Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 30:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तुम्ही म्हणाला, “नाही! आम्ही घोड्यावर बसून पळू,” म्हणून तुम्हांला पळावे लागेल; तुम्ही म्हणाला, “आम्ही चपळ घोड्यांवर बसू,” म्हणून तुमचा पाठलाग करणारे चपळ बनतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 तुम्ही म्हणता, नाही! कारण आम्ही घोड्यांवर बसून पळू, म्हणून तुम्हास पळावे लागेल. आणि आम्ही चपळ घोड्यांवर स्वार होऊन जाऊ, पण जे तुमच्या पाठीस लागतील ते पण चपळ होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तुम्ही असे म्हणाला की, ‘नाही, आम्ही घोड्यांवर स्वार होऊन पळून जाऊ.’ म्हणून तुम्ही पळून जाल! तुम्ही असे म्हणाला, ‘आम्ही वेगवान घोड्यांवर स्वार होऊ.’ म्हणून तुमचे पाठलाग करणारे चपळ होतील!

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 30:16
20 Iomraidhean Croise  

तेव्हा खास्दी सेनेने राजाचा पाठलाग करून त्याला यरीहोच्या मैदानात गाठले व त्याच्या सर्व सैन्याची दाणादाण केली.


त्याचे बळ मोठे आहे म्हणून तू त्याच्यावर भिस्त ठेवशील काय? अथवा त्याच्यावर आपले काम सोपवशील काय?


तो घोड्याच्या बलाने आनंदित होत नाही, मनुष्याच्या पायांनी संतोष पावत नाही.


जयप्राप्तीसाठी घोडा केवळ व्यर्थ होय; त्याला आपल्या महाबळाने कोणाचा बचाव करता येणार नाही.


त्यांचा देश सोन्यारुप्याने भरला आहे; त्यांच्या निधींना अंत नाही. त्यांचा देश घोड्यांनी भरून गेला आहे, त्यांच्या रथांना अंत नाही.


जे साहाय्यार्थ खाली मिसर देशात जातात व घोड्यांवर भिस्त ठेवतात, आणि रथ बहुत आहेत व घोडेस्वार फार बळकट आहेत म्हणून त्यांवर भरवसा ठेवतात, पण इस्राएलाच्या पवित्र प्रभूकडे लक्ष देत नाहीत, परमेश्वराचा शोध करीत नाहीत, त्यांना हायहाय!


मिसरी तर मानव आहेत, देव नाहीत; त्यांचे घोडे रक्तमांसाचे आहेत, आत्मरूप नाहीत; परमेश्वर आपला हात उगारील तेव्हा साहाय्यकर्ता ठोकर खाईल व साहाय्य पावलेलाही पडेल; ते सर्व एकंदर विनाश पावतील.


हे पाहून यहूदाचा राजा सिद्कीया व सर्व योद्धे ह्यांनी पलायन केले; ते रात्री राजाच्या बागेच्या वाटेने, दोहो तटांमधल्या वेशीने नगराबाहेर निघून गेले; राजा अराबाच्या मार्गाने गेला.


पाहा, ढगांप्रमाणे तो येत आहे, त्याचे रथ वादळाप्रमाणे आहेत; त्याचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत. आम्ही हायहाय करणार, आमचे वाटोळे झाले आहे!


चपळ माणसाला पळून जाता येणार नाही, वीराला निसटून जाता येणार नाही; उत्तर दिशेस फरात नदीच्या तीरी ते ठोकर खाऊन पडत आहेत.


मग नगराच्या तटास एक खिंड पाडण्यात आली; आणि दोन्ही तटांच्यामध्ये जी वेस राजाच्या बागेनजीक होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले; नगरास खास्द्यांचा वेढा पडलाच होता; इकडे त्यांनी अराबाचा रस्ता धरला.


आमचा छळ करणारे आकाशातील गरुडांपेक्षा चपल होते; त्यांनी डोंगरावर आमची पाठ पुरवली, रानात आमच्यासाठी दबा धरला.


मी प्रभूला वेदीजवळ उभे राहिलेले पाहिले; तो म्हणाला, “खांबांच्या माथ्यांवर प्रहार कर म्हणजे उंबरठे हलतील; त्यांचे तुकडे करून त्या सर्वांच्या डोक्यावर पाड; त्यांच्यातले शेष उरतील ते मी तलवारीने वधीन; त्यांतला कोणी पळून जाऊ पाहील, पण त्याला पळून जाता येणार नाही; त्यांतला कोणी निसटून जाऊ पाहील, पण तो निभावणार नाही.


लाखीशाच्या रहिवासिणी, रथास वेगवान घोडे जोड; सीयोनकन्येच्या पापाचा आरंभ तिच्यापासून झाला; कारण इस्राएलाचे अपराध तुझ्या ठायी आढळले.


त्यांचे घोडे चित्त्यांहून वेगवान आहेत व संध्याकाळी बाहेर पडणार्‍या लांडग्यांपेक्षा क्रूर आहेत; त्यांचे घोडेस्वार दौड करतात, त्यांचे घोडेस्वार दुरून येतात, खाऊन टाकण्यास त्वरा करणार्‍या गरुडासारखे ते धावतात.


तू तुझ्या शत्रूंपुढे मार खाशील असे परमेश्वर करील; तू एका वाटेने त्यांच्यावर चालून जाशील पण त्यांच्यापुढून सात वाटांनी पळून जाशील, आणि पृथ्वीवरील सर्व राज्यांना नकोसा होशील.


दुरून, पृथ्वीच्या सीमेवरून गरुडाप्रमाणे झेप घेणारे राष्ट्र परमेश्वर तुझ्यावर आणील; त्याची भाषा तुला समजणार नाही;


Lean sinn:

Sanasan


Sanasan