Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 3:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 पाहा, प्रभू, सेनाधीश परमेश्वर, हा यरुशलेम व यहूदा ह्यांचा आधार व टेका काढून घेतो, म्हणजे भाकरीचा सर्व आधार व पाण्याचा सर्व आधार काढून घेतो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 पाहा, प्रभू, सेनाधीश परमेश्वर, यरूशलेम व यहूदा यांच्यापासून आधार व टेका काढून घेत आहे, म्हणजे भाकरीचा संपूर्ण साठा आणि संपूर्ण पाणी पुरवठा काढून घेत आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 आता बघा, प्रभू सर्वसमर्थ याहवेह यरुशलेम व यहूदीयाचा अन्नपुरवठा आणि पाठिंबा दोन्हीही बंद करणार आहेत— सर्व अन्नाचा पुरवठा आणि पाण्याचा पुरवठा,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 3:1
19 Iomraidhean Croise  

चवथ्या महिन्याच्या नवमीपासून नगरात एवढी महागाई झाली की देशाच्या लोकांना काही खायला मिळेना.


त्याने देशावर दुष्काळ आणला; त्यांचा अन्नाचा आधार अगदी तोडून टाकला.


ह्यासाठी प्रभू, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा समर्थ देव म्हणतो, “माझ्या शत्रूंचा समाचार घेऊन मी स्वस्थता पावेन, माझ्या वैर्‍यांचा सूड घेईन.


मनुष्याचे नावच घेऊ नका; त्याचा श्वास त्याच्या नाकपुड्यांत आहे; त्याला काय जमेस धरायचे आहे?


परमेश्वर असेही म्हणतो : सीयोनेच्या कन्या गर्विष्ठ आहेत, त्या मान ताठ करून व डोळे मारत चालतात, आपल्या पायांतील नूपुरांचा छमछम आवाज करीत ठुमकत चालतात;


रब-शाके ह्याने उत्तर केले की, “माझ्या धन्याने केवळ तुझ्या धन्याशी व तुझ्याशी हे बोलण्यास मला पाठवले काय? कोटावर बसलेल्यांनी तुमच्याबरोबर आपले मलमूत्र भक्षण करावे म्हणून त्यांच्याकडेही मला पाठवले नाही काय?”


ह्यास्तव माझे लोक अज्ञानामुळे बंदिवासात गेले आहेत; त्यांतले प्रतिष्ठित उपाशी मरत आहेत, आणि लोकसमुदाय तृषाक्रांत झाला आहे.


तुझा प्रभू परमेश्वर, आपल्या लोकांचा कैवारी जो तुझा देव, तो म्हणतो, “पाहा, झोकांडे देणारा प्याला, माझ्या क्रोधाचा कटोरा तुझ्या हातातून मी काढून घेतो; ह्यापुढे तू तो पिणार नाहीस;


ते उजवीकडे लचके तोडतात तरी भुकेले राहतात; ते डावीकडे खातात तरी त्यांची तृप्ती होत नाही; प्रत्येक जण आपल्याच बाहूचे मांस खातो,


मग सिद्कीया राजाच्या आज्ञेने त्यांनी यिर्मयाला पहारेकर्‍यांच्या चौकात ठेवले आणि नगरातील सर्व भाकरी संपेपर्यंत भटारआळीतून रोज त्याला एक भाकर मिळत असे. ह्याप्रमाणे यिर्मया पहारेकर्‍यांच्या चौकात राहिला.


“स्वामीराज, ह्या लोकांनी यिर्मया संदेष्ट्याला जे सर्व केले ते फार वाईट केले; त्यांनी त्याला विहिरीत टाकले; तो आहे तेथे उपासमार होऊन मरेल, कारण नगरात काही अन्न उरले नाही.”


परमेश्वराच्या कोपामुळे यरुशलेम व यहूदा ह्यांची अशी दशा झाली की शेवटी त्याने त्यांना आपल्या दृष्टिआड केले; सिद्कीयाने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केले.


चौथ्या महिन्याच्या नवमीपासून नगरात एवढी महागाई झाली की देशाच्या लोकांना काही खाण्यास मिळेना.


आमचेच पाणी आम्ही पैका देऊन पितो; आमचेच लाकूड आम्हांला मोल देऊन मिळते.


“मानवपुत्रा, एखाद्या देशाने विश्वासघात करून माझ्याविरुद्ध पातक केल्यास मी त्यावर आपला हात चालवीन, त्याच्या अन्नाचा आधार तोडीन, देशात दुष्काळ पाडीन, आणि त्यातून मनुष्य व पशू ह्यांचा उच्छेद करीन;


मी तुमच्या भाकरीचा आधार मोडीन, तेव्हा दहा स्त्रिया एकाच भट्टीत तुमची भाकर भाजतील आणि ती तुम्हांला तोलून परत देतील; ती खाऊन तुमची तृप्ती व्हायची नाही.


“मी तर तुम्हांला तुमच्या सर्व नगरांत दातांची स्वच्छता दिली, व तुमच्या सर्व स्थानांत भाकरीची वाण पाडली, तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


तर तू आता अशी मोठ्याने का आक्रोश करतेस? तुझ्यामध्ये कोणी राजा नाही काय? तुझा मंत्री मेला काय? कारण प्रसवत्या स्त्रीसारख्या तुला कळा लागल्या आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan