Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 30:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तू भूमीत आपले बी पेरशील त्यावर तो पाऊस पाडील; भूमी पीक देईल ते अन्न रसभरीत व सत्त्वपूर्ण असेल; त्या काळी तुझी गुरेढोरे विस्तीर्ण कुरणात चरतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 तुम्ही जे बी भूमीत पेराल त्यासाठी पाऊस तो देईल आणि भूमीतून मुबलक अशी भाकर देईल. आणि पिके विपुल होईल. त्या दिवसात तुझी गुरे मोठ्या कुरणांमध्ये चरतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 तुम्ही जमिनीत जे बीज पेरता, त्यासाठी ते तुमच्याकडे पाऊससुद्धा पाठवतील आणि त्या जमिनीतून येणारे धान्य पौष्टिक आणि विपुल असेल. त्या दिवशी तुमची गुरे विस्तीर्ण कुरणांमध्ये चरतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 30:23
33 Iomraidhean Croise  

तेव्हा सात धष्टपुष्ट व सुंदर गाई नदीतून बाहेर निघून लव्हाळ्यात चरू लागल्या.


त्या सात चांगल्या गाई म्हणजे सात वर्षे, आणि सात चांगली कणसे म्हणजेही सात वर्षे; स्वप्न एकच आहे.


त्या सुकाळाच्या सात वर्षांत जमिनीस भरघोस पीक आले.


तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल, आणि तू आपल्या सुखांच्या नदीचे पाणी त्यांना पाजशील.


देव आम्हांला आशीर्वाद देवो, व पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरोत.


त्या दिवशी असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जू निघेल” आणि तुझ्या पुष्टतेमुळे ते मोडून जाईल.


जे तुम्ही सर्व ठिकाणच्या पाण्यालगत पेरणी करता आणि बैलांना व गाढवांना मोकळेपणे फिरू देता ते तुम्ही धन्य.


त्या दिवशी परमेश्वराचा अंकुर शोभिवंत व तेजस्वी होईल; भूमीचे उत्पन्न इस्राएलाच्या बचावलेल्यांना वैभव व शोभा देणारे होईल.


मी तो उद्ध्वस्त करीन; त्याला कोणी खच्ची करणार नाही व कुदळणार नाही; त्यात काटेसराटे उगवतील; त्यावर पाऊस पाडू नका अशी आज्ञा मी मेघांना करीन.


परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल, तो अवर्षणसमयी तुझ्या जिवास तृप्त करील, तुझ्या हाडांना मजबूत करील; तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्यांप्रमाणे होशील; पाणी कधी न आटणार्‍या झर्‍याप्रमाणे होशील,


ते घरे बांधून त्यांत राहतील. द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील.


विदेश्यांच्या निरुपयोगी दैवतांत कोणी पर्जन्य देणारी आहेत काय? आकाशाला वृष्टी करता येईल काय? हे परमेश्वरा, आमच्या देवा, हे करणारा तूच ना? आम्ही तुझी आशा धरतो, कारण तू ह्या सर्वांना उत्पन्न केले आहेस.


कारण इस्राएल हट्टी कालवडीसारखा हट्ट करीत आहे; आता परमेश्वर विस्तीर्ण कुरणात कोकराप्रमाणे त्यांना चारील.


देश आपला उपज देईल, तुम्ही पोटभर खाल आणि त्यात तुम्ही सुरक्षित राहाल.


तुम्ही माझ्या विधींप्रमाणे चालाल आणि माझ्या आज्ञा पाळून त्याप्रमाणे वागाल,


धान्याची मळणी तुम्ही द्राक्षाच्या हंगामापर्यंत करीत राहाल आणि द्राक्षांची तोडणी तुम्ही पेरणीच्या दिवसापर्यंत करीत राहाल; तुम्ही पोटभर अन्न खाल व आपल्या देशात सुरक्षित राहाल.


वीज उत्पन्न करणार्‍या परमेश्वराजवळ वळवाच्या पावसाच्या वेळी पाऊस मागा म्हणजे तो त्यांच्यावर वृष्टी करील; तो प्रत्येकाच्या शेतात गवत उपजवील,


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा म्हणजे मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढ्या आशीर्वादांचा तुमच्यावर वर्षाव करतो की नाही ह्याविषयी माझी प्रचिती पाहा.


पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे त्या तुमच्यावर न्याय्यत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखांच्या ठायी आरोग्य असेल; तुम्ही गोठ्यातल्या वत्सांप्रमाणे बाहेर पडून बागडाल.


तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील.


तर मी तुमच्या देशावर आगोटीचा पाऊस आणि वळवाचा पाऊस योग्य समयी पाठवीन; म्हणजे तुला आपले धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचा साठा करता येईल.


कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतींत उपयोगी आहे; सुभक्ती तर सर्व बाबतींत उपयोगी आहे; तिला आताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan