आपल्या कमरेभोवती तागाची वस्त्रे गुंडाळा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 आत्मसंतुष्ट स्त्रियांनो, थरथर कापा; निश्चिंत असलेल्या कन्यांनो, तुमचा थरकाप होऊ द्या! आपली सुंदर वस्त्रे काढून शोक करण्यासाठी गोणपाट गुंडाळा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 32:11
23 Iomraidhean Croise  

सुखवस्तू लोकांनी केलेला उपहास आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे.


लोक हे अशुभ वर्तमान ऐकून विलाप करू लागले; व कोणीही आपले दागदागिने अंगावर घातले नाहीत.


आपल्या पेठांत ते गोणपाट नेसून आहेत; आपल्या धाब्यांवर व चौकांत ते सगळे आकांत करत आहेत, अश्रू ढाळत आहेत.


परमेश्वर पृथ्वीस भयकंपित करण्यास उठेल तेव्हा त्याच्या भयप्रद दृष्टीपुढून व त्याच्या ऐश्वर्याच्या प्रतापापुढून लोक खडकांतल्या गुहांत व भूमीच्या विवरांत शिरतील.


परमेश्वर पृथ्वीस भयकंपित करण्यास उठेल तेव्हा त्याच्या भयप्रद दृष्टीपुढून व त्याच्या ऐश्वर्याच्या प्रतापापुढून ते खडकांतल्या गुहांत व दगडांतल्या कपारींत शिरतील.


तसा अश्शूर देशाचा राजा मिसरातील बंदिवान व कूशाचे हद्दपार केलेले तरुण व म्हातारे ह्यांना उघडे, अनवाणी व उघड्या कुल्ल्यांनी, मिसर देश फजीत व्हावा म्हणून घेऊन जाईल.


त्या दिवशी तुम्ही रडावे, शोक करावा, केस तोडावे, गोणपाट नेसावे असे प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याने सांगितले होते;


आणि मधुर सुवासाच्या जागी कुजल्याची घाण, कंबरपट्ट्यांच्या जागी दोरी, वेणीफणी केलेल्या केसांच्या जागी टक्कल, झग्याच्या जागी गोणपाटाचे वेष्टण व सौंदर्याच्या जागी वण असे होईल.


सीयोनेतील पातकी घाबरले आहेत. अधर्म्यांना कापरे भरले आहे. “भस्म करणार्‍या अग्नीसमीप आमच्यातला कोण राहील? सर्वकाळ पेटत राहणार्‍या अग्नीसमीप आमच्यातला कोण टिकेल?”


अगे विलासिनी, जी तू निश्‍चिंत बसतेस व मनात म्हणतेस, “मीच आहे, माझ्यावेगळी कोणी नाही, मी विधवा होणार नाही, अपत्यहीनतेचा अनुभव मला घडणार नाही,” ती तू हे ऐक :


म्हणून तुम्ही कंबरेस गोणपाट गुंडाळा, शोक व आक्रंदन करा; कारण आमच्यावरला परमेश्वराचा तीव्र कोप अजून गेला नाही.”


हे हेशबोना, हायहाय कर! कारण आय उजाड केलेले आहे; राब्बाच्या कन्यांनो, रडा! आपल्या अंगाला गोणपाट गुंडाळा, शोक करा, आवारातून इकडून तिकडे धावा; कारण मिलकोम दैवत, त्याचे याजक व सरदार ह्यांच्यासह, बंदिवान होऊन जाईल.


माझ्या लोकांच्या कन्ये, कंबरेला गोणपाट गुंडाळ, राखेत लोळ; एकुलत्या एका मुलाविषयीच्या शोकाप्रमाणे शोक व आक्रंदन कर; कारण लुटारू आमच्यावर एकाएकी येईल.


नाहीतर मी तिला वस्त्ररहित करून ती जन्माच्या दिवशी होती तशी तिला नग्न ठेवीन, तिला वैराणासारखी करीन, तिला निर्जल भूमीसारखी ठेवीन, तिला तहानेने ठार मारीन.


तरुण स्त्री गोणपाट नेसून आपल्या तरुणपणाच्या पतीकरता शोक करते तसा शोक करा.


“ह्यास्तव, हे इस्राएला, मी तुला असेच करीन; मी तुला असेच करीन, म्हणून हे इस्राएला, आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध हो.”


हीच ती उल्लासी, निर्धास्त असलेली नगरी! ती आपल्या मनात म्हणत असे की मीच काय ती आहे, दुसरे कोणी नाही; ती कशी ओसाड, पशू बसण्याची जागा झाली आहे! तिच्याजवळून जाणारा प्रत्येक जण तिची छीथू करील व तिच्याकडे हातवारे करील.


म्हणून तू भुकेला, तहानेला, नग्न आणि सर्व बाबतींत गरजवंत होऊन, ज्या तुझ्या शत्रूंना परमेश्वर तुझ्यावर पाठवील त्यांचे तुला दास्य करावे लागेल; तुझा नाश करीपर्यंत तो तुझ्या मानेवर लोखंडी जूं ठेवील.


तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला; ‘वधाच्या दिवशी’ तुम्ही आपल्या मनाची तृप्ती केली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan