Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 30:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 एकाच्या धमकीने तुमचे हजार पळतील, पाचांच्या धमकीने तुम्ही पळाल; डोंगरमाथ्यावरील एखाद्या ध्वजस्तंभा-सारखे, टेकडीवरील ध्वजेसारखे तुम्हीच तेवढे शेष उराल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 एकाने धमकी दिल्यास तुमची हजारो माणसे पळून जातील. पाच जणांच्या धमकीने तुम्ही पळून जाल. पर्वताच्या शिखरावर ध्वजस्तंभासारखे किंवा डोंगरावरच्या झेंड्यासारखे तुम्ही शिल्लक उराल तोपर्यंत असे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 जोपर्यंत तुम्हाला डोंगराच्या शिखरावर असलेल्या ध्वजस्तंभाप्रमाणे, टेकडीवर लावलेल्या पताक्याप्रमाणे सोडून दिले जात नाही तोपर्यंत एका व्यक्तीच्या धमकीने एक हजार लोक पळून जातील; पाच जणांच्या धमकीने तुम्ही सर्वजण पळून जाल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 30:17
20 Iomraidhean Croise  

कोणी पाठीस लागले नसता दुर्जन पळतात, पण नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतात.


त्याच्या डाहळ्या वाळल्या म्हणजे त्या तोडून टाकतील, स्त्रिया येऊन त्या जाळतील; ते लोक ज्ञानशून्य आहेत म्हणून त्यांच्या उत्पन्नकर्त्याला त्यांचा कळवळा येत नाही, त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर कृपा करीत नाही.


त्यात लोकांचा दहावा हिस्सा राहिला तर त्याचाही नाश व्हायचा; तरी एला व अल्लोन ही झाडे तोडल्यावर ज्याप्रमाणे त्यांचा बुंधा राहतो त्याप्रमाणे त्यांचा बुडखा पवित्र बीज असा राहील.”2


कारण तुमच्याबरोबर लढणार्‍या खास्द्यांच्या अवघ्या सैन्याचा जरी तुम्ही पराभव केला व त्यांच्यातले अगदी घायाळ झालेले मात्र काही उरले तरी ते सर्व आपापल्या तंबूत उठून उभे राहतील व हे नगर अग्नीने जाळतील.”


आमचा छळ करणारे आकाशातील गरुडांपेक्षा चपल होते; त्यांनी डोंगरावर आमची पाठ पुरवली, रानात आमच्यासाठी दबा धरला.


मी तुम्हांला विन्मुख होईन; तुमच्या शत्रुंपुढे तुमचा पराभव होईल; तुमचे वैरी तुमच्यावर अधिकार गाजवतील व कोणी पाठीस लागला नसतानाही तुम्ही पळाल.


तुमच्यातील जे उरतील त्यांच्या मनात ते शत्रूंच्या देशात असता मी अशी दहशत घालीन की, उडणार्‍या पाचोळ्याच्या आवाजाने ते पळून जातील; तलवार पाठीमागे लागल्यासारखे ते पळतील; कोणी पाठीस लागले नसताही ते पळतील.


तुमच्यातले पाच जण शंभरांना, शंभर जण दहा हजारांना पळवून लावतील आणि तुमचे शत्रू तुमच्यापुढे तलवारीने पडतील.


जो चपळ त्याला पलायन साधायचे नाही. बळकट आहे त्याला आपली शक्ती चालवता यायची नाही, वीराला आपला जीव वाचवता येणार नाही;


मी तुझ्यामध्ये नम्र व गरीब लोक राहू देईन, ते परमेश्वराच्या नामावर श्रद्धा ठेवतील.


आता जर काही फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू रानटी जैतून असता त्यांच्या जागी कलमरूपे लावला गेलास व जैतुनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झालास,


तू तुझ्या शत्रूंपुढे मार खाशील असे परमेश्वर करील; तू एका वाटेने त्यांच्यावर चालून जाशील पण त्यांच्यापुढून सात वाटांनी पळून जाशील, आणि पृथ्वीवरील सर्व राज्यांना नकोसा होशील.


त्यांच्या दुर्गाने त्यांचा विक्रय केला नसता, परमेश्वराने त्यांना परकीयांच्या हाती दिले नसते, तर एकाने सहस्रांचा पाठलाग कसा केला असता! दोघांनी दशसहस्रांना कसे पळवले असते!


तुमच्यातला एक जण हजारांना पळवून लावील, कारण तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला सांगितल्याप्रमाणे तो स्वतः तुमच्यासाठी लढणारा आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan