Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 29:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तरी तुझ्या शत्रूंचा समुदाय रजःकणांसारखा होईल, तुला पिडणार्‍यांचा समुदाय उडणार्‍या भुसासारखा होईल; हे एका क्षणात, एकाएकी घडेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तुझ्या शत्रूंचा समुदाय धुळीच्या कणांसारखा आणि निर्दयांचा समुदाय उडत्या भुसासारखा होईल आणि हे एका क्षणांत एकाएकी घडणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 परंतु तुमचे पुष्कळ शत्रू बारीक धुळीसारखे होतील, उडालेल्या भुशासारखे निर्दयी लोकांच्या झुंडी. अचानक, एका क्षणातच,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 29:5
24 Iomraidhean Croise  

वार्‍याने जसे धसकट उडते, तुफानाने जसे भूस उडते, तसे ते नष्ट झाले, असे कितीदा घडते?


दुर्जन तसे नाहीत, ते वार्‍याने उडून जाणार्‍या भुसासारखे आहेत.


ते वार्‍याने उडून चाललेल्या भुसासारखे होवोत, परमेश्वराचा दूत त्यांना उधळून लावो.


मी जगाचे त्याच्या दुष्टतेबद्दल व पातक्यांचे त्यांच्या अन्यायाबद्दल पारिपत्य करीन; गर्विष्ठांचा दिमाख बंद करीन, जुलम्यांचा तोरा उतरवीन.


ह्यास्तव आडदांड लोक तुझे गौरव करतील, बलात्कारी लोकांची शहरे तुझे भय धरतील.


कारण निर्दय लोकांचा झपाटा भिंतीवर आदळणार्‍या वादळाप्रमाणे आहे; पण तू दुर्बलास दुर्ग, लाचारास विपत्काली आश्रय, वादळात निवारा, उन्हात सावली, असा झालास.


रुक्ष भूमीवरील जसा सूर्याचा ताप शांत व्हावा तसा निर्दय लोकांचा गोंगाट तू शांत करतोस; मेघांच्या छायेने जसा सूर्याचा ताप क्षीण होतो तसे बलात्कार्‍यांचे जयगीत होते.


कारण जुलमी नाहीतसे झाले आहेत; हेटाळणी करणारे आटोपले आहेत, वाइटाला जागणारे सर्व समूळ उच्छेद पावले आहेत.


म्हणून एकाएकी कोसळून पडणार्‍या उंच भिंतीच्या सुटलेल्या भागाप्रमाणे ह्या अधर्माचे तुम्हांला अकस्मात फळ मिळेल;


मिसरी तर मानव आहेत, देव नाहीत; त्यांचे घोडे रक्तमांसाचे आहेत, आत्मरूप नाहीत; परमेश्वर आपला हात उगारील तेव्हा साहाय्यकर्ता ठोकर खाईल व साहाय्य पावलेलाही पडेल; ते सर्व एकंदर विनाश पावतील.


“अश्शूर तलवारीने पडेल पण मनुष्याच्या नव्हे; मनुष्याची नव्हे अशी तलवार त्याला ग्राशील; तो तलवारीपुढून पळेल; त्याच्या तरुण पुरुषांना वेठीस धरतील.


मग परमेश्वराच्या दिव्यदूताने जाऊन अश्शूरी गोटातल्या एक लक्ष पंचाऐंशी हजार लोकांना मारले; पहाटेस लोक उठून पाहतात तर सर्व प्रेतेच प्रेते!


पाहा, त्याच्या हिशोबी राष्ट्रे पोहर्‍यांतल्या जलबिंदूसमान, तराजूतल्या रजासमान आहेत; पाहा, द्वीपेही तो धुळीच्या कणांसारखी उचलतो.


पाहा, जे तुझ्यावर क्षुब्ध झाले ते लज्जित व फजीत होतील; तुझ्याशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील.


पाहा, मी तुझे तीक्ष्ण, नवीन व दुधारी असे मळणीचे औत बनवत आहे; तू डोंगर मळून त्यांचा चुराडा करशील व टेकड्यांचा भुसा करशील.


तू त्यांना उफणशील, वारा त्यांना उडवून टाकील, वावटळ त्यांना उधळून देईल; आणि तू परमेश्वराच्या ठायी उल्लास पावशील, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचा अभिमान धरशील.


ह्यामुळे मंत्रतंत्रांनी निवारता येणार नाही अशी विपत्ती तुझ्यावर येईल; खंडणी देऊन टाळता येणार नाही असे अरिष्ट तुझ्यावर येईल; तुझ्या ध्यानीमनी नाही असा नाश तुला एकाएकी गाठील.


“मी मागेच पूर्वीच्या गोष्टी सांगितल्या, माझ्या मुखातून त्या निघाल्या, मी त्या कळवल्या; मी त्या अकस्मात करू लागलो, आणि त्या घडून आल्या.


तोच बलवानांवर एकाएकी नाश आणतो, म्हणजे मग दुर्गाचा विध्वंस होतो.


“शांती आहे, सुरक्षितता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan