यशायाह 30:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 कुंभाराच्या मडक्याचा सपाट्यासरसा चुराडा होतो आणि पडलेल्या तुकड्यात आगटीतून विस्तव घेण्यास किंवा हौदातून पाणी घेण्यास खापरीही सापडत नाही, तसा तो त्याचा चुराडा करील.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 कुंभाराची मडकी फोडावी तसे तो ते फोडून त्याचे तुकडे करील, तो त्यास सोडणार नाही. आणि त्याचे तुकडे चुलीतून विस्तव घ्यायला किंवा डबक्यातून पाणी उपसायला खापरही ठेवणार नाही.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 मातीच्या भांड्यांसारखे त्याचे इतक्या निर्दयीपणाने तुकडे केले जातील की त्याच्या अनेक बारीक तुकड्यांमध्ये चुलीमधून निखारे घेण्यासाठी किंवा रांजणातून पाणी काढण्यासाठी एकही तुकडा सापडणार नाही.” Faic an caibideil |