Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 30:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 आणि असे होईल की डफांचा व वीणांचा नाद होत असता परमेश्वर त्यांच्यावर नेमलेल्या दंडाचा प्रत्येक प्रहार करील व हात खालीवर करून त्यांच्याशी युद्ध करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 आणि काठीचा जो प्रत्येक फटका परमेश्वर त्याच्यावर मारील तो, डफ व वीणा वाजत असताना होईल, आणि हात खाली वर करीत युद्धांमध्ये तो त्यांच्याशी लढेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 याहवेह त्यांच्याकडील शिक्षेच्या दांड्याने त्यांच्यावर दिलेला प्रत्येक प्रहार डफ आणि वीणा यांच्या संगीतावर असेल, जसे ते त्यांच्या हाताच्या तडाख्याने युद्धामध्ये त्यांच्याशी लढतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 30:32
20 Iomraidhean Croise  

तू चोरून पळालास, मला फसवलेस, काही कळू दिले नाहीस, असे का केलेस? तू मला कळवले असतेस तर मी आनंदाने गाणेबजावणे करून, डफ, चंग वगैरे वाद्ये लावून तुला रवाना केले असते.


मांसमय भुजांचा त्यांना आधार आहे, पण आम्हांला मदत करण्यास व आमच्या लढाया लढण्यास आमचा देव परमेश्वर आमच्याबरोबर आहे.” यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या ह्या बोलण्यावर सर्व प्रजेने भरवसा ठेवला.


मी सुखाने राहत असता त्याने माझा चुराडा केला आहे. त्याने माझी मानगुट धरून मला आपटून माझे तुकडे केले आहेत; मला त्याने मारा करण्याचे निशाण केले आहे.


ह्यास्तव प्रभू, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “हे माझे सीयोननिवासी प्रजे, अश्शूर मिसराप्रमाणे तुला दंडाने ताडन करील व तुझ्यावर सोटा उचलील, तरी त्याला भिऊ नकोस.


ओरेब खडकाजवळ मिद्यानाची कत्तल झाली तेव्हाच्याप्रमाणे सेनाधीश परमेश्वर त्यावर चाबूक चालवील; तो आपली काठी समुद्रावर लांबवील; ती तो मिसराप्रमाणे त्यावर उगारील.


परमेश्वर मिसरी समुद्राची खाडी नष्ट करील; तो आपला उष्ण श्वास सोडून आपला हात नदावर (फरातावर) परजील; त्यावर प्रहार करून त्याचे सात फाटे करील; त्यांवरून लोकांना जोडे घालून जाता येईलसे करील.


त्या काळी मिसरी लोक बायकांसारखे होतील; सेनाधीश परमेश्वर त्यांच्यावर आपला हात उगारील त्यामुळे ते थरथर कापतील व भयभीत होतील.


परमेश्वर पृथ्वीस भयकंपित करण्यास उठेल तेव्हा त्याच्या भयप्रद दृष्टीपुढून व त्याच्या ऐश्वर्याच्या प्रतापापुढून लोक खडकांतल्या गुहांत व भूमीच्या विवरांत शिरतील.


पाहा, परमेश्वर पृथ्वी रिक्त करीत आहे, तिला ओसाड करीत आहे, तिला विरूप करीत आहे व तिच्या रहिवाशांची दाणादाण करीत आहे.


डफांचा हर्षनाद बंद पडला आहे, उत्सव करणार्‍यांचा कल्ला थांबला आहे, किनरीचा हर्षनाद बंद झाला आहे.


सण पाळताना जसा रात्री गायनाचा नाद उठतो तसा तुमच्या गायनाचा नाद उठेल; परमेश्वराच्या पर्वताकडे, इस्राएलाच्या दुर्गाकडे बासरी वाजवत समारंभाने जाणार्‍याप्रमाणे तुमच्या मनास उल्लास प्राप्त होईल.


परमेश्वर मला म्हणाला, “जसा सिंह, तरुण सिंह, आपल्या भक्ष्यावर गुरगुरत असता, मेंढरांची टोळी बोलावून त्याच्यावर घातली तरी त्यांच्या आरोळीने घाबरायचा नाही व त्यांच्या गोंगाटाने दबायचा नाही, तसा सेनाधीश परमेश्वर सीयोन डोंगरावर त्याच्या टेकडीवर लढायला उतरेल.”


हे इस्राएलाच्या कुमारी, मी तुझी पुनर्घटना करीन आणि तुझी घटना होईल; तू पुन्हा आपल्या खंजिर्‍यांनी भूषित होशील व उत्सव करणार्‍यांबरोबर नृत्य करशील.


देवाचा बाग एदेन ह्यात तू होतास; अलाक, पुष्कराज, हिरा, लसणा, गोमेद, यास्फे, नीलमणी, पाचू, माणिक, व सोने असे अनेक तर्‍हेचे जवाहीर तुझ्या अंगभर होते; खंजिर्‍या व बासर्‍या ह्यांचे कसब तुझ्या येथे चालत असे; तुला निर्माण केले त्या दिवशी त्यांची योजना झाली.


अनेक राष्ट्रे तुला पाहून भयचकित होतील असे मी करीन; मी आपली तलवार त्यांच्या राजांसमोर परजीन, तेव्हा ते थरथर कापतील; तुझ्या पतनाच्या दिवशी आपल्या जिवाच्या भीतीने त्यांचा क्षणोक्षणी थरकाप होईल.


त्या वेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलवली; परंतु त्याने दिलेले वचन आता असे आहे की, “‘आणखी एकदा मी’ केवळ ‘पृथ्वी’ नव्हे तर ‘आकाशही कापवीन.”’


मग तू देवाच्या टेकडीजवळ पोहचशील, तेथे पलिष्ट्यांचा चौकीपहारा आहे; तू तेथे नगराजवळ पोहचल्यावर संदेष्ट्यांचा एक समुदाय उच्च स्थानाहून उतरून येताना तुला भेटेल, त्यांच्यापुढे सतार, डफ, सनई व वीणा वाजत असतील; व ते भाषण करीत असतील.


त्या पलिष्ट्याचा वध करून दावीद परतल्यावर लोक माघारी येत असता इस्राएलाच्या सर्व नगरांतून स्त्रिया बाहेर निघाल्या आणि डफ व झांजा वाजवून मोठ्या आनंदाने गात व नाचत शौल राजाला सामोर्‍या आल्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan