Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 28:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 हेही सेनाधीश परमेश्वराकडून घडते, त्याची बुद्धी आश्‍चर्यकारक व त्याचे चातुर्य थोर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 सेनाधीश परमेश्वर, जो संकल्पात सुंदर आहे आणि ज्ञानाने श्रेष्ठ आहे. त्याच्याकडून हे आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 ही सर्व माहिती सर्वसमर्थ याहवेहकडून प्राप्त होते. त्यांच्या योजना चमत्कारिक असतात, त्यांचे ज्ञान अद्भुत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 28:29
15 Iomraidhean Croise  

सर्वसमर्थ तर अगम्य आहे, त्याचे सामर्थ्य अप्रतिम आहे; तो न्याय व महान नीतिमत्ता विपरीत करीत नाही;


तो अतर्क्य महत्कृत्ये करतो; तो अगणित अद्भुत कृत्ये करतो;


ही परमेश्वराची करणी आहे; ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे.


हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू आमच्यासाठी केलेली अद्भुत कृत्ये व आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत; तुझ्यासमोर त्यांची क्रमवार मांडणी करता येणार नाही;1 मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणनेपलीकडे आहेत.


हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती थोर आहेत. तुझे विचार फार गहन आहेत


पशुतुल्य मनुष्याला कळत नाही, मूर्खाला समजत नाही की,


मसलत व कार्यसिद्धी ही माझी आहेत; मी सुज्ञतामय आहे; मला सामर्थ्य आहे.


भाकरीच्या धान्याचा तो भुगा करतो काय? नाही. तो त्याची मळणी सतत चालवत नाही, तो आपल्या गाडीचे चाक व घोडे त्यावर सतत घालत नाही, तो त्याचा भुगा करत नाही.


तरी तोही सुज्ञ आहे, तो अरिष्ट आणील, आपली वचने मागे घेणार नाही; तर दुष्कर्म्यांच्या घराण्यावर व अधर्म करणारे ह्यांच्या कुमकेवर उठेल.


येणेकरून लोक तत्काळ पाहतील, जाणतील, मनन करतील व समजतील की, परमेश्वराच्या हातून हे झाले आहे; इस्राएलाच्या पवित्र प्रभूने हे उत्पन्न केले आहे.


कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील; त्याला “अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती” म्हणतील.


तू चातुर्याने थोर व कृतीने पराक्रमी असून प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या आचरणाप्रमाणे व कर्मफलाप्रमाणे द्यावे म्हणून मानवजातीचे अखिल मार्ग तुझ्या दृष्टीला खुले आहेत;


अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!


Lean sinn:

Sanasan


Sanasan