Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 30:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 परमेश्वर म्हणतो, “फितुरी मुले हायहाय करतील; ती मसलती करतात पण त्या माझ्या प्रेरणेने करीत नाहीत; ती करारमदार करतात पण माझ्या आत्म्याला अनुसरून करीत नाहीत; अशी ती पापाने पाप वाढवतात;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वर असे म्हणतो, “बंडखोर मुलांना हायहाय हे. ते योजना करतात, त्या माझ्यापासून नाही; ते दुसऱ्या राष्ट्राबरोबर युती करतात, पण त्या माझ्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने नाही, अशी ती पापाने पापाची भर घालतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेह असे घोषित करतात, “दुराग्रही संततीचा धिक्कार असो, ज्या योजना माझ्या नाहीत, त्या ते पूर्ण करतात, नाते जोडतात, परंतु माझ्या आत्म्याने नाही, पापावर पापाचा ढीग रचतात;

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 30:1
48 Iomraidhean Croise  

पाहा, तो मिसर म्हणजे चेचलेला बोरू, त्यावर तू टेकतोस; त्यावर कोणी टेकला तर तो त्याच्या हातात शिरून बोचेल; जे कोणी मिसरी राजा फारो ह्याच्यावर टेकतात त्यांना तो असाच आहे.


माझ्या धन्याच्या अगदी कनिष्ठ दर्जाच्या एका तरी सरदाराला तू कसा पिटाळशील? म्हणूनच तू रथ आणि स्वार मिळवण्यासाठी मिसरावर भिस्त ठेवतोस ना?


तुझ्या मंडपात मी सर्वकाळ राहीन; मी तुझ्या पंखांच्या छायेचा आश्रय घेईन. (सेला)


हे आकाशा, ऐक; अगे पृथ्वी, कान दे, कारण परमेश्वर बोलत आहे : “मी मुलांचे पालनपोषण केले, त्यांना लहानाचे मोठे केले तरी ती माझ्याशी फितूर झाली.


तुझे सरदार बंडखोर व चोरांचे साथीदार झाले आहेत; त्यांतील प्रत्येकाला लाचांची आवड आहे. प्रत्येक जण नजराण्यांमागे लागणारा आहे; ते अनाथाचा न्याय करत नाहीत, विधवेची दाद घेत नाहीत.


किती हे पापिष्ट राष्ट्र! दुष्कर्माने भारावलेले लोक, दुर्जनांची संतती! ही आचारभ्रष्ट मुले! ह्यांनी परमेश्वराला सोडले आहे, इस्राएलाच्या पवित्र प्रभूला तुच्छ मानले आहे; ती वियुक्त होऊन मागे फिरली आहेत.


तुम्ही अधिकाधिक फितून मार का खात राहता? हरएक मस्तक व्यथित झाले आहे, हरएक हृदय ग्लान झाले आहे.


तुम्ही म्हणता, “आम्ही मृत्यूबरोबर करार केला आहे, अधोलोकाबरोबर संकेत केला आहे; संकटाचा लोट येईल तेव्हा तो आमच्यावर येणार नाही, कारण आम्ही लबाडीचा आश्रय केला आहे व कपटाखाली दडून राहिलो आहोत.”


कारण पाय पसरायला खाट फार आखूड आहे; पांघरायला पासोडी फार अरुद आहे.


जे परमेश्वरापासून आपले मनसुबे लपवतात, आपला कारभार अंधारात चालवतात आणि “आम्हांला कोण पाहतो, आमचे कोणाला कळते,” असे म्हणतात, त्यांना धिक्कार असो;


कारण हे बंडखोर लोक आहेत, ही लबाड मुले आहेत; ज्यांना परमेश्वराचे नियमशास्त्र ऐकायला नको अशी ही मुले आहेत.


जे साहाय्यार्थ खाली मिसर देशात जातात व घोड्यांवर भिस्त ठेवतात, आणि रथ बहुत आहेत व घोडेस्वार फार बळकट आहेत म्हणून त्यांवर भरवसा ठेवतात, पण इस्राएलाच्या पवित्र प्रभूकडे लक्ष देत नाहीत, परमेश्वराचा शोध करीत नाहीत, त्यांना हायहाय!


वार्‍यापासून आसरा व वादळापासून निवारा असा मनुष्य होईल; रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाल खडकाची छाया असा तो होईल.


आणि परमेश्वर सीयोन डोंगराच्या प्रत्येक स्थानावर व त्याच्या सणामेळ्यांवर दिवसा धूम्रमय मेघ व रात्री प्रज्वलित अग्नीचा प्रकाश निर्माण करील; कारण त्याच्या सर्व वैभवावर छत्र होईल.


जे दुष्टतेच्या दोर्‍यांनी दुष्कर्माला, जसे काय गाडीच्या दोराने पापिष्ठपणाला ओढून आणतात, त्यांना धिक्कार असो;


तरी त्यांनी बंड केले व त्याच्या पवित्र आत्म्यास खिन्न केले; तेव्हा तो उलटला व त्यांचा शत्रू बनला, तो स्वत: त्यांच्याशी लढला.


जो चांगला नाही अशा मार्गाने स्वच्छंदपणे चालणार्‍या फितुरी लोकांपुढे मी आपले हात नित्य केले;


परमेश्वराने मला आपल्या हाताने बळकट धरून असे बजावून सांगितले होते की, “ह्या लोकांच्या मार्गाने जाऊ नकोस.” तो म्हणाला :


“हे लोक ज्याला बंड म्हणतात त्या सर्वांना बंड बंड म्हणू नका; ज्याला ते भितात त्याला भिऊ नका, घाबरू नका.


ते तुम्हांला म्हणतील, “भूतवैद्यांना व छांछू करणार्‍या मांत्रिकांना विचारायला जा;” तेव्हा म्हणा, लोकांनी आपल्या देवाला विचारू नये काय? जिवंतांसाठी मेलेल्यांना विचारावे काय?


परमेश्वर असे म्हणतो, “जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंत:करण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे.


मिसर देशाच्या वाटेस लागून नील नदीचे पाणी पिण्याचे तुला काय प्रयोजन? अश्शूर देशाच्या वाटेस लागून फरात नदीचे पाणी पिण्याचे तुला काय प्रयोजन?


“परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, यहूदाच्या राजाने तुम्हांला माझ्याकडे विचारण्यास पाठवले आहे, तर त्याला सांगा, पाहा, फारोचे सैन्य तुमची कुमक करण्यास आले आहे ते मिसरास स्वदेशी परत जाईल.


शेत राखणार्‍यांसारखे त्यांनी तिला चोहोकडून घेरले आहे, कारण तिने माझ्याशी फितुरी केली आहे, असे परमेश्वर म्हणतो.


अहो यहूदाचे अवशिष्ट लोकहो, परमेश्वराने तुम्हांला सांगितले आहे की, ‘मिसर देशात जाऊ नका, मी तुम्हांला आज बजावून सांगत आहे हे पक्के लक्षात ठेवा.’


तरी ह्या लोकांचे हृदय हट्टी व फितुरी आहे; ते फितून निघून गेले आहेत.


तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, अधर्माची योजना करणारे व ह्या नगरात अनिष्ट संकल्प करणारे पुरुष ते हेच;


तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, मी तुला इस्राएल वंशजांकडे, माझ्याशी फितुरी केलेल्या त्या फितूर राष्ट्राकडे पाठवतो. त्यांनी व त्यांच्या वाडवडिलांनी आजपर्यंत माझ्याविरुद्ध वर्तन केले आहे.


ह्या फितुरी घराण्यास दाखला देऊन असे म्हण, प्रभू परमेश्वर म्हणतो, एक कढई चुलीवर चढव; ती चढवल्यावर तिच्यात पाणी ओत.


ते ह्यापुढे इस्राएल घराण्याला आधार होणार नाहीत; त्यांच्याकडे त्यांचे मन गेले तर त्यांना त्यांच्या पातकाचे स्मरण होईल; तेव्हा त्यांना समजेल की मी प्रभू परमेश्वर आहे.”


मी तुझे डोके गारगोटीपेक्षा वज्रप्राय कठीण करतो; त्यांना तू भिऊ नकोस, त्यांच्या कटाक्षांनी कापू नकोस; ती तर फितुरी जात आहे.”


त्यांच्या मसलतीमुळे तलवार त्यांच्या नगरांवर फिरेल. ती त्यांचे अडसर मोडून-तोडून खाऊन टाकील.


ते आताही अधिकाधिक पाप करीत आहेत, ते आपल्याजवळच्या रुप्याच्या आपणांसाठी ओतीव मूर्ती करीत आहेत; ते आपल्या कल्पनेप्रमाणे मूर्ती करीत आहेत; त्या सर्व कारागिरांच्या कृती आहेत; ते अशा मूर्तींबरोबर बोलतात, यज्ञ करणारी माणसे वासरांचे चुंबन घेतात.


त्यांना धिक्कार असो, कारण ते माझ्यापासून बहकले आहेत; त्यांचा समूळ नाश होणार, कारण त्यांनी माझ्याबरोबर फितुरी केली आहे; त्यांना उद्धरावे अशी माझी इच्छा होती; ते माझ्याविषयी खोटेनाटे बोलले आहेत.


तेव्हा त्याने मला उत्तर केले, “जरूब्बाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे : बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


आता पाहा, इस्राएलावर परमेश्वराचा क्रोध आणखी भडकावा म्हणून तुम्ही आपल्या वडिलांच्या जागी त्यांची पातकी पोरे निपजला आहात.


की, आपल्या हटवादीपणाने पश्‍चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतोस?


‘जरी मी आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे वागलो तरी माझे कुशलच होईल’ असे तो आपल्या मनाचे समाधान करून घेईल, पण त्यामुळे सुक्याबरोबर ओलेही जळून जाईल.


तुमचा माझा परिचय झाला त्या दिवसापासून तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंडच करीत आला आहात.


रानात तू आपला देव परमेश्वर ह्याला संतापवलेस त्याची आठवण ठेव, विसरू नकोस; मिसर देशातून तुम्ही बाहेर निघालात तेव्हापासून ह्या ठिकाणी येऊन पोहचेपर्यंत तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंडच करीत आला आहात.


आणि दुष्ट व भोंदू माणसे ही दुसर्‍यांना फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील.


तेव्हा लोकांनी त्यांचे अन्न स्वीकारले; पण परमेश्वराचा सल्ला घेतला नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan