Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 3:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 माझ्या लोकांविषयी म्हणाल तर पोरे त्यांना पिडतात; स्त्रिया त्यांच्यावर अधिकार चालवतात. हे माझ्या प्रजे, तुझे नेते तुला बहकवतात; त्यांनी तुझ्या जाण्याच्या वाटा बुजवून टाकल्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 माझ्या लोकांनो; लेकरे तुम्हावर जुलूम करतात व स्त्रिया त्यांच्यावर राज्य करतात. माझ्या लोकांनो, तुमचे पुढारी तुम्हास योग्य मार्गापासून दूर नेतात, व तुमच्या मार्गाविषयी तुम्हास गोंधळात टाकतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 तरुण माझ्या लोकांवर अत्याचार करतात, स्त्रिया त्यांच्यावर राज्य करतात. माझ्या लोकांनो, तुमचे मार्गदर्शक तुमची दिशाभूल करतात; ते तुम्हाला पथभ्रष्ट करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 3:12
15 Iomraidhean Croise  

अहज्याची आई अथल्या हिने आपला पुत्र मेला आहे असे पाहिले तेव्हा तिने उठून सर्व राजवंशाचा संहार केला.


ते माझ्या मार्गाची नासाडी करतात, ज्यांना कोणी साहाय्य नाही, तेदेखील माझ्या नाशास साहाय्य होतात.


ज्या अधिपतीला बुद्धी कमी त्याचा जुलूम फार, ज्याला लोभीपणाचा तिटकारा वाटतो तो दीर्घायुषी होतो.


हे देशा, तुझा राजा अल्पवयी असला व तुझे सरदार प्रातःकाळी उठून खातपीत बसले तर तुझी दुर्दशा केवढी!


परमेश्वराने त्यांच्यात भ्रांतवृत्ती घातली आहे; मद्यपी वांती करीत लोळतो तसे त्यांनी मिसर देशाला त्याच्या प्रत्येक कामात बहकवले आहे.


मी मुलांना त्यांचे अधिपती करीन; त्यांच्यावर पोरकटपणाचा अंमल चालेल.


तुझा प्रभू परमेश्वर, आपल्या लोकांचा कैवारी जो तुझा देव, तो म्हणतो, “पाहा, झोकांडे देणारा प्याला, माझ्या क्रोधाचा कटोरा तुझ्या हातातून मी काढून घेतो; ह्यापुढे तू तो पिणार नाहीस;


संदेष्टे खोटे संदेश देतात, त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवतात व माझ्या लोकांनाही असेच आवडते; पण अखेरीस तुम्ही काय करणार?


जे संदेष्टे माझ्या लोकांना बहकवतात, काही चावण्यास मिळाले तर ‘कल्याण असो,’ असे जे म्हणतात व ज्याच्यापासून त्यांना चावण्यास मिळत नाही त्याच्याबरोबर लढण्याची जे तयारी करतात, त्यांच्याविषयी परमेश्वर असे म्हणतो.


पाहा, तुझ्यात राहणारे लोक केवळ स्त्रिया आहेत; तुझ्या देशाचे दरवाजे तुझ्या शत्रूंना खुले झाले आहेत; अग्नीने तुझे अडसर खाऊन टाकले आहेत.


त्यांना असू द्या; ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडे आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील.”


अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता; तुम्ही स्वतःही आत जात नाही व आत जाणार्‍यांनाही आत जाऊ देत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan