Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 3:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्या दिवशी तो ओरडून म्हणेल, “मी दुरुस्ती करणारा होणार नाही, माझ्या घरी अन्नवस्त्र नाही, मला लोकांचा नायक करू नका.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्या दिवशी तो ओरडून म्हणेल, ‘मी बरे करणारा होणार नाही, माझ्याजवळ भाकरी व वस्त्रही नाहीत, तुम्ही मला लोकांचा शासक करू नका.’”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 पण त्या दिवशी तो ओरडेल, “माझ्याकडे त्याचा इलाज नाही. माझ्या घरी अन्न किंवा वस्त्रे नाहीत; मला लोकांचा पुढारी बनवू नका.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 3:7
10 Iomraidhean Croise  

पण अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, “परमेश्वर परात्पर देव, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी ह्याच्यासमोर मी बाहू उभारून सांगतो की,


बहुत काळ मोडून पडलेली शहरे तुझे लोक पुन्हा बांधतील; पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाये तू पुन्हा उभारशील; मोडतोडीचा जीर्णोद्धार करणारा, वस्ती होण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणारा, असे तुझे नाव पडेल.


तू यहूदाचा अगदी त्याग केला आहेस काय? तुझ्या जिवाला सीयोनेचा वीट आला आहे काय? आम्ही बरे होऊ नये इतके तू आम्हांला का मारले आहे? आम्ही शांतीची अपेक्षा करतो पण हित काही होत नाही; आम्ही बरे होण्याची वाट पाहतो तर पाहा दहशत.


मी तुला बोधाच्या कोणत्या गोष्टी सांगू? हे यरुशलेमकन्ये, मी तुला कोणाची उपमा देऊ? हे सीयोनेच्या कुमारी कन्ये, तुझे सांत्वन करण्यासाठी मी तुझी कोणाबरोबर तुलना करू? तुझा विनाश सागरासारखा मोठा आहे; तुला कोण बरे करील?


तुम्ही निर्बलांना बलवान करत नाही, रोग्यांना बरे करत नाही, घायाळांचे घाय बांधत नाही, घालवून दिलेल्यांना परत आणत नाही, हरवलेल्यांना शोधत नाही; तर तुम्ही त्यांच्यावर सक्तीने व कडकपणे सत्ता चालवता.


एफ्राइमाने आपला रोग पाहिला व यहूदाने आपली जखम पाहिली तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे गेला व यारेब राजास त्याने निरोप पाठवला; पण त्याला तुम्हांला बरे करता येणार नाही, तुमची जखम बरी करता येणार नाही.


“चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ; कारण त्याने आम्हांला फाडले आहे, व तोच आम्हांला बरे करील; त्याने आम्हांला जखम केली आहे व तोच पट्टी बांधील.


आमच्या डोळ्यांदेखत आमचे अन्न काढून घेतले नाही काय? आमच्या देवाच्या मंदिरातील आनंद व उत्साह नष्ट झाले नाहीत काय?


मी आपला बाहू आकाशाकडे उभारून म्हणतो, माझ्या सनातन जीविताची शपथ,


Lean sinn:

Sanasan


Sanasan