Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 29:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 जे परमेश्वरापासून आपले मनसुबे लपवतात, आपला कारभार अंधारात चालवतात आणि “आम्हांला कोण पाहतो, आमचे कोणाला कळते,” असे म्हणतात, त्यांना धिक्कार असो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 जे परमेश्वरापासून आपल्या योजना खोल लपवतात, आणि ज्यांची कृत्ये अंधारात आहेत, व जे असे म्हणतात, “आम्हांला कोण पाहते? आणि ओळखते? त्यांना हायहाय!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 धिक्कार असो, जे त्यांच्या योजना याहवेहपासून लपविण्यासाठी खूप खोलवर जातात, जे त्यांची कार्ये अंधारात करतात आणि असा विचार करतात, “आम्हाला कोण पाहतो? हे कोणाला माहीत होईल?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 29:15
30 Iomraidhean Croise  

तिचे सुतक संपल्यावर दाविदाने लोक पाठवून तिला आपल्या घरी बोलावून आणून ठेवून घेतले व ती त्याची स्त्री झाली. पुढे तिला पुत्र झाला; पण दाविदाने हे जे कृत्य केले त्यावरून परमेश्वराची त्याच्यावर इतराजी झाली.


तसेच इस्राएल लोकांनी आपला देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध अनुचित गोष्टी गुप्तपणे केल्या; पहारेकर्‍यांचे बुरूज असोत की तटबंदीची नगरे असोत, अशा आपल्या सर्व नगरांत त्यांनी उच्च स्थाने स्थापन केली.


अधर्मी ज्यात लपून राहतील असा काळोख, असा घोर अंधकार नाही.


पाहा, ते आपल्या मुखावाटे दुष्ट उद्‍गार काढतात; त्यांच्या तोंडचे शब्द तलवारीच आहेत; कारण, “ऐकतो कोण?” असे ते म्हणतात;


ते आणखी म्हणतात, “देवाला कसे समजणार? परात्पराला काय ज्ञान आहे?”


ते तुझ्या लोकांविरुद्ध कपटाची योजना करतात; तुझ्या आश्रितांविरुद्ध ते मसलत करतात.


तुम्ही म्हणता, “आम्ही मृत्यूबरोबर करार केला आहे, अधोलोकाबरोबर संकेत केला आहे; संकटाचा लोट येईल तेव्हा तो आमच्यावर येणार नाही, कारण आम्ही लबाडीचा आश्रय केला आहे व कपटाखाली दडून राहिलो आहोत.”


न्याय ही दोरी व नीतिमत्ता हा ओळंबा असे मी करीन; लबाडीचा आश्रय गारांनी वाहून जाईल, व दडण्याची जागा जलाचे ओघ बुडवून टाकतील.”


परमेश्वर म्हणतो, “फितुरी मुले हायहाय करतील; ती मसलती करतात पण त्या माझ्या प्रेरणेने करीत नाहीत; ती करारमदार करतात पण माझ्या आत्म्याला अनुसरून करीत नाहीत; अशी ती पापाने पाप वाढवतात;


कारण तू आपल्या दुष्टतेवर भिस्त ठेवलीस; तू म्हणालीस, “कोणी मला पाहत नाही;” तुझे शहाणपण व तुझे ज्ञान ह्यांनी तुला बहकवले म्हणून तू आपल्या मनात म्हणालीस, “मीच आहे, माझ्यावेगळी कोणी नाही.”


तुझी नीतिमत्ता मी उजेडात आणीन; तुझ्या कर्मांविषयी म्हणशील तर त्यांपासून तुला काहीएक लाभ होणार नाही.


परमेश्वर म्हणतो, माझ्या दृष्टीस पडणार नाही अशा गुप्त स्थळी कोणाला लपता येईल काय? मी आकाश व पृथ्वी व्यापून राहत नाही काय? असे परमेश्वर म्हणतो.


तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएल घराण्याचा प्रत्येक वडील आपल्या मूर्तिगृहात अंधारामध्ये काय करीत आहे हे तुला दिसते ना? ते तर म्हणतात की, ‘परमेश्वर आम्हांला पाहत नाही; परमेश्वराने देशाचा त्याग केला आहे.”’


त्याने मला म्हटले, “मानवपुत्रा, भिंत खण”; मी भिंत खणली तर पाहा, एक दार लागले.


तेव्हा तो मला म्हणाला, “इस्राएल व यहूदा ह्यांच्या घराण्याचा अधर्म अत्यंत भारी आहे; देश रक्तपाताने भरला आहे; कारण ते म्हणतात, ‘परमेश्वराने देशाचा त्याग केला आहे, परमेश्वर पाहत नाही.’


फितुरी लोक भ्रष्टाचारात बुडून गेले आहेत; तर त्या सर्वांना शासन करणारा मी आहे.


त्या समयी असे होईल की मी दिवट्या घेऊन यरुशलेमेची तपासणी करीन; व जे खाली गाळ असलेल्या द्राक्षारसासारखे मंदावले आहेत आणि आपल्या मनात म्हणतात की, ‘परमेश्वर बरे करत नाही व वाईटही करत नाही,’ त्यांचा मी समाचार घेईन.


तुम्ही आपल्या भाषणाने परमेश्वराला कंटाळा आणला आहे, तरी तुम्ही म्हणता, ‘आम्ही कशाने त्याला कंटाळा आणला?’ तुम्ही म्हणता, ‘प्रत्येक दुष्कर्मी इसम परमेश्वराच्या दृष्टीने चांगला आहे व तो त्याच्यासंबंधाने संतुष्ट असतो, नाहीतर न्याय करणारा देव आहे कुठे?’ अशाने तुम्ही त्याला कंटाळा आणला आहे.


निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती.


म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका; तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील; आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील.


आम्ही लाजिरवाण्या गुप्त गोष्टी वर्ज्य केल्या आहेत, आम्ही कपटाने चालत नाही व देवाच्या वचनाविषयी कपट करत नाही; तर सत्य प्रकट करून देवासमक्ष प्रत्येक माणसाच्या सदसद्विवेकाला आपणांस पटवतो.


मी तिच्या मुलाबाळांना जिवे मारीन, म्हणजे सर्व मंडळ्यांना कळून येईल की, मी ‘मने व अंत:करणे ह्यांची पारख करणारा’ आहे आणि तुम्हा ‘प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देईन.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan