Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 29:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 थांबा, विस्मय पावा, आपले डोळे मिटा, अंध व्हा; ते मस्त झाले आहेत पण द्राक्षारसाने नव्हत; ते झोकांडे खात आहेत पण मद्याने नव्हत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तुम्ही विस्मित व आश्चर्यचकित व्हा, तुम्ही आपणास आंधळे करा आणि आंधळे व्हा. ते धुंद आहेत पण द्राक्षरसाने नव्हे. ते झूलत आहेत पण मद्याने नव्हे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 सुन्न व्हा आणि आश्चर्याने थक्क व्हा, तुम्ही स्वतःला अंध करा आणि दृष्टीहीन व्हा. झिंगलेले व्हा, परंतु मद्याने नव्हे, लटपटणारे व्हा, परंतु मद्याने नव्हे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 29:9
25 Iomraidhean Croise  

हे आकाशा, ऐक; अगे पृथ्वी, कान दे, कारण परमेश्वर बोलत आहे : “मी मुलांचे पालनपोषण केले, त्यांना लहानाचे मोठे केले तरी ती माझ्याशी फितूर झाली.


परमेश्वराने त्यांच्यात भ्रांतवृत्ती घातली आहे; मद्यपी वांती करीत लोळतो तसे त्यांनी मिसर देशाला त्याच्या प्रत्येक कामात बहकवले आहे.


अरीएल1 ह्याला धिक्कार असो! दाविदाने तळ दिलेले अरीएल नगर ह्याला धिक्कार असो! ह्या वर्षात आणखी एक वर्ष मिळवा, सणांचा एक फेरा होऊ द्या.


परमेश्वराने गाढ झोपेची धुंदी तुमच्यावर घातली आहे. तुमचे नेत्र बांधून टाकले आहेत, संदेष्टे व तुमचे प्रमुख जे द्रष्टे त्यांच्यावर पडदा टाकला आहे.


तुझा छळ करणार्‍यांना स्वतःचेच मांस खायला लावीन; नव्या द्राक्षारसाने जसे लोक मस्त होतात तसे ते आपल्या रक्ताने मस्त होतील; ह्यावरून मी परमेश्वर तुझा त्राता, तुझा उद्धारकर्ता, याकोबाचा समर्थ प्रभू आहे हे सर्व मानवजातीला समजेल.”


हे यरुशलेमे, जागी हो, जागी हो, ऊठ; तू परमेश्वराच्या हातून त्याच्या क्रोधाचा प्याला पिऊन टाकला आहेस; झोकांडे देणारा कटोरा तू प्यालीस, त्यातील थेंबही उरला नाही.


त्याचे जागल्ये आंधळे आहेत, ते सगळे ज्ञानशून्य आहेत; ते सगळे मुके कुत्रे आहेत, त्यांना भुंकता येत नाही; ते बरळणारे, पडून राहणारे, निद्राप्रिय असे आहेत.


ह्या लोकांनी डोळ्यांनी पाहून, कानांनी ऐकून व मनाने समजून माझ्याकडे वळून सुधारू नये म्हणून त्यांचे हृदय जड कर, त्यांचे कान बधिर कर व त्यांचे डोळे चिपडे कर.”


मी आपल्या क्रोधाने राष्ट्रांना तुडवले; मी त्यांना आपल्या संतापाच्या मद्याने बेहोश केले व त्यांचे रक्त भूमीवर वाहवले.


तेव्हा त्यांना तू सांग, ‘पाहा, परमेश्वर म्हणतो, मी ह्या देशाचे सर्व रहिवासी म्हणजे दाविदाच्या गादीवर बसणारे राजे, याजक, संदेष्टे व सर्व यरुशलेमनिवासी ह्यांना मद्याने मस्त करीन.


हे आकाशा, हे पाहून भयचकित हो; थरथर काप, शुष्क होऊन जा, असे परमेश्वर म्हणतो.


संदेष्ट्यांविषयी : माझे हृदय माझ्या ठायी भग्न झाले आहे; माझी सर्व हाडे थरथर कापत आहेत; परमेश्वर व त्याची पवित्र वचने ह्यांमुळे मी मद्यप्यासारखा, द्राक्षारसाने मस्त झालेल्या मनुष्यासारखा झालो आहे.


“तू त्यांना सांग, ‘सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो : मी तुमच्यामध्ये तलवार पाठवतो म्हणून प्या, मस्त व्हा, वांती करा, पडा, पुन्हा उठू नका.’


“परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की राजाचे व सरदारांचे काळीज ठाव सोडील; याजकांची त्रेधा उडेल आणि संदेष्टे भयचकित होतील.”


बाबेल परमेश्वराच्या हातातला सर्व पृथ्वीस मस्त करणारा सोनेरी पेला होता; राष्ट्रे त्याचा द्राक्षारस प्याली म्हणून ती वेडी झाली आहेत.


ऊस देशात राहणार्‍या अदोमाच्या कन्ये, आनंद व हर्ष करून घे; पेला तुझ्याकडेही येईल; तू मस्त होऊन आपणास नग्न करशील.


राष्ट्रांनो, लक्ष देऊन पाहा व आश्‍चर्यचकित व्हा. कारण तुमच्या काळात मी एक कार्य करतो, तुम्हांला सांगितले तरी तुम्ही विश्वास धरणार नाही.


आणि तो आपल्या शिष्यांकडे येऊन त्यांना म्हणाला, “आता झोप व विसावा घ्या, पाहा, घटका जवळ आली आहे, आणि मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे.


पुन्हा तिसर्‍या खेपेस येऊन तो त्यांना म्हणाला, “तुम्ही अजूनही झोप व विसावा घेत आहात का? पुरे झाले; घटका आली आहे; पाहा, मनुष्याचा पुत्र पापी माणसांच्या हाती धरून दिला जात आहे.


ती स्त्री पवित्र जनांच्या रक्ताने व येशूच्या रक्तसाक्ष्यांच्या रक्ताने मस्त झालेली माझ्या दृष्टीस पडली. तिला पाहून मला फार आश्‍चर्य वाटले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan