Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 28:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 “तो कोणाला ज्ञान शिकवतो? कोणाला संदेश समजावून सांगतो? दूध तुटलेल्यांना काय? थानतुट्या बालकांना काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तो कोणाला ज्ञान शिकवील? आणि तो कोणाला निरोप समजावेल? दुग्धापासून दूर केलेल्यांना किंवा स्तनपानापासून दूर केलेल्यांना काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “तो कोणाला शिकविण्याचा प्रयत्न करीत आहे? त्याचा संदेश तो कोणाला समजावून सांगत आहे? त्यांच्या दूध तुटलेल्या बालकांना, नुकतेच स्तनपान झालेल्या तान्ह्या बाळांना?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 28:9
21 Iomraidhean Croise  

खरोखरच मी आपला जीव स्वस्थ व शांत ठेवला आहे; दूध तुटलेले बाळक आपल्या आईबरोबर असते, तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बाळकासारखा माझ्या ठायी आहे.


तू तर शिस्तीचा द्वेष करतोस, माझी वचने मागे झुगारून देतोस.


कारण त्यांनी ज्ञानाचा तिटकारा केला, आणि परमेश्वराचे भय मान्य केले नाही;


देशादेशांतील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील, “चला, आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हांला आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.” कारण सीयोनेतून नियमशास्त्र व यरुशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल.


हे योग्य प्रकारे करण्याचे शिक्षण त्याला मिळाले आहे; त्याचा देव त्याला शिकवतो.


प्रभू तुम्हांला भाकरीची टंचाई व पाण्याची कमताई करील, तरी ह्यापुढे तुझे शिक्षक दृष्टिआड राहणार नाहीत; तुझ्या डोळ्यांना तुझे शिक्षक दिसतील.


परमेश्वर तुझा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभू, म्हणतो : “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.


शिणलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे; तो रोज रोज सकाळी मला जागे करतो; शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो.


आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे?


तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील; तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल.


“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव परमेश्वर असे म्हणतो, यहूदाचे लोक व यरुशलेमकर ह्यांना जाऊन सांग की माझी वचने ऐकण्याचा बोध तुम्ही का घेत नाही?”


संदेष्टे खोटे संदेश देतात, त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवतात व माझ्या लोकांनाही असेच आवडते; पण अखेरीस तुम्ही काय करणार?


मी हे कोणाला सांगून पटवू म्हणजे ते ऐकतील? पाहा, त्यांचा कान बेसुनत आहे, त्यांना ऐकू येत नाही; पाहा, परमेश्वराचे वचन त्यांना निंदास्पद झाले आहे, त्यात त्यांना काही संतोष वाटत नाही.


त्या वेळी येशू असे बोलू लागला : “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो; कारण ज्ञानी व विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रकट केल्या.


मी तुम्हांला खचीत सांगतो, जो कोणी बालकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही.”


हे ह्यासाठी झाले की, यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे : “प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे?”


निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती.


‘प्रभू कृपाळू आहे ह्याचा तुम्ही अनुभव घेतला आहे,’ तर (तारणासाठी) तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे वचनरूपी निर्‍या दुधाची इच्छा धरा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan