यशायाह 29:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कोणी भुकेला स्वप्नात जेवतो आणि जागा होऊन पाहतो तो पोट रितेच; कोणी तहानलेला स्वप्नात पितो आणि जागा होऊन पाहतो तो मूर्च्छित व तहानेने व्याकूळ झालेला; तशीच सीयोन पर्वताविरुद्ध उठलेल्या सर्व राष्ट्रसमूहाची स्थिती होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 हे असे असणार की एक भुकेला मनुष्य आपण खात आहे असे स्वप्न पाहतो, पण जेव्हा तो जागा होतो तर त्याचे पोट रिकामेच असते. हे असे असणार की तान्हेला स्वप्न पाहतो की तो पीत आहे, पण तो जागा होतो आणि पाहा तो मूर्छित आहे व त्याचा जीव त्रासलेला आहे, होय, जे राष्ट्र समुदाय सियोन पर्वताविरूद्ध लढतात त्यांची अशीच स्थिती होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जसे भूक लागलेला मनुष्य अन्न खात असल्याची स्वप्ने पाहतो, परंतु तो जागा होतो तेव्हा भुकेलाच असतो; जसे तहान लागलेला मनुष्य जेव्हा पाणी पिण्याची स्वप्ने पाहतो, परंतु तो जागृत होतो तेव्हा दुर्बल आणि तहानलेलाच असतो. तशाच प्रकारे सीयोन पर्वताविरुद्ध लढणाऱ्या सर्व राष्ट्रांच्या झुंडींचे होईल. Faic an caibideil |