Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 3:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तुझे पुरुष तलवारीने पडतील, तुझे वीर लढाईत पडतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 तुझे पुरुष तलवारीने पडतील व वीर पुरुष युद्धात पाडले जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 तुमचे पुरुष तलवारीने पडतील, तुमचे योद्धे युद्धभूमीवर ढासाळतील,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 3:25
12 Iomraidhean Croise  

रमाल्याचा पुत्र पेकह ह्याने एका दिवसात यहूदातल्या एक लक्ष वीस हजार वीरांचा संहार केला, कारण त्यांनी आपल्या वडिलांचा देव परमेश्वर ह्याला सोडून दिले होते.


ह्यामुळे आमच्या वाडवडिलांचा तलवारीने वध झाला; आमचे पुत्र, कन्या व स्त्रिया पाडाव होऊन गेल्या.


तुम्ही अमान्य होऊन बंड कराल तर तलवार तुम्हांला खाऊन टाकील; कारण परमेश्वराच्या तोंडचे हे वचन आहे.”


त्या तुम्हांला तलवार नेमली आहे; तुम्ही सगळे वधासाठी खाली वाकाल; कारण मी हाक मारली तरी तुम्ही उत्तर दिले नाही; मी बोललो तरी तुम्ही ऐकले नाही; माझ्या दृष्टीने जे वाईट ते तुम्ही केले, जे मला नापसंत ते तुम्ही पसंत केले.”


सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, त्यांना मी शिक्षा करीन; त्यांचे तरुण तलवारीने मरतील, त्यांचे पुत्र व कन्या दुष्काळाने फस्त होतील.


मी वनात जातो तर पाहा, तेथे तलवारीने वधलेले आहेत! शहरात येतो तर दुष्काळाने पिडलेले मला आढळतात; कारण संदेष्टे व याजक हे अज्ञात देशात भटकत आहेत.”’


माझ्यासमोर त्यांच्या विधवा सागराच्या वाळूपेक्षा अधिक झाल्या आहेत; मी भरदुपारी त्यांच्यावर व तरुणांच्या मातेवर लुटारू आणतो; तिच्यावर क्लेश व त्रेधा ही अकस्मात ओढवतील असे मी करतो.


ह्यामुळे त्यांचे पुत्र दुष्काळात सापडू दे; त्यांना तलवारीच्या तडाक्यात सापडू दे; त्यांच्या स्त्रिया अपत्यहीन व विधवा होवोत, मृत्यू त्यांचे पुरुष ठार करो; त्यांचे तरुण लढाईत तलवारीने पडोत.


ह्या स्थळी यहूदा व यरुशलेम ह्यांची मसलत मी निष्फल करीन; त्यांच्या शत्रूंपुढे त्यांचा जीव घेण्यास टपणार्‍यांच्या हाताने, तलवारीने ते पडतील असे मी करीन; त्यांची प्रेते आकाशांतील पक्ष्यांना व पृथ्वीवरील श्वापदांना भक्ष्य म्हणून देईन.


ह्या नगरात जो राहील तो तलवारीने, दुष्काळाने, मरीने मरेल; जो बाहेर जाऊन तुम्हांला वेढा घालणार्‍या खास्द्यांना मिळेल तो जगेल, जिवानिशी सुटेल.


तरुण व वृद्ध रस्त्यांत जमिनीवर पडले आहेत; माझ्या कुमारी व माझे तरुण तलवारीने पडले आहेत; तू आपल्या क्रोधदिनी त्यांचा वध केला आहे; तू त्यांना वधले, गय केली नाहीस.


माझ्या लोकांतले जे सर्व पापी जन, ‘आम्हांला अनिष्ट गाठणार नाही, ते आमच्यावर येणार नाही,’ असे म्हणतात ते तलवारीने मरतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan