Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 30:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 ते द्रष्ट्यांना म्हणतात, “दृष्टान्त पाहून नका”; संदेष्ट्यांना म्हणतात, “आम्हांला यथार्थ गोष्टींचा संदेश सांगू नका, आम्हांला गोडगोड गोष्टी सांगा, कपटवचने सांगा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 ते पाहणाऱ्यांना म्हणतात, “तुम्ही पाहू नका.” आणि भविष्यवाद्याला म्हणता, “आमच्या जवळ सरळ भविष्य सांगू नको; आम्हास बऱ्या वाटतील, आवडतील अशाच गोष्टी सांग, कपटी भविष्ये सांग.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 दृष्टान्त पाहणाऱ्यांना ते असे म्हणतात, “यापुढे दृष्टान्त पाहू नका!” आणि संदेष्ट्यांना म्हणतात, “यापुढे काय योग्य आहे, याबद्दल आम्हाला दर्शन देऊ नका! आनंद देणाऱ्या गोष्टी आम्हाला सांगा, भ्रामक कल्पना असलेली भविष्यवाणी करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 30:10
39 Iomraidhean Croise  

अहाब एलीयाला म्हणाला, “माझ्या वैर्‍या, तू मला गाठलेस काय?” तो म्हणाला, “होय, मी तुला गाठले आहे, कारण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करावे म्हणून तू स्वतःला विकून टाकले आहेस.


आणि त्यांना सांगा, राजा म्हणतो, ह्या मनुष्याला बंदीत टाका, व मी सुखरूप परत येईपर्यंत त्याला शिक्षेचे अन्न व शिक्षेचे पाणी द्या.”


हे ऐकून आसा त्या द्रष्ट्यावर रागावला, व त्याने त्याला अटकेत ठेवले; कारण त्यामुळे तो त्याच्यावर फार कोपायमान झाला होता. ह्याच सुमारास आसाने काही लोकांवर जुलूम चालवला.


तो त्याला असे बोलू लागला तेव्हा राजा त्याला म्हणाला, “मी तुला आपला मंत्री केले आहे काय? गप्प राहा; तुला मार पाहिजे काय?” तेव्हा संदेष्टा गप्प राहिला. मग तो म्हणाला, “मला ठाऊक आहे की देवाने तुझा नाश करण्याचे ठरवले आहे, कारण तू हे असे केले आहेस व माझा सल्ला घेतला नाहीस.”


तो तुझे आर्जव करीत राहील काय? तो तुला लाडीगोडी लावील काय?


तुम्ही म्हणता, “आम्ही मृत्यूबरोबर करार केला आहे, अधोलोकाबरोबर संकेत केला आहे; संकटाचा लोट येईल तेव्हा तो आमच्यावर येणार नाही, कारण आम्ही लबाडीचा आश्रय केला आहे व कपटाखाली दडून राहिलो आहोत.”


परमेश्वराने गाढ झोपेची धुंदी तुमच्यावर घातली आहे. तुमचे नेत्र बांधून टाकले आहेत, संदेष्टे व तुमचे प्रमुख जे द्रष्टे त्यांच्यावर पडदा टाकला आहे.


जे वाइटाला बरे व बर्‍याला वाईट म्हणतात, जे प्रकाशाला अंधकार व अंधकाराला प्रकाश समजतात, गोड ते कडू व कडू ते गोड मानतात त्यांना धिक्कार असो.


अनाथोथचे जे लोक माझ्या जिवावर टपले असून म्हणतात की, “तू परमेश्वराच्या नामाने संदेश देऊ नकोस, देशील तर आमच्या हातून मरशील,” त्यांच्याविरुद्ध परमेश्वर बोलला आहे.


मला तुच्छ मानणार्‍यांना ते म्हणत राहतात की, ‘परमेश्वर बोलला आहे : तुम्हांला शांती प्राप्त होईल;’ आपल्या अंत:करणाच्या हट्टाप्रमाणे चालणार्‍या सर्वांस ते म्हणतात की, ‘तुमच्यावर काही अरिष्ट येणार नाही.’


तेव्हा याजक व संदेष्टे सरदारांना व सर्व लोकांना म्हणाले, “हा मनुष्य मरणदंडास पात्र आहे, कारण ह्या नगराविरुद्ध ह्याने संदेश दिला तो तुम्ही आपल्या कानांनी ऐकला आहे.”


तर यिर्मया अनाथोथकर तुमच्यासमोर आपणास संदेष्टा म्हणवतो त्याला तू प्रतिबंध का केला नाहीस?


आणि यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याला तू असे सांग, ‘परमेश्वर म्हणतो, तू हा पट जाळून म्हटले, तू ह्यावर का लिहिले की बाबेलचा राजा येईलच व ह्या देशाचा विध्वंस करील आणि ह्यातून मनुष्य व पशू ह्यांचे निर्मूलन करील?”


मग सरदार राजाला म्हणाले, “ह्या मनुष्याला जिवे मारा; कारण असले भाषण करून ह्या नगरात राहिलेल्या योद्ध्यांचे व सर्व लोकांचे हात तो निर्बळ करतो; हा मनुष्य ह्या लोकांचे हित नव्हे तर नुकसान करायला पाहतो.”


संदेष्टे खोटे संदेश देतात, त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवतात व माझ्या लोकांनाही असेच आवडते; पण अखेरीस तुम्ही काय करणार?


“तरीपण तुम्ही नाजीरांना द्राक्षारस पाजला व संदेष्ट्यांना ‘संदेश देऊ नका’ अशी आज्ञा केली.


पण बेथेलात ह्यापुढे संदेश सांगू नकोस, कारण हे राजाचे पवित्रस्थान, ही राजधानी आहे.”


वायफळ व खोट्या चालीचा कोणी मनुष्य खोटे बोलून म्हणेल की, “द्राक्षारस व मद्य ह्यांचे मी भाकीत करीन,” तर तो ह्या लोकांचा संदेष्टा होईल.


“संदेश सांगू नका” असे ते लोकांना म्हणतात, “ह्या गोष्टींविषयी संदेश सांगू नये; अप्रतिष्ठा सरून जाणार नाही.”


जगाने तुमचा द्वेष करावा हे शक्य नाही; पण ते माझा द्वेष करते, कारण त्याची कृत्ये वाईट आहेत अशी मी त्याच्याविषयी साक्ष देतो.


पण मी तुम्हांला खरे सांगतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही.


तरी ते लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांना अशी ताकीद द्यावी की, ह्यापुढे तुम्ही ह्या नावाने लोकांपैकी कोणाबरोबरही बोलू नये.”


“ह्या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हांला निक्षून सांगितले होते की नाही? तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणू पाहत आहात.”


कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वत:च्या पोटाची सेवा करतात; आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्याभाबड्यांची अंत:करणे भुलवतात.


मग मी तुम्हांला खरे ते सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय?


कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानांची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणांसाठी शिक्षकांची गर्दी जमवतील,


आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील, व कल्पित कहाण्यांकडे वळतील, अशी वेळ येईल.


त्यांनी आपले साक्ष देणे समाप्त केल्यावर ‘अथांग डोहातून वर येणारे श्वापद त्यांच्याबरोबर लढाई करील’ आणि ‘त्यांना जिंकून’ जिवे मारील;


(पूर्वीच्या काळी इस्राएलात कोणी देवाकडे प्रश्‍न करण्यास जाई तेव्हा तो म्हणत असे की, “चला, द्रष्ट्याकडे जाऊ;” हल्ली ज्याला संदेष्टा म्हणतात त्याला पूर्वी द्रष्टा म्हणत.)


Lean sinn:

Sanasan


Sanasan