Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 29:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 परमेश्वराने गाढ झोपेची धुंदी तुमच्यावर घातली आहे. तुमचे नेत्र बांधून टाकले आहेत, संदेष्टे व तुमचे प्रमुख जे द्रष्टे त्यांच्यावर पडदा टाकला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 कारण परमेश्वराने तुम्हावर गाढ झोपेचा आत्मा ओतला आहे. त्याने तुमचे डोळे बंद केले आहेत, जे भविष्यवादी आहेत आणि परमेश्वर तुमची डोकी झाकले, जे तुम्ही दृष्टांत पाहता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 याहवेहनी तुम्हाला गाढ झोप आणली आहे: त्यांनी संदेष्टे, म्हणजे तुमचे डोळे बंद केले आहेत; त्यांनी दृष्टान्त पाहणारे, म्हणजे तुमच्या डोक्यावर आच्छादन घातले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 29:10
21 Iomraidhean Croise  

त्यांना दिसेनासे व्हावे म्हणून त्यांच्या डोळ्यांवर अंधारी येवो; तू त्यांची कंबर सदा खचव.


तर पाहा, मी ह्या लोकांशी अद्भुत प्रकारे वर्तण्यास प्रवृत्त होतो; मी अद्भुत व आश्‍चर्यकारक कृत्य करीन, तेव्हा त्यांच्यातील ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट होईल, त्यांच्यातील बुद्धिमानांची बुद्धी लुप्त होईल.”


ते द्रष्ट्यांना म्हणतात, “दृष्टान्त पाहून नका”; संदेष्ट्यांना म्हणतात, “आम्हांला यथार्थ गोष्टींचा संदेश सांगू नका, आम्हांला गोडगोड गोष्टी सांगा, कपटवचने सांगा;


तुझ्या मूळ पुरुषाने पातक केले, तुझे मध्यस्थ माझ्याशी फितुरी करीत आले आहेत.


अशांना कळत नाही, समजत नाही; त्यांचे डोळे लिंपले असल्यामुळे त्यांना दिसत नाही; त्यांची हृदये लिंपली असल्यामुळे त्यांना समजत नाही.


“परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की राजाचे व सरदारांचे काळीज ठाव सोडील; याजकांची त्रेधा उडेल आणि संदेष्टे भयचकित होतील.”


ते अंधाप्रमाणे रस्त्यांनी भटकतात; ते रक्ताने माखले आहेत, म्हणून लोकांना त्यांच्या वस्त्रांना स्पर्श करवत नाही.


जर कोणी संदेष्टा भ्रमात पडून संदेश देत असला तर समजावे की मीच त्याला भ्रमात पाडले आहे; मी आपला हात त्याच्यावर उगारीन व माझे लोक जे इस्राएल त्यांतून त्याचा उच्छेद करीन.


“संदेश सांगू नका” असे ते लोकांना म्हणतात, “ह्या गोष्टींविषयी संदेश सांगू नये; अप्रतिष्ठा सरून जाणार नाही.”


मी म्हणालो, याकोबाच्या प्रमुखांनो, इस्राएल घराण्याच्या सरदारांनो, ऐका, न्यायाची जाणीव तुम्हांला नसावी काय?


ह्यामुळे तुमच्यावर रात्र गुदरून तुम्हांला दृष्टान्त होणार नाही; तुमच्यावर अंधार पडून तुम्हांला भविष्य सांगता येणार नाही; संदेष्ट्यांवर सूर्य मावळेल, त्यांचा दिवस काळोख होईल.


“आजच्या दिवसापर्यंत देवाने त्यांना मंद बुद्धी, पाहता येऊ नये असे डोळे, व ऐकता येऊ नये असे कान दिले,” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे झाले.


त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणार्‍या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.


तेव्हा दाविदाने शौलाच्या उशाजवळून भाला आणि पाण्याचा चंबू उचलून घेतला, आणि ते निघून गेले. ते निघून गेले तेव्हा कोणी त्यांना पाहिले किंवा ओळखले नाही व कोणी जागाही झाला नाही. ते सर्व निद्रिस्त होते; परमेश्वराने त्यांना गाढ निद्रा लावली होती.


(पूर्वीच्या काळी इस्राएलात कोणी देवाकडे प्रश्‍न करण्यास जाई तेव्हा तो म्हणत असे की, “चला, द्रष्ट्याकडे जाऊ;” हल्ली ज्याला संदेष्टा म्हणतात त्याला पूर्वी द्रष्टा म्हणत.)


Lean sinn:

Sanasan


Sanasan