Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 28:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 न्यायासनावर बसणार्‍याला न्यायस्फूर्ती, वेशीवर हल्ला करणार्‍या शत्रूला हटवणार्‍यांना वीरश्री असा तो होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 आणि जो न्याय करत बसतो त्यास तो न्यायाचा आत्मा आणि जे वेशीजवळ लढाई मागे हटवतात त्यांना तो पराक्रम असा होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 जे न्याय करण्यासाठी बसतात त्यांच्यासाठी ते न्यायाचा आत्मा होतील, जे वेशीतूनच युद्धामधून मागे फिरतात त्यांच्यासाठी ते सामर्थ्याचा उगम असतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 28:6
22 Iomraidhean Croise  

राजाने हा न्याय केला तो सर्व इस्राएल लोकांच्या कानी गेला, तेव्हा त्यांच्या ठायी राजाविषयी पूज्यबुद्धी उत्पन्न झाली; कारण न्यायनिवाडा करण्याचे दैवी ज्ञान त्याच्या ठायी आहे हे त्यांना दिसून आले.


त्याने प्रजेवर सेनापती नेमून त्यांना नगराच्या वेशीच्या चौकात आपल्याकडे एकत्र केले व त्यांना धीर देण्यासाठी तो त्यांना म्हणाला,


मांसमय भुजांचा त्यांना आधार आहे, पण आम्हांला मदत करण्यास व आमच्या लढाया लढण्यास आमचा देव परमेश्वर आमच्याबरोबर आहे.” यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या ह्या बोलण्यावर सर्व प्रजेने भरवसा ठेवला.


देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे; तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो.


सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे; याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. (सेला)


राजा न्यायासनावर बसतो तेव्हा तो आपल्या नजरेने सर्व दुष्टता उडवून देतो.


कारण निर्दय लोकांचा झपाटा भिंतीवर आदळणार्‍या वादळाप्रमाणे आहे; पण तू दुर्बलास दुर्ग, लाचारास विपत्काली आश्रय, वादळात निवारा, उन्हात सावली, असा झालास.


परमेश्वर उन्नत झाला आहे, उच्च स्थानी राहून त्याने सीयोन न्यायशीलतेने व नीतिमत्तेने भरले आहे.


प्रभू न्याय करणार्‍या व दहन करणार्‍या आत्म्याच्या द्वारे सीयोनेच्या कन्यांचा मळ काढून टाकील, आणि यरुशलेमेतून तिचा रक्तदोष काढून टाकील, तेव्हा असे घडेल.


तेव्हा यहूदाचे सरदार आपल्या मनात म्हणतील की, ‘यरुशलेमेचे रहिवासी आपला देव सेनाधीश परमेश्वर ह्याच्या योगे मला पाठबळासारखे आहेत.’


कारण ज्याला देवाने पाठवले तो देवाची वचने बोलतो; कारण देव तो आत्मा मोजूनमापून देत नाही.


मला स्वत: होऊन काही करता येत नाही; जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो; आणि माझा निवाडा यथार्थ आहे; कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला पाहतो.


कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते; एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन;


कारण तुमच्यासाठी तुमच्या शत्रूंशी युद्ध करायला व तुमचा बचाव करायला तुमच्याबरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे.’


मी तुला आज्ञा केली आहे ना? खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस; कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan