यशायाह 30:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
22 तुमच्या रुपेरी कोरीव मूर्तींची मढवणी व तुमच्या सोनेरी ओतीव मूर्तींचा मुलामा तुम्ही अपवित्र लेखाल, एखाद्या अमंगळ वस्तूप्रमाणे त्या तुम्ही दूर फेकून द्याल; “चालती हो,” असे तुम्ही मूर्तीस म्हणाल.
22 तुम्ही आपल्या चांदीच्या कोरीव मूर्तीचा मुलामा व आपल्या सोन्याच्या ओतीव मूर्तीची मढवणी तुम्ही विटाळवाल. तुम्ही त्या देवांना मासिकपाळीच्या कपड्याप्रमाणे फेकून द्याल. तुम्ही त्यांना म्हणाल, “येथून निघून जा.”
22 मग तुम्ही तुमच्या चांदीने मढविलेल्या मूर्ती आणि सोन्याने आच्छादित असलेल्या तुमच्या प्रतिमांची विटंबना कराल. तुम्ही त्यांना मासिक पाळीच्या कपड्याप्रमाणे फेकून द्याल आणि त्यांना असे म्हणाल, “आमच्यापासून दूर व्हा!”
हे सर्व आटोपल्यावर तेथे हजर असलेल्या सर्व इस्राएलांनी यहूदाच्या नगरानगरांतून जाऊन यहूदा, बन्यामीन, एफ्राईम व मनश्शे ह्या प्रांतात असलेले मूर्तिस्तंभ मोडून टाकले, अशेरा मूर्ती फोडून टाकल्या आणि उच्च स्थाने व वेद्या मोडून फोडून टाकल्या; त्यांचा सर्वस्वी विध्वंस केला. मग सर्व इस्राएल लोक आपापल्या गावी आपापल्या वतनात गेले. याजक आणि लेवी ह्यांच्यासाठी हिज्कीया तरतूद करतो
अशा रीतीने याकोबाच्या दोषांचे क्षालन होईल; त्याचे पाप दूर केल्याचे फळ हेच आहे; तो वेद्यांचे सर्व चिरे फुटलेल्या चुनखड्यासारखे करील तेव्हा अशेरामूर्ती व सूर्यमूर्ती पुन्हा उभारणार नाहीत.
सीयोनेने आपले हात पसरले, पण तिचे सांत्वन करणारा कोणी नाही; परमेश्वराने याकोबासंबंधाने आज्ञा केल्यावरून त्याच्या वैर्यांनी त्याला घेरले आहे; यरुशलेम त्यांच्यामध्ये अशुचि झाली आहे.
ते आपले रुपे रस्त्यांवर फेकून देतील, त्यांना आपले सोने अमंगळ वाटेल; परमेश्वराच्या कोपाच्या दिवशी त्यांच्या सोन्यारुप्याने त्यांचा बचाव होणार नाही; त्यापासून त्यांच्या जिवाची तृप्ती होणार नाही, त्यांचे पोट भरणार नाही, कारण त्यांनी त्यामुळे ठोकर खाऊन अधर्म केला आहे.
त्यांनी त्यांची केलेली भूषणे दिमाख दाखवण्यासाठी वापरली; त्यांनी त्याच्या अमंगळ मूर्ती व तिरस्करणीय वस्तू आपणांसाठी बनवल्या; म्हणून ते त्यांना अमंगळ वस्तूसमान वाटावे असे मी केले आहे.
ते वस्त्र लोकरीचे असो अथवा सणाचे असो, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यांवर, तसेच चामड्यावर किंवा चामड्याच्या एखाद्या वस्तूवर तो चट्टा असला, तर ती वस्तू जाळावी; ते पसरत जाणारे कुष्ठ असल्यामुळे ती वस्तू अग्नीत जाळून टाकली पाहिजे.
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, त्या दिवशी असे होईल की, मी देशातून मूर्तींच्या नावांचा उच्छेद करीन, त्यांची ह्यापुढे आठवण होणार नाही आणि संदेष्टे व अशुद्ध आत्मा ह्यांना मी देशातून घालवून देईन.
त्यांच्या देवांच्या कोरीव मूर्ती तुम्ही अग्नीत जाळून टाका; त्यांच्यावरील सोन्यारुप्याचा लोभ धरू नकोस व ते स्वतःकरता ठेवून घेऊ नकोस, घेशील तर त्यामुळे पाशात पडशील; कारण तुझा देव परमेश्वर ह्याला त्याचा वीट आहे.
मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला; त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणार्या लोकांना त्याच्यासमोर चिन्हे करून ठकवले होते. ह्या दोघांना ‘जळत्या गंधकाच्या’ अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले;