Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 30:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 ज्या दिवशी परमेश्वर आपल्या लोकांचे घाव बांधील, त्यांच्या प्रहाराच्या जखमा बर्‍या करील, त्या दिवशी चंद्रप्रकाश सूर्यप्रकाशासारखा आणि सूर्यप्रकाश सात दिवसांच्या प्रकाशाएवढा सातपट होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 त्यावेळी, चंद्राचा प्रकाश सूर्यप्रकाशाप्रमाणे प्रखर होईल आणि सूर्यप्रकाश जसा सात दिवसाचा प्रकाश तसा सात पट होईल. परमेश्वर त्याच्या जखमी लोकांस मलमपट्टी करील आणि माराने झालेल्या त्यांच्या जखमा बऱ्या करील तेव्हा असे घडेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 जेव्हा याहवेह त्यांच्या लोकांच्या जखमांना बांधतील आणि त्यांनी दिलेल्या जखमा बरे करतील, तेव्हा चंद्र सूर्यासारखा चमकेल आणि सूर्यप्रकाश सात पटीने तेजस्वी होईल, सात पूर्ण दिवसांच्या प्रकाशासारखा तो असेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 30:26
25 Iomraidhean Croise  

कारण दुखापत तो करतो आणि पट्टीही तोच बांधतो; घाय तो करतो आणि त्याचाच हात तो बरा करतो.


माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.


परमेश्वर मिसर देशास मारील; मारील व बरेही करील; ते परमेश्वराकडे वळतील आणि तो त्यांची विनंती ऐकेल व त्यांना बरे करील.


चंद्र तांबूस होईल, सूर्य फिक्का पडेल; कारण सेनाधीश परमेश्वर सीयोन डोंगरावर व यरुशलेमेत आपल्या प्रजेतील वडिलांसमोर वैभवाने राज्य करील.


म्हणून एकाएकी कोसळून पडणार्‍या उंच भिंतीच्या सुटलेल्या भागाप्रमाणे ह्या अधर्माचे तुम्हांला अकस्मात फळ मिळेल;


कुंभाराच्या मडक्याचा सपाट्यासरसा चुराडा होतो आणि पडलेल्या तुकड्यात आगटीतून विस्तव घेण्यास किंवा हौदातून पाणी घेण्यास खापरीही सापडत नाही, तसा तो त्याचा चुराडा करील.”


“मी रोगी आहे” असे एकही रहिवासी म्हणणार नाही; तेथे राहणारे पातकाची क्षमा पावतात.


मी त्याची चालचर्या पाहिली, मी त्याला सुधारीन; मी त्याला मार्ग दाखवीन, मी त्याचे, त्याच्यातल्या शोकग्रस्तांचे समाधान करीन.


असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातेप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी नीतिमत्ता तुझ्यापुढे चालेल व परमेश्वराचा गौरव तुझा पाठीराखा होईल.


प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे; कारण दीनांना शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे; भग्नहृदयी जनांना पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांना मुक्तता व बंदिवानांना बंधमोचन विदित करावे;


मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बर्‍या करीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण त्यांनी म्हटले आहे की, ‘हिला टाकून दिले आहे; ही सीयोन! हिला कोणी विचारत नाही.’


मी तुला बोधाच्या कोणत्या गोष्टी सांगू? हे यरुशलेमकन्ये, मी तुला कोणाची उपमा देऊ? हे सीयोनेच्या कुमारी कन्ये, तुझे सांत्वन करण्यासाठी मी तुझी कोणाबरोबर तुलना करू? तुझा विनाश सागरासारखा मोठा आहे; तुला कोण बरे करील?


“चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ; कारण त्याने आम्हांला फाडले आहे, व तोच आम्हांला बरे करील; त्याने आम्हांला जखम केली आहे व तोच पट्टी बांधील.


तो दोन दिवसांत आमचे पुनरुज्जीवन करील; तिसर्‍या दिवशी तो आम्हांला उठवून उभे करील; आणि त्याच्यासमोर आम्ही जिवंत राहू.


दाविदाचा पडलेला डेरा त्या दिवशी मी उभारीन व त्याची भगदाडे बुजवीन; त्याचे जे कोसळले आहे ते मी उभारीन; तो पूर्वकाली होता तसा तो बनवीन;


त्या दिवशी परमेश्वर यरुशलेमनिवाशांचे रक्षण करील; त्या दिवशी त्यांच्यातला निर्बल दाविदासमान होईल; व दाविदाचे घराणे देवासमान म्हणजे अर्थात त्यांच्या अग्रगामी परमेश्वराच्या दिव्यदूतासमान होईल.


तो एक विशेष दिवस होईल, तो परमेश्वरालाच ठाऊक; तो ना धड दिवस ना धड रात्र असा होईल; तरी असे होईल की संध्याकाळी प्रकाश राहील.


पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे त्या तुमच्यावर न्याय्यत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखांच्या ठायी आरोग्य असेल; तुम्ही गोठ्यातल्या वत्सांप्रमाणे बाहेर पडून बागडाल.


‘आता पाहा, मी, मीच तो आहे, माझ्याशिवाय कोणी देव नाही; प्राणहरण व प्राणदान करणारा मीच आहे. मी घायाळ करतो आणि मीच बरे करतो; माझ्या हातून सोडवणारा कोणी नाही.


नगरीला ‘सूर्यचंद्राच्या प्रकाशाची’ आवश्यकता नाही; कारण ‘देवाच्या तेजाने’ ती ‘प्रकाशित केली आहे;’ आणि हाच कोकरा तिचा दीप आहे.


पुढे रात्र असणार नाही आणि त्यांना दिव्याच्या अथवा ‘सूर्याच्या प्रकाशाची’ गरज नाही; कारण प्रभू देव त्यांच्यावर ‘प्रकाश पाडील; आणि ते युगानुयुग राज्य करतील.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan