Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 29:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 प्रभू म्हणाला आहे की, “हे लोक माझ्यासमीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करतात, तरी माझ्यापासून आपले अंतःकरण दूर राखतात, आणि हे माझे भय बाळगतात ते केवळ मनुष्यांनी पढवलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 माझा प्रभू म्हणतो, हे लोक, माझ्यावर त्यांचे प्रेम आहे, असे म्हणतात ते शब्दांनी माझ्याबद्दलचा आदर व्यक्त करतात. पण त्यांची मने माझ्यापासून फार दूर आहेत. त्यांचा माझ्याबद्दलचा आदर, म्हणजे फक्त त्यांनी पाठ केलेले व मनुष्यांनी घालून दिलेले नियम आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 प्रभू असे म्हणतात: “हे लोक केवळ त्यांच्या मुखाने माझा सन्मान करतात, पण त्यांची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत. माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; त्यांची शिकवण केवळ मानवी नियम आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 29:13
25 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, न्यायवाद ऐक, माझ्या आरोळीकडे लक्ष दे, माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे.


दुर्जनाला तर देव म्हणतो : “माझे नियम विदित करणारा तू कोण? माझा करार आपल्या मुखाने उच्चारणारा तू कोण?


त्याच्या वचनांत तू काही भर घालू नकोस, घालशील तर तो तुझा दोष उघड करील आणि तू लबाड ठरशील.


मी त्याला अधर्मी राष्ट्रावर पाठवीन. माझ्या क्रोधास पात्र झालेल्या लोकांची लूट हरण करावी, त्यांनी लुबाडलेल्या मत्तेचा अपहार करावा व त्यांना रस्त्यांवरील चिखलाप्रमाणे तुडवावे, अशी त्यांच्यासंबंधाने त्यास आज्ञा करीन.


अरीएल1 ह्याला धिक्कार असो! दाविदाने तळ दिलेले अरीएल नगर ह्याला धिक्कार असो! ह्या वर्षात आणखी एक वर्ष मिळवा, सणांचा एक फेरा होऊ द्या.


ज्याला वाचता येत नाही अशाजवळ तो देऊन म्हणतात, “एवढे वाचून दाखव;” तो म्हणतो, “मला वाचता येत नाही.”


मार्गातून निघा, वाटेवरून दूर व्हा, आमच्यासमोरून इस्राएलाच्या पवित्र प्रभूस दूर करा.”


म्हणून त्याने त्यांच्यावर आपला कोप, आपला संताप व युद्धाचा गहजब ह्यांचा वर्षाव केला; त्याला चोहोकडून आग लागली तरी त्याला कळले नाही; तिचा भडका झाला तरी त्याने त्याची पर्वा केली नाही.


हे परमेश्वरा, आम्हांला तुझ्या ह्या मार्गातून का बहकू देतोस? आम्ही तुझे भय बाळगू नये इतकी आमची मने कठोर का करतोस? तुझे सेवक, तुझे वतन झालेले वंश ह्याच्याकरिता परत ये.


तू त्यांना लावले आहेस, त्यांनी मूळ धरले आहे; ते वाढून त्यांना फळे येतात; तू त्यांच्याजवळ त्यांच्या मुखात असतोस पण त्यांच्या अंतर्यामापासून तू दूर असतोस.


इतके असूनही तिची बेइमान बहीण यहूदा मनापासून माझ्याकडे वळली नाही, तर कपटाने वळली, असे परमेश्वर म्हणतो.”


ह्या प्रकारे तुम्ही आपला जीव धोक्यात घातला आहे; कारण परमेश्वर तुमचा देव ह्याच्याकडे मला पाठवून तुम्ही म्हटले की, ‘परमेश्वर आमचा देव ह्याची आमच्यासाठी प्रार्थना कर व परमेश्वर आमचा देव सांगेल ते सर्व आम्हांला कळव म्हणजे त्याप्रमाणे आम्ही करू.


“परमेश्वराच्या जीविताची शपथ,” असे ते म्हणतात, तरी ती शपथ खोटी आहे.


इस्राएलाच्या वडिलांपैकी कित्येक माणसे माझ्याकडे येऊन माझ्यासमोर बसली.


हे मानवपुत्रा, तुझे बांधव भिंतींजवळ, दरवाजांजवळ तुझ्याविषयी बोलत आहेत; एक दुसर्‍याला, भाऊ भावाला म्हणतो, ‘चला, परमेश्वराकडून काय वचन आले ते ऐकू या.’


त्यांनी कधी मनापासून माझा धावा केला नाही; ते आपल्या बिछान्यांवर पडून धान्य व द्राक्षारस ह्यांसाठी ओरडतात; ते जमा होऊन माझ्याविरुद्ध बंड करतात.


मग तो म्हणाला, “मी तर पाप केलेच आहे, तरीपण आता माझ्या प्रजेच्या वडील जनांसमोर व इस्राएलासमोर माझा मान राखा व माझ्याबरोबर परत या म्हणजे आपला देव परमेश्वर ह्याची मी उपासना करीन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan