Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 3:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तुम्ही माझ्या लोकांना चिरडता, दीनांचे तोंड ठेचता, हे काय?” असे प्रभू सेनाधीश परमेश्वर ह्याचे म्हणणे आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तुम्ही माझ्या लोकांचा संपूर्ण नाश का करीता व गरिबांना अतिशय यातना का देता? असे प्रभू, सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 माझ्या लोकांना चिरडण्याचे व गरिबांचे चेहरे ठेचण्याचे काय कारण होते?” प्रभू सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 3:15
17 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, ते तुझ्या लोकांचा चुराडा करतात, तुझ्या वतनाला पिडतात.


इस्राएल लोकांवर त्यांच्यापैकी जे नायक नेमले होते त्यांना फारोच्या मुकादमांनी मार देऊन विचारले की, “तुम्ही पूर्वी जितक्या विटा करीत होता, तितक्या काल व आज का केल्या नाहीत?”


पृथ्वीवरून गरीब व मनुष्यांपैकी कंगाल ह्यांना खाऊन नाहीतसे करावे, असे तलवारींसारखे ज्यांचे दात व सुर्‍यांसारख्या ज्यांच्या दाढा, असा एक वर्ग आहे.


ते दाद मागणार्‍या दुबळ्यांना धुडकावून लावतात व माझ्या प्रजेतल्या गरिबांचे हक्क बुडवतात; ते विधवांना लुटतात व पोरक्यांना नागवतात.


गरिबांतले गरीब पोटभर खातील; गरजवंत सुखाने झोप घेतील; तुझे मूळ मी क्षुधेने मारीन व तुझा अवशेष वधतील.


ते पायांखाली तुडवतील. गरिबांचे पाय, दीनाची पावलेदेखील ते तुडवतील.”


नम्र जनांचा परमेश्वराच्या ठायीचा आनंद वृद्धी पावेल; लोकांतील दीन जन इस्राएलाच्या पवित्र प्रभूच्या ठायी उल्लास पावतील.


ह्यामुळे इस्राएलाचा पवित्र प्रभू म्हणतो, “तुम्ही ह्या वचनाचा धिक्कार करून बलात्कार व कुटिलाचार ह्यांवर भिस्त ठेवता व अवलंबून राहता;


भ्रष्टाचार करावा, परमेश्वराविरुद्ध पाखंड सांगावे, भुकेला जीव भुकेला ठेवावा, तान्हेल्यास प्यायला काही मिळू देऊ नये म्हणून मूर्ख मूर्खतेचे भाषण करतो, त्याचे मन अधर्म करते.


कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएलाचे घराणे; त्यातील त्याची आवडीची लागवड म्हणजे यहूदाचे लोक; त्याने न्याय्यत्वाची अपेक्षा केली तर अपहार, नीतिमत्तेची अपेक्षा केली तर आक्रोश आढळून आला.


पाहा, तुमच्या उपासांचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्या वेळी कटकटी करता व दुष्टपणाने ठोसाठोशी करता; तुमचा शब्द उर्ध्वलोकी ऐकू जावा ह्यासाठी तुमचे हल्लीचे उपास आहेत असे नाही.


कारण तो म्हणाला, खरोखर हे माझे लोक आहेत, कधीही लबाडी करणार नाहीत अशी ही मुले आहेत; म्हणून तो त्यांचा त्राता झाला.


“बापांनी आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात आंबले, ही म्हण तुम्ही इस्राएल देशात वापरता ती का?


तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “अरे, झोप घेत काय पडलास? ऊठ, आपल्या देवाचा धावा कर, न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हायचा नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan