Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 31:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 पक्षी जसे पाखर घालतात तसा सेनाधीश परमेश्वर यरुशलेमेचे रक्षण करील; तो तिचा बचाव करून तिला सोडवील, तो तिला ओलांडून तिला सुरक्षित राखील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 ज्याप्रमाणे पक्षी घिरट्या घालतो तसा सेनाधीश परमेश्वर यरूशलेमचे रक्षण करील; तो तिचे रक्षण करील आणि तो तिच्यावरून ओलांडून जाऊन तिला वाचवील व सुरक्षित ठेविल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 ज्याप्रमाणे पक्षी डोक्यावर घिरट्या घालतात, त्याप्रमाणे सर्वसमर्थ याहवेह यरुशलेमची ढाल होतील; ते तिला संरक्षण देऊन सोडवतील, ते त्यांना ओलांडून जातील आणि त्याला सोडवतील आणि त्याचा बचाव करतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 31:5
18 Iomraidhean Croise  

आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता.


मी आपल्यासाठी व माझा सेवक दावीद ह्याच्यासाठी ह्या नगराचा उद्धार होईल असे ह्याचे संरक्षण करीन.”


ह्या प्रकारे परमेश्वराने हिज्कीयाला व यरुशलेमकरांना अश्शूरचा राजा सन्हेरीब ह्याच्या हातातून व इतर सर्वांच्या हातातून वाचवले, आणि तो त्यांना सर्व बाजूंनी मार्गदर्शक झाला.


परमेश्वर त्यांना साहाय्य करतो व त्यांना मुक्त करतो; त्यांना दुर्जनांपासून मुक्त करतो व तारतो, कारण त्यांनी त्याचा आश्रय घेतला आहे.


त्या नगरीच्या ठायी देव आहे; ती ढळावयाची नाही; प्रभात होताच देव तिला साहाय्य करील.


राष्ट्रे खवळली, राज्ये डळमळली; त्याने गर्जना केली तो पृथ्वी विरघळून गेली.


तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखांखाली तुला आश्रय मिळेल; त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे.


तेव्हा तुम्ही सांगा की, हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे; त्याने मिसरी लोकांना मारले व आमच्या घरांचा बचाव केला त्या समयी तो मिसरातील इस्राएलांची घरे ओलांडून गेला.” हे ऐकून लोकांनी मस्तके लववून दंडवत घातले.


मी मिसर्‍यांचे काय केले ते व तुम्हांला गरुडाच्या पंखांवर बसवून मी आपणाकडे कसे आणले आहे हे तुम्ही पाहिले आहे;


पक्ष्याच्या कोट्याप्रमाणे राष्ट्रांचे धन माझ्या हाती लागले आहे; पक्ष्यांनी टाकून दिलेली अंडी कोणी गोळा करतो त्याप्रमाणे सर्व पृथ्वी मी हस्तगत केली आहे; तेव्हा कोणी पंख फडफडवले नाहीत, तोंड उघडले नाही, चिवचिव केली नाही,”


त्या दिवशी यहूदा देशात हे गीत गातील : आमचे नगर तटबंदी केलेले आहे; तारण हेच त्याचे कोट व तट नेमले आहेत.


त्याची निगा ठेवणारा मी परमेश्वर; मी त्याला घडोघडी पाणी घालतो; त्याला कोणी उपद्रव करू नये म्हणून मी त्याची रात्रंदिवस राखण करतो.


घाबर्‍या मनाच्यांस म्हणा, “धीर धरा, भिऊ नका; पाहा, तुमचा देव सूड घेण्यास, अनुरूप असे प्रतिफल देण्यास येईल;” तो येईल व तुमचा उद्धार करील.


आपल्यासाठी व माझा सेवक दावीद ह्याच्यासाठी ह्या नगराचा बचाव होईल असे मी ह्याचे रक्षण करीन.”


मी तुला व ह्या नगराला अश्शूराच्या राजाच्या हातातून सोडवीन, ह्या नगराचे संरक्षण करीन.


त्यांच्यावरती परमेश्वर दृष्टीस पडेल, त्याचे बाण विद्युल्लतेसारखे सुटतील; प्रभू परमेश्वर रणशिंग फुंकील व दक्षिणेकडच्या वावटळीत कूच करील;


कोणी येऊजाऊ नये म्हणून मी सैन्य रोखण्यासाठी माझ्या मंदिराभोवती तळ देईन; जुलूम करणारा पुन्हा त्यांच्यावर चाल करून जाणार नाही; कारण आता मी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे.


गरुड पक्षीण आपले कोटे हलवते, आपल्या पिलांवर तळपत असते, आपले1 पंख पसरून त्यांवर त्यांना घेते व आपल्या पंखांवर वाहते,


Lean sinn:

Sanasan


Sanasan