Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 30:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तर आता चल, त्यांच्यासमक्ष हे पाटीवर लिही, टिपून ठेव म्हणजे ते पुढील पिढ्यांसाठी युगानुयुग राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 आता तू त्यांच्या उपस्थितीत पाटीवर लिही आणि पुस्तकावरही कोरून ठेव, अशासाठी की पुढल्या काळासाठी साक्षी म्हणून ते साठून राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 आता जा, त्यांच्यासाठी ते एका पाटीवर लिहा, चर्मपत्राच्या गुंडाळीवर ते कोरून टाका, म्हणजे येणाऱ्या दिवसात ते सर्वकाळासाठी साक्षीदार असेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 30:8
22 Iomraidhean Croise  

शेवटच्या दिवसांत असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल, आणि सर्व डोंगरांहून तो उंच होईल; त्याच्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील.


परमेश्वराच्या ग्रंथात शोधा, वाचा; ह्या प्राण्यांपैकी एकही कमी असणार नाही; कोणी जोडप्यावाचून असणार नाही; कारण माझ्याच मुखाने हे आज्ञापिले आहे, त्याच्या श्वासाने त्यांना एकत्र केले आहे.


परमेश्वराने मला म्हटले, “एक मोठी पाटी घेऊन तिच्यावर व्यावहारिक लिपीत असे लिही, महेर-शालाल-हाश-बज (लूट त्वरा करते, पारध घाई करते) ह्याविषयी.”


परमेश्वर आपले कार्य करीपर्यंत, आपला मनोदय पूर्ण करीपर्यंत, त्याचा संताप मागे फिरणार नाही; पुढील काळात तुम्हांला हे चांगले समजेल.


“परमेश्वर इस्राएलाचा देव असे म्हणतो की जी वचने मी तुला सांगितली ती सर्व पुस्तकात लिहून ठेव.


“तू ग्रंथ लिहिण्याचा पट घे; आणि योशीयाच्या दिवसांत मी तुझ्याबरोबर बोललो तेव्हापासून आजवर इस्राएल, यहूदा व सर्व राष्ट्रे ह्यांच्याविरुद्ध जी वचने मी तुला सांगितली ती त्यावर लिहून काढ.


तेव्हा यिर्मयाने नेरीयाचा पुत्र बारूख ह्याला बोलावले, व परमेश्वराने यिर्मयाला जी वचने सांगितली होती ती सर्व त्याच्या तोंडून ऐकून बारुखाने त्या पटावर लिहिली.


तरी पुढील काळी मी मवाबाचा बंदिवास उलटवीन, असे परमेश्वर म्हणतो.” येथे मवाबाच्या शासनाचे कथन संपले.


बाबेलवर जे सर्व अरिष्ट येणार होते ते म्हणजे बाबेलविरुद्ध जी वचने लिहिण्यात आली होती ती यिर्मयाने एका ग्रंथात लिहून ठेवली होती.


अभ्राने देश झाकावा तसा तू माझे लोक इस्राएल ह्यांच्यावर चाल करून येशील; हे गोगा, शेवटल्या दिवसांत असे घडेल की मी राष्ट्रांदेखत तुझ्या द्वारे आपली पवित्रता प्रकट करीन, तेव्हा राष्ट्रांनी मला ओळखावे म्हणून मी तुला माझ्या देशावर आणीन.


मग परमेश्वराने मला उत्तर दिले की, “हा दृष्टान्त लिहून काढ, पाट्यांवर ठळक लिही; म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे.


पाहा, आता मी आपल्या लोकांकडे जात आहेच, तरी चल, हे लोक शेवटल्या दिवसांत तुझ्या प्रजेचे काय काय करणार आहेत ते तुला सांगून ठेवतो.”


आता तुम्ही हे गीत लिहून घ्या, हे इस्राएल लोकांना शिकवा; त्यांना हे तोडपाठ करायला लावा, म्हणजे ते इस्राएल लोकांविरुद्ध माझ्या वतीने साक्ष देईल;


मोशेने त्याच दिवशी हे गीत लिहून घेतले व इस्राएल लोकांना शिकवले.


कारण मला ठाऊक आहे की, मी मेल्यावर तुम्ही अगदी बिघडून जाल; ज्या मार्गाने चालण्याची मी तुम्हांला आज्ञा केली आहे तो तुम्ही सोडून द्याल; परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते तुम्ही कराल व आपल्या हातच्या कृतीने त्याला चीड आणाल म्हणून पुढील काळी तुमच्यावर विपत्ती येऊन पडेल.”


तू संकटात पडलास आणि ही सर्व अरिष्टे तुझ्यावर आली म्हणजे शेवटी तू आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे वळशील आणि त्याची वाणी ऐकशील;


आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील;


प्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वत:च्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसांत थट्टा करत येऊन म्हणतील,


ते तुम्हांला असे सांगत असत की, “शेवटल्या काळी आपल्या कुवासनांप्रमाणे चालणारी कुटाळ माणसे निघतील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan