Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 31:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मिसरी तर मानव आहेत, देव नाहीत; त्यांचे घोडे रक्तमांसाचे आहेत, आत्मरूप नाहीत; परमेश्वर आपला हात उगारील तेव्हा साहाय्यकर्ता ठोकर खाईल व साहाय्य पावलेलाही पडेल; ते सर्व एकंदर विनाश पावतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मिसर मनुष्य आहे देव नाही, त्यांचे घोडे मांस आहेत आत्मा नाही. जेव्हा परमेश्वर आपला हात बाहेर लांब करील, तेव्हा दोघेही त्यांना मदत करणारा अडखळेल आणि ज्याची मदत केली तो पडेल; दोघांचा नाश होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 परंतु इजिप्तचे लोक केवळ नश्वर आहेत आणि ते परमेश्वर नाहीत; त्यांचे घोडे मांसाचे आहेत आणि आत्म्याचे नाहीत. जेव्हा याहवेह त्यांचा हात पुढे करतात तेव्हा जे मदत करणारे ते अडखळतील, ज्यांना मदत मिळाली आहे ते पडतील. सर्वजण एकत्र नाश पावतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 31:3
25 Iomraidhean Croise  

मांसमय भुजांचा त्यांना आधार आहे, पण आम्हांला मदत करण्यास व आमच्या लढाया लढण्यास आमचा देव परमेश्वर आमच्याबरोबर आहे.” यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या ह्या बोलण्यावर सर्व प्रजेने भरवसा ठेवला.


मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे.


जयप्राप्तीसाठी घोडा केवळ व्यर्थ होय; त्याला आपल्या महाबळाने कोणाचा बचाव करता येणार नाही.


हे परमेश्वरा, त्यांना दहशत घाल; आपण केवळ मर्त्य आहोत असे राष्ट्रांना कळू दे. (सेला)


पारिपत्याच्या दिवशी व दुरून नाशकारक वादळ येईल तेव्हा काय कराल? तुम्ही साहाय्यार्थ कोणाकडे धाव घ्याल? आपले ऐश्वर्य कोठे ठेवून जाल?


तसा अश्शूर देशाचा राजा मिसरातील बंदिवान व कूशाचे हद्दपार केलेले तरुण व म्हातारे ह्यांना उघडे, अनवाणी व उघड्या कुल्ल्यांनी, मिसर देश फजीत व्हावा म्हणून घेऊन जाईल.


त्या दिवशी ह्या समुद्रतीरीचे रहिवासी म्हणतील, ‘पाहा, अश्शूरच्या राजापासून आम्हांला सोडवावे म्हणून आम्ही ज्याची अपेक्षा केली, ज्याच्याकडे आम्ही साहाय्यार्थ धावलो त्याची अशी गत झाली; मग आमचा निभाव कसा लागेल?”’


तुम्ही म्हणाला, “नाही! आम्ही घोड्यावर बसून पळू,” म्हणून तुम्हांला पळावे लागेल; तुम्ही म्हणाला, “आम्ही चपळ घोड्यांवर बसू,” म्हणून तुमचा पाठलाग करणारे चपळ बनतील.


तरी त्या लोकांबद्दल त्या सर्वांना लज्जा प्राप्त होईल, त्यांपासून त्यांना काही लाभ व्हायचा नाही, त्यांपासून त्यांना साहाय्य व उपयोग न होता लज्जा व अप्रतिष्ठा ह्या प्राप्त होतील.”


मिसराचे साहाय्य कवडीमोल व व्यर्थ ठरेल, म्हणून ह्या मिसरास “राहाब म्हणजे स्वस्थ बसणारे महामुख” असे नाव मी देतो.


पाहा, तो मिसर म्हणजे चेचलेला बोरू, त्यावर तू टेकतोस; त्यावर कोणी टेकला तर तो त्याच्या हातात शिरून बोचेल; जे कोणी मिसरी राजा फारो ह्याच्यावर टेकतात ते तसेच होतात.


माझ्या धन्याचा कनिष्ठ दर्जाचा एक तरी सरदार कसा पिटाळून लावशील? आणि तू रथ व स्वार मिळवण्याविषयी मिसरावर भिस्त ठेवतोस ना?


ह्यामुळे प्रभू त्यांच्या तरुणांवर प्रसन्न होत नाही; त्यांचे अनाथ व विधवा ह्यांचा त्याला कळवळा येत नाही; कारण ते सर्व अधर्मी व कुकर्मी आहेत; प्रत्येक मुख मूर्खपणाच्या गोष्टी बोलते. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


परमेश्वर म्हणतो, तू माझा त्याग केला आहेस; तू मागे फिरली आहेस, म्हणून मी आपला हात तुझ्यावर उगारून तुझा नाश करीन; मी अनुताप करून कंटाळलो आहे.


परमेश्वर असे म्हणतो, “जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंत:करण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे.


“मानवपुत्रा, सोरेच्या अधिपतीस सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, तुझे हृदय उन्मत्त होऊन तू म्हणतोस, ‘मी देव आहे, भर समुद्रात मी देवाच्या आसनावर बसलो आहे;’ पण तू देव नव्हेस, मानव आहेस; आपले चित्त देवाच्या चित्तासारखे आहे असा तू आव आणतोस;


तू आपल्या वधणार्‍यासमोर ‘मी देव आहे,’ असे म्हणशील काय? घायाळ करणार्‍याच्या हाती सापडलास तो तू देव नव्हेस, मानव आहेस.


धनुर्धार्‍याला उभे राहता येणार नाही; चपळ पायांच्या इसमाला आपला बचाव करता येणार नाही; घोडेस्वाराला आपला जीव वाचवता येणार नाही.


त्यांना असू द्या; ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडे आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan