Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 30:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तरी त्या लोकांबद्दल त्या सर्वांना लज्जा प्राप्त होईल, त्यांपासून त्यांना काही लाभ व्हायचा नाही, त्यांपासून त्यांना साहाय्य व उपयोग न होता लज्जा व अप्रतिष्ठा ह्या प्राप्त होतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 कारण ते मदत करू न शकणाऱ्या, जे साहाय्य किंवा हित करणारे नाहीत तर लाज व निंदा असे आहेत त्यांच्यामुळे ते सर्व लाजवले जातील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तरी प्रत्येकाला लज्जित करण्यात येईल कारण त्यांच्यासाठी ते निरुपयोगी लोक आहेत, जे काहीही मदत किंवा लाभ आणत नाहीत. परंतु केवळ लज्जा आणि अपमान.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 30:5
7 Iomraidhean Croise  

पारिपत्याच्या दिवशी व दुरून नाशकारक वादळ येईल तेव्हा काय कराल? तुम्ही साहाय्यार्थ कोणाकडे धाव घ्याल? आपले ऐश्वर्य कोठे ठेवून जाल?


तुम्ही म्हणाला, “नाही! आम्ही घोड्यावर बसून पळू,” म्हणून तुम्हांला पळावे लागेल; तुम्ही म्हणाला, “आम्ही चपळ घोड्यांवर बसू,” म्हणून तुमचा पाठलाग करणारे चपळ बनतील.


मिसराचे साहाय्य कवडीमोल व व्यर्थ ठरेल, म्हणून ह्या मिसरास “राहाब म्हणजे स्वस्थ बसणारे महामुख” असे नाव मी देतो.


पाहा, तो मिसर म्हणजे चेचलेला बोरू, त्यावर तू टेकतोस; त्यावर कोणी टेकला तर तो त्याच्या हातात शिरून बोचेल; जे कोणी मिसरी राजा फारो ह्याच्यावर टेकतात ते तसेच होतात.


आपली चाल बदलून इकडून तिकडे का भटकतेस? तू अश्शूरामुळे खजील झालीस तशी मिसरामुळेही होशील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan