Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 3:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 नीतिमानांविषयी म्हणा की त्यांचे कल्याण होणार; कारण ते आपल्या कृत्यांचे फळ उपभोगणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 नीतिमानास सांगा कि त्यांचे भले होईल; कारण ते आपल्या कृतींचे फळ खातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 परंतु नीतिमानास सांगा त्यांना सुस्थिती येईल. त्यांच्या सत्कृत्यांचे त्यांना प्रतिफळ मिळेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 3:10
28 Iomraidhean Croise  

ह्या प्रकारची कृती तुझ्यापासून दूर राहो. ज्यामुळे नीतिमानाची आणि दुष्टाची सारखीच गत होईल असा दुर्जनाबरोबर नीतिमानाचा वध करणे तुझ्यापासून दूर राहो; सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?”


तेव्हा माणसे म्हणतील की, “नीतिमानास खचीत फलप्राप्ती होते, खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे.”


ह्याबद्दल देवाने सुइणींचे कल्याण केले, इस्राएल लोक तर बहुगुणित होऊन फार प्रबल झाले.


नीतिमानाच्या मस्तकी आशीर्वाद असतात; दुर्जनांचे मुख बलात्काराने व्याप्त असते.


आपल्या मुखातून निघालेल्या गोष्टींच्या योगे मनुष्य तृप्त होतो, आणि मनुष्याला आपल्या हातच्या कर्माचे प्रतिफल मिळते.


पाप्यांच्या पाठीस अरिष्ट लागते, पण नीतिमानांस कल्याणरूप प्रतिफळ मिळते.


जिव्हेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत; तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात.


पापी शंभरदा पाप करून पुष्कळ दिवस वाचला तरी माझी खातरी आहे की देवाचे भय बाळगणारे जे त्याला भिऊन वागतात त्यांचे कल्याणच होईल;


तुझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही; तुझ्यावर आरोप ठेवणार्‍या सर्व जिव्हांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकांचे हेच वतन आहे, हीच माझ्याकडून मिळालेली त्यांची नीतिमत्ता आहे, असे परमेश्वर म्हणतो.”


परमेश्वर म्हणतो, तुझ्या बर्‍यासाठी मी तुला खचीत बळ देईन; अनिष्टाच्या व क्लेशाच्या समयी शत्रू तुझी विनवणी करतील असे मी खचीत करीन.


परमेश्वर म्हणतो, तुमच्या करणीच्या फळाप्रमाणे मी तुमचा समाचार घेईन; तिच्या वनात मी अग्नी पेटवीन, तो तिच्या आसपासचे सगळे भस्म करील.”


तू गंधसरूची शेखी मिरवतोस म्हणून तू राजा ठरशील काय? तुझा बाप खातपीत व न्यायाने व नीतीने वागत नसे काय? तेव्हा त्याचे बरे चालले होते.


तर मी त्यांना एवढीच आज्ञा केली की, ‘माझे वचन ऐका, म्हणजे मी तुमचा देव होईन व तुम्ही माझे लोक व्हाल; तुमचे बरे व्हावे म्हणून जो सरळ मार्ग मी तुम्हांला सांगतो त्याने चाला.’


जो जीवात्मा पाप करील तोच मरेल; मुलगा बापाच्या पातकाचा भार वाहणार नाही, आणि बाप मुलग्याच्या पातकाचा भार वाहणार नाही; नीतिमानाला त्याच्या नीतिमत्तेचे फळ मिळेल; दुष्टाला त्याच्या दुष्टतेचे फळ मिळेल.


परमेश्वर त्याला म्हणाला, “नगरामधून, यरुशलेमेमधून जाऊन जी माणसे आपल्यात होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत त्यांच्या कपाळावर चिन्ह कर.”


तथापि देश, आपल्या रहिवाशांमुळे, त्यांच्या कृत्यांच्या फळामुळे वैराण होईल.


देशातील सर्व नम्र जनांनो, परमेश्वराच्या न्यायानुसार चालणार्‍यांनो, त्याचा आश्रय करा, नीतिमत्ता व नम्रता ह्याचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्वराच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.


मग तुम्ही वळाल, आणि नीतिमान व दुष्ट ह्यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा ह्यांच्यातला भेद तुम्हांला कळेल.


त्यालाही त्याने म्हटले, ‘तुलाही पाच नगरांवर अधिकार दिला आहे.’


परमेश्वराच्या दृष्टीने जे यथार्थ ते तू केल्याने तुझे व तुमच्या पश्‍चात तुझ्या संततीचे कल्याण व्हावे म्हणून ते सेवन करू नये.


कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan