Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 28:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 ह्यामुळे तो काळ्या जिर्‍यांची मळणी तीक्ष्ण धारेच्या यंत्राने करीत नाही व जिर्‍यावर गाडीचे चाक फिरवत नाही, तर काळे जिरे काठीने व जिरे दांड्याने झोडपतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 शिवाय, काळे जिरे घणाने मळत नाही, किंवा तिच्यावर गाडीचे चाक फिरवले जात नाही, पण काळे जिरे काठीने आणि जिरे दंडाने झोडतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 शहाजिऱ्याची मळणी करण्यासाठी जड वजनाचा सोटा वापरीत नाही, किंवा मळणीसाठी गाडीचे चाक जिऱ्यावर फिरविले जात नाही; शहाजिऱ्याची मळणी करण्यासाठी हलक्या वजनाची काठी वापरतो, आणि जिऱ्याची मळणी बारीक काठीने करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 28:27
10 Iomraidhean Croise  

अरामाच्या राजाने यहोआहाजाच्या सेनेत केवळ पन्नास स्वार, दहा रथ व दहा हजार पायदळ एवढेच राहू दिले होते व बाकीच्यांचा नाश करून त्यांना तुडवून धुळीस मिळवले होते.


सुज्ञ राजा दुर्जनांना पाखडून टाकतो, त्यांच्यावर चाक फिरवून त्यांची मळणी करतो.


हे योग्य प्रकारे करण्याचे शिक्षण त्याला मिळाले आहे; त्याचा देव त्याला शिकवतो.


भाकरीच्या धान्याचा तो भुगा करतो काय? नाही. तो त्याची मळणी सतत चालवत नाही, तो आपल्या गाडीचे चाक व घोडे त्यावर सतत घालत नाही, तो त्याचा भुगा करत नाही.


पाहा, मी तुझे तीक्ष्ण, नवीन व दुधारी असे मळणीचे औत बनवत आहे; तू डोंगर मळून त्यांचा चुराडा करशील व टेकड्यांचा भुसा करशील.


हे परमेश्वरा, मला शिक्षा कर, पण ती न्यायाने कर, तुझ्या कोपाने नको; नाहीतर तू मला शून्यवत करशील.


परमेश्वर म्हणतो, माझ्या सेवका याकोबा, तू भिऊ नकोस; कारण मी तुझ्याबरोबर आहे; ज्या राष्ट्रांत मी तुला हाकून दिले आहे, त्या सर्वांचा मी सर्वस्वी नाश करीन, पण तुझा सर्वस्वी नाश करणार नाही; तरी मी तुझे योग्य शासन करीन, तुला शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.”


परमेश्वर म्हणतो, “दिमिष्काचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण मळणी करण्याच्या लोखंडी यंत्रांनी त्यांनी गिलादाला मळले.


अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण पुदिना, बडीशेप व जिरे ह्यांचा दशांश तुम्ही देता, आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत; ह्या करायच्या होत्या, तरी त्या सोडायला पाहिजेत असे नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan