यशायाह 31:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 जे साहाय्यार्थ खाली मिसर देशात जातात व घोड्यांवर भिस्त ठेवतात, आणि रथ बहुत आहेत व घोडेस्वार फार बळकट आहेत म्हणून त्यांवर भरवसा ठेवतात, पण इस्राएलाच्या पवित्र प्रभूकडे लक्ष देत नाहीत, परमेश्वराचा शोध करीत नाहीत, त्यांना हायहाय! Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 जे कोणी मदतीसाठी खाली मिसरमध्ये जातात आपल्या घोड्यांवर अवलंबून राहतात त्यांना हायहाय, आणि रथांवर (कारण ते पुष्कळ आहेत) आणि घोडस्वारांवर (कारण ते अगणित आहेत) भरवसा ठेवतात. परंतु ते परमेश्वराचा शोध घेत नाहीत किंवा ते इस्राएलाचा जो पवित्र त्याकडे लक्ष देत नाही! Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जे इजिप्तकडे मदतीसाठी जातात, जे घोड्यांवर अवलंबून असतात, त्यांचा धिक्कार असो, जे त्यांच्याकडील पुष्कळ रथांच्या संख्येवर आणि घोडेस्वारांच्या मोठ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतात, परंतु इस्राएलचे जे पवित्र परमेश्वराकडे पाहात नाहीत, किंवा याहवेहकडून मदत घेत नाहीत. Faic an caibideil |