Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 28:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 हेही द्राक्षारसाने भेलकांडत आहेत, मद्याने झुकांड्या खात आहेत; याजक व संदेष्टा हे मद्याने भेलकंडत आहेत, द्राक्षारसाने गुंग झाले आहेत, मद्याने झुकांड्या खात आहेत; ते दृष्टान्त पाहताना भेलकंडतात, निर्णय सांगताना झोके खातात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 पण हे सुद्धा द्राक्षरसाने हेलकावे खात आहेत, आणि मादक मद्यानी अडखळत आहेत. याजक व संदेष्टे सर्वच जण द्राक्षरस व मद्य पिऊन धुंद झाले आहेत आणि मद्याने त्यांना गिळून घेतले आहे. ते मद्याने अडखळून पडत आहेत आणि ते दृष्टांतात भ्रमतात, ते न्याय करण्यात अडखळतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 आणि हे सुद्धा मद्य पिऊन लटपटतात आणि मद्यापासून झोकांड्या देतात: याजक आणि संदेष्टे मद्यामुळे डगमगतात आणि द्राक्षमद्याने अस्थिर होतात. आणि मद्यापासून झोकांड्या देतात ते दृष्टान्त पाहत असताना लटपटतात, निर्णय देताना ते अडखळतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 28:7
33 Iomraidhean Croise  

ते मद्यप्यासारखे डुलतात व झोकांड्या खातात, त्यांची मती अगदी कुंठित होते.


द्राक्षारस चेष्टा करणारा आहे, मद्य गलबला करणारे आहे, त्यांच्यामुळे झिंगणारा शहाणा नव्हे.


जे फार वेळपर्यंत द्राक्षारस पीत राहतात, जे मिश्रमद्याचा पूर्ण आस्वाद घेण्यास जातात त्यांच्या.


हे देशा, तुझा राजा कुलीन घराण्यातला असला व तुझे सरदार नशेसाठी नव्हे तर बलप्राप्तीसाठी योग्य वेळी भोजन करीत असले तर तू धन्य!


परमेश्वराने त्यांच्यात भ्रांतवृत्ती घातली आहे; मद्यपी वांती करीत लोळतो तसे त्यांनी मिसर देशाला त्याच्या प्रत्येक कामात बहकवले आहे.


पण पाहावे तर आनंद व हर्ष, बैल मारणे व मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षारस पिणे चालले आहे; “उद्या मरायचे आहे म्हणून खाऊनपिऊन घेऊ या,” असे ते म्हणत आहेत.


तेव्हा जशी लोकांची तशी याजकाची, चाकराची तशी धन्याची, दासीची तशी धनिणीची, विकत घेणार्‍याची तशी विकत देणार्‍याची, सावकाराची तशी कुळाची, धनकोची तशी ऋणकोची स्थिती होईल.


भूमी मद्यप्यासारखी झोकांड्या खात आहे, माचाळासारखी झुलत आहे; तिच्या अपराधांचा भार तिला दाबत आहे; ती पडेल, आणि पुन्हा उठणार नाही.


एफ्राइमातील मद्यप्यांच्या दिमाखखोर मुकुटाचा, द्राक्षारसाने झिंगलेल्यांच्या सुपीक खोर्‍याच्या माथ्यावरील मोठी शोभा देणारे जे कोमेजणारे फूल त्याचा समूळ नाश होणार.


सगळा दृष्टान्त तुम्हांला मोहोरबंद केलेल्या लेखातील शब्दांसारखा झाला आहे; तो लेख वाचणार्‍याकडे देऊन म्हणतात, “एवढे वाचून दाखव,” तो म्हणतो, “हा मला वाचता येत नाही. कारण हा मोहोरबंद केलेला आहे,”


माझ्या लोकांविषयी म्हणाल तर पोरे त्यांना पिडतात; स्त्रिया त्यांच्यावर अधिकार चालवतात. हे माझ्या प्रजे, तुझे नेते तुला बहकवतात; त्यांनी तुझ्या जाण्याच्या वाटा बुजवून टाकल्या आहेत.


तुझ्या मूळ पुरुषाने पातक केले, तुझे मध्यस्थ माझ्याशी फितुरी करीत आले आहेत.


जे पहाटेस उठून मद्याच्या पाठीस लागतात, जे अपरात्रीपर्यंत द्राक्षारस पिऊन धुंद होतात त्यांना धिक्कार असो.


ज्यांचे शौर्य द्राक्षारस पिण्यात आणि ज्यांची बहादुरी मद्य मिसळण्यात


आणि जे लाच घेऊन दुष्कर्म करणार्‍यास निर्दोषी ठरवतात व नीतिमानाच्या निर्दोषीपणाची हानी करतात, त्यांना धिक्कार असो.


परमेश्वर मला म्हणाला, “संदेष्टे माझ्या नामाने असत्य संदेश देतात; मी त्यांना पाठवले नाही, मी त्यांच्याबरोबर बोललो नाही; ते खोटा दृष्टान्त, शकुन, निरर्थक गोष्टी व आपल्या मनातील कपटयोजना संदेशरूपाने तुम्हांला सांगतात.


शोमरोनातील संदेष्ट्यांच्या ठायी मी मूर्खपणा पाहिला आहे; त्यांनी बआलदैवतांच्या नावाने भाषणे करून माझे लोक इस्राएल ह्यांना बहकवले आहे.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तुम्हांला संदेश देणार्‍या संदेष्ट्यांची वचने ऐकू नका, ते तुम्हांला फसवतात; ते आपल्याच मनाप्रमाणे दृष्टान्त सांगतात, परमेश्वराच्या मुखातला सांगत नाहीत.


त्याने वैर्‍याप्रमाणे आपले धनुष्य वाकवले आहे, तो आपला उजवा हात उगारून शत्रूप्रमाणे उभा राहिला आहे; दृष्टीस रम्य असे सर्व त्याने मारून टाकले आहेत; त्याने सीयोनकन्येच्या तंबूवर अग्नीप्रमाणे आपल्या संतप्त क्रोधाचा वर्षाव केला आहे.


तुम्ही निरर्थक दृष्टान्त पाहिला, खोटा शकुन सांगितला आणि मी बोललो नसता, हे ‘परमेश्वराचे वचन’ असे तुम्ही म्हणाला की नाही?


आतल्या अंगणात जायच्या वेळी कोणाही याजकाने द्राक्षारस पिऊ नये.


आमच्या राजाच्या शुभ दिवशी सरदार द्राक्षारसाने तप्त होऊन बेजार झाले; त्याने आपला हात निंदकांच्या हातात घातला.


वायफळ व खोट्या चालीचा कोणी मनुष्य खोटे बोलून म्हणेल की, “द्राक्षारस व मद्य ह्यांचे मी भाकीत करीन,” तर तो ह्या लोकांचा संदेष्टा होईल.


जो आपल्या शेजार्‍याला मद्य पाजतो त्याला धिक्कार असो! तू त्याची नग्नता पाहावी म्हणून आपला संतप्त क्रोध त्यात मिसळून त्याला मस्त करतोस.


सन्मानाने नव्हे तर अप्रतिष्ठेने तुझी तृप्ती झाली, तर तूही पी आणि बेसुंत्यांसारखा हो; परमेश्वराच्या उजव्या हातचा प्याला तुझ्याकडे वळेल, तुझ्या वैभवाची अप्रतिष्ठा होईल.


त्या दिवसांतील संकटांनंतर लगेचच ‘सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील, व आकाशाची बळे डळमळतील;’


तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर ‘पाशाप्रमाणे’ अकस्मात येईल;


त्याचप्रमाणे पतींनी आपापली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan