Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 29:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 अरीएल1 ह्याला धिक्कार असो! दाविदाने तळ दिलेले अरीएल नगर ह्याला धिक्कार असो! ह्या वर्षात आणखी एक वर्ष मिळवा, सणांचा एक फेरा होऊ द्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 अरीएल, अरीएल, म्हणजे ते शहर ज्यात दाविदाने तळ दिला, तिला हायहाय! वर्षाला वर्ष जोडा, सण फिरून येवोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 अरीएल, अरीएल, तुम्हाला धिक्कार असो ते नगर जिथे दावीदाने वास्तव्य केले! वर्षा पुढे वर्ष जोडा आणि तुमच्या सणांचे चक्र पुढे चालू द्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 29:1
17 Iomraidhean Croise  

दावीद त्या गडावर राहू लागला; त्याला दावीदपूर हे नाव पडले. दाविदाने मिल्लो बुरुजापासून आतल्या बाजूस सभोवार तटबंदी केली.


प्रभू म्हणाला आहे की, “हे लोक माझ्यासमीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करतात, तरी माझ्यापासून आपले अंतःकरण दूर राखतात, आणि हे माझे भय बाळगतात ते केवळ मनुष्यांनी पढवलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात.


थांबा, विस्मय पावा, आपले डोळे मिटा, अंध व्हा; ते मस्त झाले आहेत पण द्राक्षारसाने नव्हत; ते झोकांडे खात आहेत पण मद्याने नव्हत.


त्याचे अधिपती भयाने पळून जातील व त्याचे सरदार झेंडा पाहून घाबरतील;” ज्याचा अग्नी सीयोनेत आहे व ज्याची भट्टी यरुशलेमेत आहे, तो परमेश्वर असे म्हणतो.


वीणा, सारंगी, डफ, बासरी व द्राक्षारस हीच त्यांची मेजवानी; पण ते परमेश्वराच्या कृतीकडे लक्ष देत नाहीत, ते त्याच्या हातचे कार्य पाहत नाहीत.


जो बैल कापतो तो मनुष्यवध करणारा होय; जो मेंढ्याचा यज्ञ करतो तो कुत्र्याची मान मोडणारा होय; जो अन्नार्पण करतो तो डुकराचे रक्त अर्पण करणारा होय; जो धूप दाखवतो तो मूर्तीचा धन्यवाद करणारा होय; ज्या अर्थी त्यांनी आपलेच मार्ग पसंत केले आहेत व अमंगळ पदार्थांनी त्यांचा जीव संतुष्ट होतो,


सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, “तुमच्या यज्ञबलींत आपल्या होमबलींची भर घाला व मांस खात जा.


ते आपली मेंढरे व गुरे घेऊन परमेश्वराचा आश्रय करण्यास येतील, पण तो त्यांना सापडणार नाही, तो त्यांना अंतरला आहे.


त्यांनी मला केलेली यज्ञार्पणे म्हणजे केवळ मांस अर्पून ते खाणे होय; पण ती परमेश्वर स्वीकारत नाही; आता तो त्यांचा अधर्म स्मरेल व त्यांच्या पापाचे शासन करील; ते मिसरास परत जातील.


ते परमेश्वराला द्राक्षारसाची पेयार्पणे करणार नाहीत; त्यांचे बली त्याला संतोष देणार नाहीत; त्यांचे अन्न त्यांना सुतक्यांच्या अन्नासारखे होईल; ते खाणारे सर्व अशुद्ध होतील; त्यांचे अन्न त्यांची क्षुधा शांत करण्याकरताच आहे; परमेश्वराच्या मंदिरात ते आणणार नाहीत.


परमेश्वराचे जे नेमलेले समय म्हणजे पवित्र मेळ्याचे दिवस तुम्ही नियमित वेळी जाहीर करायचे ते हे :


तर मग ज्या पुढे होणार्‍या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे, वास्तविक स्वरूप नाही; म्हणून ते प्रतिवर्षी नित्य अर्पण केल्या जाणार्‍या त्याच त्याच यज्ञांनी जवळ येणार्‍यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan