Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 3:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 परमेश्वर असेही म्हणतो : सीयोनेच्या कन्या गर्विष्ठ आहेत, त्या मान ताठ करून व डोळे मारत चालतात, आपल्या पायांतील नूपुरांचा छमछम आवाज करीत ठुमकत चालतात;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 परमेश्वर म्हणतो सियोनेच्या कन्या अहंकारी आहेत, आणि त्या ताठ मानेने आपले डोके उंचावून चालतात व आपल्या डोळ्यांनी प्रणयचेष्टा करतात, जातांना त्या चोखंदळपणा करतात व आपल्या पायांनी पैंजणाचा रुणझुण आवाज करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 याहवेह म्हणतात, “सीयोनातील स्त्रिया गर्विष्ठ आहेत, त्या मान उडवीत चालतात, चंचल नेत्रकटाक्षांनी मन वेधतात, पायातल्या पैजणांचा छुमछुम आवाज करीत, कंबर मटकत छोटी छोटी पावले टाकून चालतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 3:16
16 Iomraidhean Croise  

गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अध:पाताचे मूळ होय.


चढेल दृष्टी व गर्विष्ठ अंत:करण, तसाच दुर्जनांच्या शेताचा उपज ही पापरूप होत.


ज्याची दृष्टी कितीतरी उंच, व ज्याच्या पापण्या वर चढलेल्या आहेत असा एक वर्ग आहे.


सीयोननिवासी कन्यांनो, बाहेर या, शलमोन राजाला पाहा; त्याच्या विवाहदिवशी, त्याच्या मनाला उल्लास झाला त्या दिवशी, त्याच्या मातेने त्याला घातलेल्या मुकुटाने मंडित झालेला, असा हा पाहा.


सीयोनेची कन्या द्राक्षीच्या मळ्यातल्या खोपीसारखी, काकड्यांच्या बागेतल्या माचाळासारखी, वेढा पडलेल्या नगरासारखी राहिली आहे.


पृथ्वी शोकाकुल व कृश झाली आहे; जग झुरून कृश झाले आहे; पृथ्वीवरील प्रतिष्ठित जन जर्जर झाले आहेत.


पाहा, प्रभू, सेनाधीश परमेश्वर, हा यरुशलेम व यहूदा ह्यांचा आधार व टेका काढून घेतो, म्हणजे भाकरीचा सर्व आधार व पाण्याचा सर्व आधार काढून घेतो;


म्हणून प्रभू सीयोनेच्या कन्यांच्या माथ्यांवर खवडे उठवील व परमेश्वर त्यांची गुह्यांगे उघडी करील.


तो त्या दिवशी पैंजण, बिंद्या व चंद्रकोरी,


मी मुलांना त्यांचे अधिपती करीन; त्यांच्यावर पोरकटपणाचा अंमल चालेल.


प्रभू न्याय करणार्‍या व दहन करणार्‍या आत्म्याच्या द्वारे सीयोनेच्या कन्यांचा मळ काढून टाकील, आणि यरुशलेमेतून तिचा रक्तदोष काढून टाकील, तेव्हा असे घडेल.


ज्या ज्या बाबतीत तू माझ्याविरुद्ध उल्लंघन करावेस त्याविषयी त्या दिवसांत तुला लज्जित होण्याचे कारण पडणार नाही; कारण तेव्हा मी तुझ्या उन्नतीचा अभिमान धरणार्‍यांना तुझ्यातून नाहीतसे करीन; माझ्या पवित्र पर्वतावर तू ह्यापुढे तोरा मिरवणार नाहीस.


“सीयोनेच्या कन्येला सांगा, पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर, म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे.”


येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “अहो यरुशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan