Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 31:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तरी तोही सुज्ञ आहे, तो अरिष्ट आणील, आपली वचने मागे घेणार नाही; तर दुष्कर्म्यांच्या घराण्यावर व अधर्म करणारे ह्यांच्या कुमकेवर उठेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तोही ज्ञानी आहे आणि तो संकटे आणील व आपली वचने माघारी घेणार नाही. आणि तो दुष्टांच्या घराण्याविरूद्ध आणि जे कोणी पाप करणाऱ्यांच्या मदतीविरूद्ध उठेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तरीसुद्धा ते सुज्ञ आहेत आणि संकट आणू शकतात. ते त्यांचे शब्द मागे घेत नाहीत. जे दुष्टांना मदत करतात त्यांच्याविरुद्ध ते त्या दुष्ट राष्ट्राविरुद्ध उठाव करतील,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 31:2
37 Iomraidhean Croise  

त्याच्या2 ठायी ज्ञान व बल आहेत; युक्ती व समज ही त्याचीच आहेत.


सामर्थ्य व चातुर्य ही त्याला आहेत; भ्रांत होणारा व भ्रांत करणारा हे त्याच्या सत्तेत आहेत.


तो शहाण्यांस त्यांच्याच धूर्ततेने धरतो; कुटिलांच्या मसलतीचा तो त्वरित शेवट करतो.


किती हे पापिष्ट राष्ट्र! दुष्कर्माने भारावलेले लोक, दुर्जनांची संतती! ही आचारभ्रष्ट मुले! ह्यांनी परमेश्वराला सोडले आहे, इस्राएलाच्या पवित्र प्रभूला तुच्छ मानले आहे; ती वियुक्त होऊन मागे फिरली आहेत.


त्यांच्याबरोबर तुला मूठमाती मिळणार नाही, कारण तू आपल्या देशाची नासधूस केली व आपल्या प्रजेचा वध केला; कुकर्म्यांच्या वंशाचे नाव कधी मागे उरणार नाही.


आणि केदार देशातील धनुर्धारी वीरांची संख्या थोडीच उरेल; कारण परमेश्वर, इस्राएलाचा देव, हे बोलला आहे.”


सेनाधीश परमेश्वराने माझ्या कानात सांगितले आहे की, “तुम्ही मरावे ह्याशिवाय ह्या अन्यायाचे दुसरे प्रायश्‍चित्त खरोखर नाही,” असे प्रभू, सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


परमेश्वर आपले कार्य, आपले अपूर्व कार्य करण्यास, आपली कृती, आपली विलक्षण कृती सिद्धीस नेण्यास परासीम डोंगरावर उठल्याप्रमाणे उठेल, गिबोन खोर्‍यातल्याप्रमाणे क्षुब्ध होईल.


हेही सेनाधीश परमेश्वराकडून घडते, त्याची बुद्धी आश्‍चर्यकारक व त्याचे चातुर्य थोर आहे.


म्हणून फारोचा आश्रय तुम्हांला लज्जेस कारण होईल, व मिसराच्या छायेत लपणे तुम्हांला फजितीस कारण होईल.


मिसराचे साहाय्य कवडीमोल व व्यर्थ ठरेल, म्हणून ह्या मिसरास “राहाब म्हणजे स्वस्थ बसणारे महामुख” असे नाव मी देतो.


मिसरी तर मानव आहेत, देव नाहीत; त्यांचे घोडे रक्तमांसाचे आहेत, आत्मरूप नाहीत; परमेश्वर आपला हात उगारील तेव्हा साहाय्यकर्ता ठोकर खाईल व साहाय्य पावलेलाही पडेल; ते सर्व एकंदर विनाश पावतील.


भ्रष्टाचार करावा, परमेश्वराविरुद्ध पाखंड सांगावे, भुकेला जीव भुकेला ठेवावा, तान्हेल्यास प्यायला काही मिळू देऊ नये म्हणून मूर्ख मूर्खतेचे भाषण करतो, त्याचे मन अधर्म करते.


प्रकाशकर्ता, अंधाराचा उत्पन्नकर्ता, शांतीचा जनक व अरिष्टांचा उत्पादक मीच आहे; हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे.


ह्यामुळे प्रभू त्यांच्या तरुणांवर प्रसन्न होत नाही; त्यांचे अनाथ व विधवा ह्यांचा त्याला कळवळा येत नाही; कारण ते सर्व अधर्मी व कुकर्मी आहेत; प्रत्येक मुख मूर्खपणाच्या गोष्टी बोलते. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


त्याने पृथ्वी आपल्या सामर्थ्याने उत्पन्न केली, त्याने आपल्या बुद्धीने आकाश पसरले.


हे राष्ट्रांच्या राजा, तुला कोण भिणार नाही? हे तुला साजते; राष्ट्रांतील सर्व ज्ञात्यांत, त्यांच्या सर्व राज्यांत तुझ्यासमान कोणीच नाही.


मग यिर्मयाने दुसरा पट घेऊन नेरीयाचा पुत्र बारूख लेखक ह्याला दिला; तेव्हा यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याने जो ग्रंथ अग्नीत जाळून टाकला होता त्यातली सर्व वचने त्याने त्यावर यिर्मयाच्या सांगण्यावरून लिहिली, व त्यांत तशाच दुसर्‍या बहुत वचनांची भर घातली.


तेव्हा मिसर देशाचे सर्व रहिवासी समजतील की, मी परमेश्वर आहे; कारण इस्राएल घराण्याला मिसराचा केवळ बोरूसारखा आधार होता.


नगरात रणशिंग वाजवल्यास लोक घाबरायचे नाहीत काय? नगरावर विपत्ती आली असून ती परमेश्वराने आणली नाही असे होईल काय?


परमेश्वर म्हणतो, “मी लुटीसाठी उठेन तोवर माझी वाट पाहा. कारण राष्ट्रे एकत्र जमवावीत, राज्ये एकत्र मिळवावीत; त्यांच्यावर माझा क्रोध, माझा सर्व संतप्त क्रोध पडावा हा माझा निश्‍चय आहे; कारण माझ्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व पृथ्वी भस्म होईल.


असे असता माझे सेवक म्हणजे संदेष्टे ह्यांना जी वचने व नियम मी आज्ञापले होते त्यांनी तुमच्या पूर्वजांना गाठले नाही काय? तेव्हा त्यांनी वळून म्हटले, आमचा आचार व कर्मे ह्यांप्रमाणे आमचे करण्याचा सेनाधीश परमेश्वराचा मानस होता त्याप्रमाणे त्याने आमचे केले आहे.”


कोश पुढे जाण्यास निघाला म्हणजे मोशे म्हणत असे, “हे परमेश्वरा, ऊठ, तुझ्या शत्रूंची दाणादाण होवो आणि तुझे द्वेष्टे तुझ्यापुढून पळून जावोत.”


“बालाका, ऊठ, ऐकून घे; सिप्पोरपुत्रा, माझ्याकडे कान दे. देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी; तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा; दिलेले वचन तो पाळणार नाही काय? दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय?


आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत.


तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला सांगितलेल्या सर्व हिताच्या गोष्टी सिद्धीस गेल्या त्याप्रमाणेच अहिताचे प्रसंग परमेश्वर तुमच्यावर आणील आणि ही जी उत्तम भूमी तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला दिली आहे तिच्यामधून तुमचा नायनाट करील.


अशा आपल्या उद्धारक एकाच ज्ञानी देवाला, (येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या द्वारे) गौरव, महिमा, पराक्रम व अधिकार युगारंभापूर्वी, आता व युगानुयुग आहेत. आमेन.


गर्वाने एवढे फुगून आता बोलू नका, तुमच्या मुखातून उन्मत्तपणाचे भाषण न निघो; कारण परमेश्वर ज्ञाता देव आहे; तो सर्व कृती तोलून पाहतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan