Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 30:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 पाहा, परमेश्वराचे नाम दुरून येत आहे, त्याचा क्रोध भडकला आहे, धुराचा लोट चढत आहे; त्याचे ओठ क्रोधाने स्फुरत आहेत, त्याची जिव्हा भस्म करणार्‍या अग्नीसारखी आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 पाहा! परमेश्वराचे नाव त्याच्या क्रोधाने जळते, व दाट धुराच्या लोटाने दुरवरून येत आहे, त्याचे ओठ क्रोधाने भरले आहेत आणि त्याची जीभ खाऊन टाकणाऱ्या अग्नीप्रमाणे आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 पहा, धगधगत्या क्रोधाने आणि धुराच्या दाट ढगांबरोबर, याहवेहचे नाव फार लांबून येत आहे; त्यांचे ओठ क्रोधाने भरलेले आहेत, आणि त्यांची जीभ भस्म करणारा अग्नी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 30:27
26 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? तू सर्वकाळ कोपायमान राहणार काय? तुझा रोष अग्नीसारखा भडकत राहणार काय?


जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातातील सोटा माझा कहर आहे त्या अश्शूरास धिक्कार असो.


ते दूर देशातून, दिगंतापासून येत आहेत; परमेश्वर व त्याची क्रोधशस्त्रे देशाचा विध्वंस करण्यास येत आहेत.


राष्ट्रे भाजलेल्या चुनखडीसारखी भस्म होतील; काटेरी झुडपे तोडून आगीत जाळतात तशी ती होतील.”


सीयोनेतील पातकी घाबरले आहेत. अधर्म्यांना कापरे भरले आहे. “भस्म करणार्‍या अग्नीसमीप आमच्यातला कोण राहील? सर्वकाळ पेटत राहणार्‍या अग्नीसमीप आमच्यातला कोण टिकेल?”


त्याचे ओढे राळ बनतील, त्याची धूळ गंधक होईल व त्याचा देश राळेसारखा जळेल.


तू जलांतून चालशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन; नद्यांतून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत; अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस; ज्वाला तुला पोळणार नाही.


ते मावळतीपासून परमेश्वराच्या नामाचे भय बाळगतील, सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या प्रतापाचे भय बाळगतील; कारण शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा येईल तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्याविरुद्ध झेंडा उभारील.


ते पाहून तुमचे हृदय आनंदित होईल, कोवळ्या हिरवळीप्रमाणे तुमची हाडे तरतरीत होतील; परमेश्वराचा हात त्याच्या सेवकांच्या ठायी प्रकट होईल आणि त्याचा क्रोध शत्रूंवर होईल.


कारण पाहा, आपला क्रोध अग्नीच्या द्वारे प्रकट करावा, आपल्या धमकीबरोबर ज्वाला निघाव्यात म्हणून परमेश्वर अग्नीतून येईल, त्याचे रथ वावटळीसमान असतील.


युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्ध्यांचे जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सरपण झाली आहेत.


यहूदाचे लोकहो, यरुशलेमकरहो, परमेश्वराप्रीत्यर्थ आपली सुंता करा, आपल्या अंत:करणाची सुंता करा; नाहीतर तुमच्या कर्मांच्या दुष्टतेमुळे माझा क्रोध अग्नीसारखा भडकेल आणि तो कोणाच्याने विझणार नाही असा पेटेल.”


ह्यामुळे त्यांच्यावर मी आपल्या क्रोधाचा वर्षाव करीन; मी आपल्या कोपाग्नीने त्यांना भस्म करीन, त्यांच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्याच शिरी आणीन असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


त्याच्यासमोरून अग्निप्रवाह वाहत होता; हजारो लोक त्याची सेवा करीत होते; लाखो लोक त्याच्यासमोर उभे होते; न्यायसभा भरली; वह्या उघडल्या गेल्या.


मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराणपुरुष आसनारुढ झाला; त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता, त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते; त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते; व त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती.


परमेश्वर म्हणतो, “मी लुटीसाठी उठेन तोवर माझी वाट पाहा. कारण राष्ट्रे एकत्र जमवावीत, राज्ये एकत्र मिळवावीत; त्यांच्यावर माझा क्रोध, माझा सर्व संतप्त क्रोध पडावा हा माझा निश्‍चय आहे; कारण माझ्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व पृथ्वी भस्म होईल.


कारण सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत राष्ट्रांमध्ये माझे नाव थोर आहे, माझ्या नावाप्रीत्यर्थ प्रत्येक स्थळी धूप जाळतात व निर्दोष बली अर्पण करतात; कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये थोर आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


कारण माझ्या कोपाने आग लागली आहे, अधोलोकाच्या तळापर्यंत ती पसरली आहे, पृथ्वी व तिचा उपज ती भस्म करीत आहे, व डोंगरांचे पायथे जाळून टाकीत आहे.


तो म्हणाला, “परमेश्वर सीनायहून आला, सेईरावरून आमच्यावर1 उदय पावला; पारान पर्वतावरून तो प्रकटला, लक्षावधी पवित्रांच्या मधून तो आला, त्याच्या उजव्या हातापासून अग्निज्वाला निघाली.


कारण तुझा देव परमेश्वर हा भस्म करणारा अग्नी आहे; तो ईर्ष्यावान देव आहे.


मग तो अनीतिमान पुरुष प्रकट होईल, त्याला प्रभू येशू ‘आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकील’, आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करील.


कारण आपला ‘देव भस्म करणारा अग्नी आहे.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan