Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 32:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 पाहा, राजा धर्माने राज्य करील, त्याचे सरदार न्यायाने सत्ता चालवतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 पाहा, राजा सदाचाराने राज्य करील, आणि त्याचे सरदार न्यायाने सत्ता चालवतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 पाहा, एक राजा धार्मिकतेने राज्य करेल आणि राज्यकर्ते न्यायाने सत्ता चालवितील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 32:1
24 Iomraidhean Croise  

इस्राएलाचा देव म्हणाला, इस्राएलाचा दुर्ग मला म्हणाला, मानवांवर न्यायाने राज्य करणारा, देवाचे भय धरून त्यांच्यावर राज्य करणारा निर्माण होईल.


माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे; राजाविषयी जे काव्य मी रचले ते मी म्हणून दाखवतो; माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे.


राजाचे सामर्थ्य न्यायप्रिय आहे; तू सरळता प्रस्थापित केली आहेस; तू याकोबात न्याय व नीती अंमलात आणली आहेस.


तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करील, आणि पृथ्वीवरील दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील; तो आपल्या मुखरूप वेत्राने पृथ्वीला ताडन करील, आपल्या मुखाच्या फुंकराने दुर्जनांचा संहार थकरील.


नीतिमत्ता त्याचे वेष्टन व सत्यता त्याचा कमरबंद होईल.


वात्सल्याचे सिंहासन स्थापले आहे; त्यावर दाविदाच्या डेर्‍यात कोणीएक सत्यनिष्ठ विराजमान होईल; तो न्याय करणारा, न्यायप्रिय, नीतिमत्तेत निपुण असा असेल.”


न्यायासनावर बसणार्‍याला न्यायस्फूर्ती, वेशीवर हल्ला करणार्‍या शत्रूला हटवणार्‍यांना वीरश्री असा तो होईल.


परमेश्वर उन्नत झाला आहे, उच्च स्थानी राहून त्याने सीयोन न्यायशीलतेने व नीतिमत्तेने भरले आहे.


आणि दिवसा ऊन लागू नये, सावली व्हावी; आणि वादळ व पाऊस ह्यांपासून रक्षण होण्यासाठी निवारा व आश्रय असावा म्हणून मंडप घालण्यात येईल.


परमेश्वर म्हणतो, पाहा, इस्राएलाच्या घराण्याविषयी व यहूदाच्या घराण्याविषयी जे हितकर वचन मी सांगितले ते पूर्ण करण्याचे दिवस येत आहेत.


त्या दिवसांत व त्या समयी दाविदाला नीतिमत्तेचा एक अंकुर फुटेल असे मी करीन, त्या देशात न्याय व नीतिमत्ता चालवील.


माझा सेवक दावीद त्यांच्यावर राजा होईल, त्या सर्वांचा एकच मेंढपाळ होईल; ते माझ्या निर्णयांप्रमाणे चालतील आणि माझे नियम पाळून त्यांप्रमाणे वर्ततील.


सीयोनकन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; यरुशलेमकन्ये, गजर कर; पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे; गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे.


अशासाठी की, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले तसे कृपेने नीतिमत्त्वाच्या योगे सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या द्वारे राज्य करावे.


हे कोकर्‍याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यांना जिंकील, कारण तो ‘प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे;’ आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू आहेत.”


‘नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला’, तो पाहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. ‘तो नीतीने न्यायनिवाडा करतो’ व लढतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan